Tax benefits on Electric vehicles | नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहने (Electric vehicles)फक्त पर्यावरणासाठीच उपयुक्त आहेत असे नव्हे तर पारंपारिक वाहनांपेक्षा अधिक सुविधायुक्तदेखील आहेत. याशिवाय पेट्रोल (petrol price), डिझेलसारख्या (diesel price)इंधनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे ग्राहकांचे लक्ष इलेक्ट्रिक वाहनांकडे अधिक वळले आहे. इलेक्ट्रिक वाहने यादृष्टीने स्वस्त आहेत इतकेच नाही तर भारतात इलेक्ट्रिक वाहन खरेदी केल्यास टॅक्सवरदेखील (Tax benefits) बेनिफिट्स मिळत आहेत. (Tax benefits are available on Electric vehicles)
वैयक्तिक वापरासाठीच्या कार, भारतीय टॅक्स कायद्यानुसार लक्झरी प्रॉडक्ट समजल्या जातात. त्यामुळे नोकरदारांना ऑटो लोनवर कोणताही टॅक्स बेनिफिट मिळत नाही. भारतात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने एक नवीन सेक्शन लागू केला आहे, ज्याअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांच्या मालकांना टॅक्सवर सूट मिळते. भारतात अनेक कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक वाहने बाजारात आणली आहेत. वाहनांच्या वाढत्या विक्रीमुळे वाहन उत्पादक कंपन्या नवनवीन मॉडेल बाजारात आणत आहेत.
इलेक्ट्रिक वाहन विकत घेण्यासाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड करताना सेक्शन ८०ईईबी अंतर्गत एकूण १,५०,००० रुपयांपर्यतची टॅक्स सूट उपलब्ध आहे. हा टॅक्सचा फायदा चारचाकी आणि दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर उपलब्ध आहे. जे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्याचा पर्याय निवडतात ते ८० ईईईबीअंतर्गत कर्जाच्या रकमेवर जमा केलेल्या व्याजावर १.५ लाख रुपयांच्या करवजावटीसाठी पात्र असतील. नोकरदारांना देण्यात आलेल्या या टॅक्स बेनिफिटमुळे नोकरदार वर्गाकडून इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना मिळणार आहे.
वैयक्तिक करदाते किंवा वैयक्तिक कार मालकच याचा लाभ घेऊ शकतात. एचयुएफ, एओपी, पार्टनरशिप फर्म किंवा कंपनी या या सुविधेचा लाभ मिळणार नाही.