Saurabh Agrawal सांभाळतात 14 लाख कोटींची कंपनी; वर्षाला घेतात 26 कोटी पगार

काम-धंदा
Updated Mar 19, 2023 | 09:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

CFO Saurabh Agrawal: टाटा सन्सचे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी सौरभ अग्रवाल हे एक अनुभवी गुंतवणूक बँकर आहेत. त्यांनी देशात अनेक मोठे विलीनीकरण केले आहेत. व्होडाफोन आणि आयडियासारख्या मोठ्या कंपन्यांचे विलीनीकरणही त्यांच्यामुळेच शक्य झाले आहे.

Tata Sons CFO Saurabh Agrawal earns a salary of 26 crores per year
टाटा सन्सचे CFO सौरभ अग्रवाल अनुभवी गुंतवणूक बँकर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • टाटा सन्सचे CFO सौरभ अग्रवाल अनुभवी गुंतवणूक बँकर
  • आयआयटी आणि आयआयएममध्ये शिक्षण
  • सौरभ अग्रवाल यांचा वार्षिक पगार 26 कोटी

Tata Sons CFO Saurabh Agrawal: टाटा सन्सचे सीएफओ म्हणजेच मुख्य वित्तीय अधिकारी सौरभ अग्रवाल हे एक अनुभवी गुंतवणूक बँकर आहेत. त्यांनी देशात अनेक मोठे विलीनीकरण केले आहेत. व्होडाफोन आणि आयडियासारख्या मोठ्या कंपन्यांचे विलीनीकरणही त्यांच्यामुळेच शक्य झाले आहे. भांडवली बाजाराविषयीची त्यांची समज वेगळी असल्याने, अनेक कंपन्या त्यांना हव्या त्या पगारात आपल्याकडे मोठ्या पदावर घेण्यासाठी तयार आहेत. टीसीएसनेही सौरभ यांना भरघोस पॅकेज दिले आहे. ही रक्कम एवढई मोठी आहे ती त्यांना हवे असेल तर ते त्यांच्या दर महिन्याच्या पगारातून नवीन मर्सिडीज कार आणि बंगला घेऊ शकतात.

सर्वात यशस्वी बँकर्स

सौरभ अग्रवाल हे दोन दशकांहून अधिक इन्व्हेस्टमेंट बँकिंग अनुभव असलेले मोठे अधिकारी आहेत. टाटा सन्समध्ये सहभागी होण्यापूर्वी ते आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी प्रमुख होते. आदित्य बिर्ला नुवोको लिमिटेड आणि ग्रासिम लिमिटेड यांची पुनर्रचना करण्याचे श्रेय त्यांना जाते. 2014 मध्ये जेव्हा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा IPO आला तेव्हा अग्रवाल या कंपनीचे सल्लागार होते.

अधिक वाचा: RBI Directions under Banking Regulation Act : RBI ची 5 सहकारी बँकांवर कारवाई, महाराष्ट्रातील 2 बँकांचा समावेश; पैसे काढण्यावर आले निर्बंध

आयआयटी आणि आयआयएममध्ये शिक्षण
सौरभ अग्रवाल यांनी आयआयटी रुरकी येथून केमिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. यानंतर त्यांनी प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, कोलकाता येथून एमबीएचे शिक्षण घेतले. सौरभ अग्रवाल यांना भांडवली बाजाराची सखोल माहिती आहे. टाटा सन्सच्या अध्यक्षांनीही त्यांच्या क्षमतेचे आणि त्यांच्याकडे असलेल्या टॅलेंटचे कौतुक केले आहे.

अधिक वाचा: 7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची एवढी पगारवाढ होणार? या दिवशी निर्णय होणार?

देशातील सर्वात मोठे विलीनीकरण
सौरभ अग्रवाल यांनी देशातील सर्वात मोठा विलीनीकरण करार केला आहे. आदित्य बिर्ला ग्रुपमध्ये असताना त्यांनी आयडिया आणि व्होडाफोनचे विलीनीकरण करून घेतले होते. हे विलीनीकरण 28 अब्ज डॉलर्सचे होते. याशिवाय अल्ट्राटेककडून जेपी सिमेंटच्या अधिग्रहणातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सौरभ अग्रवाल भारतातील सर्वात यशस्वी गुंतवणूक बँकर्सपैकी ते एक आहेत. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या भारत आणि दक्षिण आशिया युनिटसाठी त्यांनी कॉर्पोरेट फायनान्स प्रमुख म्हणून काम केले आहेत. याशिवाय, ते डीएसपी मेरिल लिंचच्या गुंतवणूक बँकिंग विभागाचे प्रमुख देखील आहेत.

अधिक वाचा: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर !, आता गहू, तांदूळ सोबत या वस्तूही मिळणार मोफत! आदेश जारी

वार्षिक पगार 26 कोटी
सौरभ अग्रवाल यांना टाटा सन्सचे CFO म्हणून मोठा पगार मिळतो. 2022 मध्ये टाटा सन्सने अग्रवाल यांना वार्षिक कॉम्‍पेनसेशन म्हणून 26 कोटी रुपये पगार दिला. अशा प्रकारे त्यांना दरमहा अडीच कोटी रुपये पगार मिळतो. म्हणजे त्यांना हवे असल्यास ते दर महिन्याला जगातली सर्वात महात वस्तू विकत घेवू शकतात. कंपनीने 2021 मध्ये त्यांना 21.45 कोटी रुपये पगार दिला होता. अशाप्रकारे त्यांना 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये 21 टक्के जास्त पगार मिळाला आहे हे यावरून सिद्ध होते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी