Air India Make Over | टाटांच्या नेतृत्त्वात एअर इंडिया होणार स्मार्ट...बोले तो एकदम झकास! पाहा काय होणार बदल

Tata Group : आगामी काळात या कर्जबाजारी झालेल्या आणि मरगळ आलेल्या एअरलाइन्समध्ये एकदम दमदार बदल होण्याची चिन्हे आहेत. १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सच्या (Tata Airlines) रूपात सुरू झालेल्या प्रवासाचे एक वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. टाटा समूहाने पंतप्रधान मोदींच्या खाजगीकरणाच्या धोरणाअंतर्गत (Privatization policy)भारत सरकारकडून एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकत घेतला. जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी १९३२ मध्ये या जगप्रसिद्ध एअरलाइनची स्थापना केली होती

Tata's grand Air India plans
एअर इंडियाला टाटा समूह बनवणार दिमाखदार 
थोडं पण कामाचं
  • एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात आल्यावर होणार मोठे बदल
  • एअर इंडियाला मिळणार पूर्वीचा दिमाख आणि प्रतिष्ठा
  • जेवणाचा दर्जा, प्रवाशांना सेवा आणि वेळेवर उड्डाणे याला टाटांचा प्राधान्यक्रम

Tata's grand Air India plans : नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India)आता अधिकृतपणे टाटांच्या (Tata Group) ताब्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात या कर्जबाजारी झालेल्या आणि मरगळ आलेल्या एअरलाइन्समध्ये एकदम दमदार बदल होण्याची चिन्हे आहेत. १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सच्या (Tata Airlines) रूपात सुरू झालेल्या प्रवासाचे एक वर्तुळ आता पूर्ण झाले आहे. टाटा समूहाने पंतप्रधान मोदींच्या खाजगीकरणाच्या धोरणाअंतर्गत (Privatization policy)भारत सरकारकडून एअर इंडियाचा १०० टक्के हिस्सा विकत घेतला. जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा म्हणजेच जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी १९३२ मध्ये या जगप्रसिद्ध एअरलाइनची स्थापना केली होती आणि १९४६ मध्ये टाटा सन्सचा विमान वाहतूक विभाग एअर इंडिया म्हणून नोंदणीकृत झाला. (Tata's grand plans to change Air India with better service, food & professionalism)

टाटांसमोर आव्हाने

पण ही भूतकाळाची गोष्ट आहे, कारण आता एअर इंडियाचे नशीब बदलण्यासंदर्भात सर्वांच्या नजरा टाटा समूहावर आहेत.  अलीकडच्या काळात अनेकवेळा आंतरराष्ट्रीय सर्किट्समध्ये विविध कारणांमुळे एअर इंडियाची खिल्ली उडवली जाते. खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेपासून ते उत्तम दर्जाची विमाने आणि वेळेवर चांगली कामगिरी करण्यापर्यंत टाटांसमोर अनेक महत्त्वाच्या समस्या आहेत. या सर्वांमुळे पूर्वीचा दिमाख एअर इंडियाला मिळू शकणार आहे.

टाटांचा एअरलाइन्समधील विस्तार

टाटा समूह सिंगापूर एअरलाइन्ससोबत संयुक्त उपक्रम म्हणून विस्तारा चालवत असल्याने आता एअरलाइन्समध्ये मोठा विस्तार होणार आहे. अल्पावधीत, Vistata ने प्रीमियम एअरलाइन सेवा उद्योगातील सर्वोत्तम खाद्यपदार्थ, नवीन विमाने, वाय-फाय सारखे तंत्रज्ञान आणि उत्तम कपडे घातलेले केबिन क्रू म्हणून स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले आहे. लोक आता एअर इंडिया आणि विस्तारा यांच्यात तुलना करत आहेत. आता या दोन्ही कंपन्या टाटा समूहाचे भाग आहेत. एअर एशियामध्येही टाटा समूहाचा मोठा हिस्सा आहे.

एअर इंडियासाठी बोली प्रक्रिया जिंकल्यावर रतन टाटांनी मोठ्या आनंदाने एअर इंडियाचे स्वागत केले होते.

एअर इंडियाला असा मिळणार पूर्वीचा दिमाख

तर आता एअर इंडियात नेमके काय बदल होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहाने आधीच एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये बदल लागू करण्यास सुरुवात केली आहे. प्रवाशांना याचा अनुभव यायला लागला आहे. येथे काही बदल आहेत जे टाटा येत्या काही दिवसांत अंमलात आणण्याची योजना आखत आहेत किंवा आधीच अंमलात आणले आहेत -

स्मार्ट आणि सुसज्ज केबिन क्रू सदस्य

क्रू मेंबर्सनी उत्तम कपडे घातलेले आणि सुसज्ज असले पाहिजेत आणि ग्रूमिंग एक्झिक्युटिव्ह असतील जे विमानतळांवर तपासणी करतील.

फ्लाइट्सची वेळेवर चांगली कामगिरी

वेळेवर उड्डाणे होणे अत्यंत महत्त्वाची असल्याने, विमान सुटण्याच्या 10 मिनिटे आधी दरवाजे बंद केले जातील. शिवाय क्रूला याची खात्री करून घ्यावी लागेल. 

प्रवाशांना "पाहुणे" म्हणून बोलावणे

टाटा समूहाने कर्मचाऱ्यांना सांगितले आहे की एअर इंडियाची "प्रतिमा, दृष्टीकोन आणि धारणा" मध्ये बदल होईल, असे ते म्हणाले. केबिन क्रू सदस्यांना सर्व प्रवाशांना "अतिथी" म्हणून संबोधित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केबिन क्रू पर्यवेक्षकांना अतिथींना देण्यात आलेली सुरक्षा आणि सेवेच्या निकषांची खात्री करावी लागेल.

फ्लाइटमधील सुधारित जेवणाची सेवा 

टेकओव्हर केल्यानंतर सुरुवातीच्या दिवसांमध्ये निवडक फ्लाइटमधील प्रवाशांना सुधारित जेवणाची सेवा प्रदान केली जाईल. एअर इंडियाच्या सर्व फ्लाइटमधील प्रवाशांसाठी ही सुधारित जेवण सेवा टप्प्याटप्प्याने विस्तारित केली जाईल. AI864 (मुंबई-दिल्ली), AI687 (मुंबई-दिल्ली), AI945 (मुंबई-अबू धाबी) आणि AI639 (मुंबई-बेंगळुरू) या चार फ्लाइटवर "सुधारित जेवण सेवा" प्रदान करण्यात आली. शुक्रवारी मुंबई-नेवार्क फ्लाइट आणि पाच मुंबई-दिल्ली फ्लाइटमध्ये "सुधारित जेवण सेवा" दिली जाईल.

एकत्रित नेटवर्क

एअर इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय विमान कंपनी आहे आणि तिच्याकडे आता 200 हून अधिक विमाने आणि 80 हून अधिक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासस्थाने आहेत. समूहाकडे आता दोन पूर्ण-सेवा वाहक आहेत -- विस्तारा आणि एअर इंडिया -- सोबत दोन कमी किमतीच्या एअरलाइन्स -- एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरएशिया इंडिया -- आणि एक ग्राउंड आणि कार्गो हाताळणी कंपनी, AISATS. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध मार्केट श्रेणींमध्ये आणि स्तरावर स्पर्धा करण्यासाठी सर्व एअरलाइन्समध्ये ताळमेळ निर्माण करण्याची योजना आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी