Air India-Vistara Merger : टाटांचे उंच उड्डाण! एअर इंडिया आणि विस्ताराचे होणार विलीनीकरण...15 हजार कर्मचारी, 218 विमानांची एकत्रित ताकद

Aviation Sector Update : टाटांचा सर्व विमान व्यवसाय एकाच छत्राखाली आणण्यासाठी एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सचे विलीनीकरण केले जाणार आहे. आज टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्सने यासंदर्भात घोषणा केली आहे. या कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या करारानंतर सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 25.1 टक्के भागीदारी असेल. विस्तारामध्ये टाटा समूहाचा 51 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे.

Air India-Vistara Merger
एअर इंडिया- विस्तारा विलीनीकरण 
थोडं पण कामाचं
  • एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सच्या विलीनीकरणाचा करार
  • टाटा विमानसेवा क्षेत्रातील आपल्या साम्राज्याचा विस्तार करणार
  • या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्स 2,059 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Air India-Vistara Airlines Merger Deal:नवी दिल्ली : टाटा समूहाने वर्षभरापूर्वीच एअर इंडिया (Air India) भारत सरकारकडून विकत घेतली होती. याशिवाय विस्तारा एअरलाइन्स (Vistara Airlines) या सिंगापूरच्या एअरलाईन्समध्ये टाटांचा (Tata Group) मोठा मालकी हिस्सा आहे. आता भारताच्या विमानसेवा क्षेत्रातील (Aviation Sector) साम्राज्याची पुनर्बांधणी करण्यासाठी टाटा सन्स यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. टाटांचा सर्व विमान व्यवसाय एकाच छत्राखाली आणण्यासाठी एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाईन्सचे विलीनीकरण केले जाणार आहे. आज टाटा सन्स आणि सिंगापूर एअरलाइन्स (SIA) ने यासंदर्भात घोषणा केली आहे. त्याचबरोबर या व्यवहाराअंतर्गत सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2,059 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. (Tata Group announces merger of Air India and Vistara airlines to restructure it's aviation empire read in Marathi)

अधिक वाचा - Garlic Benefits in Winter: हिवाळ्यात असे करा लसणाचे सेवन...अनेक आजार पळतील दूर

मार्च 2024 पर्यत प्रक्रिया पूर्ण होणार

एअर इंडिया आणि विस्तारा या एअरलाइन्स या कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या करारानंतर सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये 25.1 टक्के भागीदारी असेल. या कराराची घोषणा करताना, टाटा समूहाने सांगितले की प्रस्तावित करार मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सध्या हा करार नियामक मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे. विस्तारामध्ये टाटा समूहाचा 51 टक्के हिस्सा आहे, तर उर्वरित 49 टक्के हिस्सा सिंगापूर एअरलाइन्स (SIA) कडे आहे. या विलीनीकरणाच्या व्यवहारानंतर सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2,058.5 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. 

अधिक वाचा  :  व्हॉट्सअ‍ॅपने लॉंच केले एक नवीन धमाल फीचर, स्वत:ला मेसेज करा

एअर इंडिया आणि विस्तारा विलीनीकरणानंतर

या दोन बलाढ्य एअरलाइन्सच्या विलीनीकरणानंतर तयार होणाऱ्या नव्या महाकाय कंपनीत तब्बल 15,000 पेक्षा जास्त कर्मचारी आणि 218 विमाने असू शकतात. विस्ताराने जानेवारी 2015 मध्ये व्यवसायास करण्यास सुरुवात केली होत. तर एअरएशिया इंडिया 2014 मध्ये सुरू करण्यात आली होती. ऑक्टोबरमध्ये, इंडिगोच्या खालोखाल 9.2 टक्के देशांतर्गत बाजारपेठेसह विस्तारा ही देशातील दुसरी सर्वात मोठी विमानसेवा कंपनी होती. इंडिगोचा बाजारपेठेतील हिस्सा तब्बल 56.7 टक्के आहे. याच कालावधीत एअर इंडिया आणि एअरएशिया इंडियाचा भारतीय विमानसेवा क्षेत्राच्या बाजारपेठेतीलहिस्सा अनुक्रमे 9.2 टक्के आणि 7.6 टक्के इतका होता.

अधिक वाचा - जीवनात नव्याने भरतील रंग, या Relationship Tips ने वैवाहिक आयुष्यात होईल दंग

टाटा समूह हा भारतातील सर्वात मोठा उद्योगसमूह आहे. टाटा सन्सकडे सध्या एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस, विस्तारा आणि एअरएशिया या चार विमानसेवा कंपन्यांची मालकी आहे. मागील काही वर्षात टाटांनी विमानसेवा क्षेत्रात अधिग्रहणाद्वारे जबरदस्त विस्तार करण्याचा धडाका लावला आहे. टाटा समूहाने गेल्या ऑक्टोबरमध्ये आजारी एअरलाइन्स ताब्यात घेण्यासाठी 18,000 कोटी रुपये खर्च केले होते. त्यानंतर सरकारने या वर्षी जानेवारीमध्ये एअर इंडिया टाटा समूहाकडे हस्तांतरित केली होती. डीजीसीएच्या आकडेवारीनुसार, टाटा समूहाच्या तीन एअरलाइन्स, एअर इंडिया, विस्तारा आणि एअरएशिया इंडियाचा एकूण बाजार हिस्सा 25.9 टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी