Tata Group : रिटेल क्षेत्रात टाटांची थोपटले दंड...टाटा कन्झ्युमर करणार जबरदस्त विस्तार! किमान पाच ब्रँड विकत घेण्याच्या तयारीत

Retail Sector Growth : टाटा समूह (Tata Group) रिटेल क्षेत्रात जोरदार विस्तार करण्याच्या तयारीत आहे. देशातील रिटेल क्षेत्रात आगामी काळात प्रचंड संधी आहे. त्यामुळेच देशातील आघाडीच्या कंपन्या या क्षेत्रात मोठा विस्तार करत आहेत. रिलायन्स रिटेलने आधीच आपल्या योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली असताना आता टाटा समूहाने देखील या दिशेने आपले पाय घट्ट रोवण्यास सुरूवात केली आहे. टाटा समूहाच्या टाटाट कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (Tata Consumer Products Ltd.)ही आघाडीची कंपनी आता पाच ब्रॅंड विकत घेण्याच्या तयारीत आहे

Tata Group Plans in Retail Business
रिटेल क्षेत्रासाठी टाटांची जबरदस्त प्लॅन 
थोडं पण कामाचं
  • टाटा समूह करणार रिटेल क्षेत्रात विस्तार
  • रिलायन्स, हिंदूस्थान युनिलिव्हरला देणार टक्कर
  • टाटा कन्झ्युमर करणार अनेक ब्रॅंडचे संपादन

Tata Consumer Expansion : नवी दिल्ली : टाटा समूह (Tata Group) रिटेल क्षेत्रात जोरदार विस्तार करण्याच्या तयारीत आहे. देशातील रिटेल क्षेत्रात आगामी काळात प्रचंड संधी आहे. त्यामुळेच देशातील आघाडीच्या कंपन्या या क्षेत्रात मोठा विस्तार करत आहेत. रिलायन्स रिटेलने आधीच आपल्या योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली असताना आता टाटा समूहाने देखील या दिशेने आपले पाय घट्ट रोवण्यास सुरूवात केली आहे. टाटा समूहाच्या टाटाट कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लि. (Tata Consumer Products Ltd.)ही आघाडीची कंपनी आता पाच ब्रॅंड विकत घेण्याच्या तयारीत आहे.103 अब्ज डॉलरच्या अवाढव्य टाटा समूहाची ही कंपनी खाद्यपदार्थ आणि पेयांच्या व्यवसायात आहे. देशाच्या स्पर्धात्मक ग्राहकोपयोगी वस्तूंच्या क्षेत्रात आपले स्थान मजबूत करण्यासाठी टाटा कन्झ्युमर लि. विस्तार करण्यासाठी पाच ब्रँड्स खरेदी करण्यासाठीची बोलणी करते आहे. (Tata Consumer to in acquisition discussion with 5 brands, set to expand in retail sector)

अधिक वाचा : घरगुती वापराच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत वाढ

टाटा कन्झ्युमरची बोलणी सुरू

टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील डिसोझा यांनी एका मुलाखतीत सांगितले की,  कंपनीची भविष्यातील वाढ ही या प्रकारच्या संपादनामधून येणार आहे. टेटली चहा आणि एट ओ'क्लॉक कॉफी हे टाटा कन्झ्युमर्सची लोकप्रिय उत्पादने आहेत. सध्या कंपनी इतर अनेक कंपन्यांशी जिथे योग्य मूल्यांकनाची शक्यता आहे अधिग्रहणासंदर्भात "गंभीरपणे बोलणी" करते आहे. अर्थात ज्यांच्याशी सध्या टाटा कन्झ्युमरची बोलणी सुरू आहे ते ब्रॅंड कोणते आहेत याबद्दलची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.

पेप्सिको इंकमध्ये दोन वर्षांपूर्वी काम केल्यानंतर कंपनीत पदभार स्वीकारलेल्या डिसूझा म्हणाले, “संभाव्य लक्ष्यांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही बोलणी करत आहोत.  

अधिक वाचा : Inactive Bank Account असे बंद करा, या सोप्या मार्गाचा अवलंब केल्यास नाही बसणार पेनल्टी

डझनभर क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या टाटाच्या 153 वर्षांच्या जुन्या व्यवसाय साम्राज्यात 2020 मध्ये त्याची स्थापना झाल्यापासून, Tata Consumer Products ने बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या NourishCo Beverages Ltd. सारख्या कंपन्यांमधील भागीदारी विकत घेऊन आपला पोर्टफोलिओ वाढवला आहे. तसेच  Soulfull हा अन्नधान्याच्या ब्रॅंडदेखील समाविष्ट केला आहे.

अधिक वाचा : या फळाची शेती अल्पावधीत करेल करोडपती!

रिलायन्सशी तीव्र स्पर्धा

टाटा समूहाला युनिलिव्हर सारख्या विद्यमान जागतिक दिग्गज कंपन्या तसेच उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लि. यांच्याकडून या क्षेत्रात कठोर स्पर्धेला सामोरे जावे लागेल, जे सहा महिन्यांत ६० लहान किराणा आणि घरगुती ग्राहकोपयोगी वस्तूंचे ब्रँड विकत घेण्याची योजना आखत आहेत. युक्रेनमधील युद्ध, राष्ट्रीय कृषी-वस्तू निर्यात बंदी आणि गुदमरलेल्या पुरवठा-साखळ्यांमुळे ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्यांच्या इनपुट खर्चात वाढ झाल्यामुळे टाटाचा विस्तार तीव्र चलनवाढीच्या परिस्थितीत झाला.

काळ्या चहाचा प्रमुख निर्यातदार असलेल्या शेजारील श्रीलंकेच्या आर्थिक आणि राजकीय गोंधळामुळे चहाच्या किंमती स्थिर आहेत. भारतात यावर्षी चांगले पीक येण्याची शक्यता आहे ज्यामुळे चहाच्या किमती सामान्यपणे खाली आल्या असत्या. परंतु श्रीलंकेतील व्यत्ययामुळे त्याच्या निर्यातीला अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे किंमती कमी होण्यास प्रतिबंध होतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी