Loan: कर्ज दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे सुरक्षित आणि दुसरं म्हणजे असुरक्षित. कर्ज घेणारा व्यक्ती आपली एखादी वस्तू किंवा मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेतो त्यावेळी हे कर्ज सुरक्षित कर्जाच्या अंतर्गत येते. अशा प्रकारच्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता 100 टक्के असते. तर पर्सनल लोन हे असुरक्षित कॅटेगरीत येते. (take precautions while taking loan read details in marathi)
सुरक्षित कर्जाचा व्याज दर हा खूप कमी असतो तर असुरक्षित कर्जाचा व्याज दर हा अधिक असतो. यामुळेच हे कर्ज महागात पडतं. कोणीही हे कर्ज घेऊ शकतं. मात्र, हे कर्ज मिळेलंच असे गरजेचं नाहीये. अनेकदा असेही होते की, कर्ज घ्यावी म्हणून बँक स्वत:हून तुम्हाला काही ऑफर्स सुद्धा देतात. जर तुम्हीही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर व्यवस्थित विचार करा.
अनेकदा असे होते की, कर्ज घेताना केवळ व्याज दर किती हे पाहिले जाते. तर नियम आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, या निष्काळजीपणामुळे नंतर कर्जाची परतफेड करताना अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. म्हणून कर्ज घेतानाच व्यवस्थित माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या.
हे पण वाचा : एकांतात असाल तरच पाहा या बोल्ड वेब सीरिज
कर्ज घेताना क्रेडिट स्कोर एकदा नक्की चेक करा. क्रेडिट स्कोअर खराब असल्यास तुम्हाला कर्ज मिळणार नाही. जर कर्ज मिळाले तर त्यावर व्याज दर अधिक आकारला जातो. बहुतेक वित्तीय संस्था 750+ क्रेडिट स्कोर चांगला मानतात. त्यामुळे तुमचा क्रेडिट स्कोअर कमी असेल तर तो वाढवण्याचा प्रयत्न करा आणि मग कर्जासाठी अर्ज करा.
हे पण वाचा : तुमच्या आवडत्या सारा अली खानचं किती झालंय शिक्षण?
सणासुदीच्या काळात अनेक बँक किंवा वित्तीय संस्था या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर्स देतात. मात्र, या ऑफर्समध्ये सर्वप्रथम नियम आणि अटी काय आहेत हे तपासून घ्या. कारण, अशा काही ऑफर्स असतात ज्या स्वस्त कर्ज दाखवल्या जातात मात्र, प्रत्यक्षात ते खूपच महागात पडतं.
कर्ज घेताना तुम्ही जेवढी रक्कम घेत आहात त्याचा परतावा तुम्ही करु शकाल का? याचा अंदाज घ्या. जर तितकी परतफेड करणं शक्य नसेल तर असे कर्ज घेऊ नका. कारण, तुम्ही ईएमआय भरला नाही तर तुम्हाला पेनल्टी भरावी लागेल आणि त्यासोबतच तुमचा सिबिल स्कोर सुद्धा खराब होईल.