Top Indian IT companies : नवी दिल्ली : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) हा जागतिक स्तरावर आयटी सेवा क्षेत्रातील दुसरा सर्वात मौल्यवान ब्रँड बनला आहे. तर ब्रँड फायनान्सनुसार, इतर चार भारतीय टेक कंपन्यांनी टॉप 25 IT सेवा ब्रँडमध्ये स्थान मिळवले आहे. अहवालानुसार, Accenture ने 36.2 बिलियन डॉलरच्या विक्रमी ब्रँड मूल्याचा पल्ला गाठून जगातील सर्वात मौल्यवान आणि सर्वात मजबूत आयटी सेवा ब्रँडचे स्थान कायम ठेवले आहे. अहवालात म्हटले आहे की IBM चौथ्या क्रमांकावर गेली आहे तर TCS क्रमवारीत दुसर्या स्थानावर आली आहे. वार्षिक 12 टक्के वाढ आणि 2020 पासून 24 टक्क्यांच्या वाढीनंतर 16.8 अब्ज डॉलरच्या ब्रँड मूल्यापर्यंत टीसीएस पोहोचली आहे. (TCS, globally 2nd most values IT brand, 5 Indian companies in top 25)
टीसीएस ही जागतिक पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा मूल्यवान आयटी सेवा ब्रॅंड बनली आहे. तर भारतात टीसीएस नंबर वन आहे. टीसीएस खालोखाल इन्फोसिस, विप्रो, एचसीएल, टेक महिंद्रा आणि लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक या कंपन्यांचा क्रमांक लागतो.
गेल्या वर्षीपासून विप्रोची 52 टक्के ब्रँड व्हॅल्यू आहे आणि 2020 पासून 80 टक्क्यांची 12.8 अब्ज डॉलरची वाढ नोंदवल्यावर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस जागतिक स्तरावर सर्वात वेगाने वाढणारा आयटी सेवा ब्रँड म्हणून उदयास आली आहे.
विप्रोने 7 वे स्थान मिळवले आहे आणि जागतिक टॉप कंपन्यांमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. विप्रोच्या कामगिरीने मजबूत महसूल आणि ब्रँड व्हॅल्यूमध्ये वाढ नोंदवली आहे. अहवालात म्हटले आहे की बंगळुरूस्थित या समूहाचे ब्रँड मूल्य 6.3 अब्ज डॉलर आहे आणि मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीची 48 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
HCL जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडच्या पंक्तीत 8 व्या क्रमांकावर आहे. HCL ने दूरसंचार, जीवन विज्ञान, उत्पादन आणि तंत्रज्ञान यासह विविध क्षेत्रातील 58 प्रकल्पांचे करार केले आहे. गेल्या वर्षभरात एचसीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 10 टक्क्यांनी वाढ होऊन ती 6.1 बिलियन डॉलरच्या ब्रॅंड मूल्याची कंपनी झाली आहे. कंपनीने जाहीर केले की त्यांचा महसूल 2.4 टक्क्यांनी वाढून एकूण 10.2 अब्ज डॉलर झाला आहे, असे अहवालात नमूद केले आहे.
जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडच्या बाबतीत टेक महिंद्रा 15 व्या क्रमांकावर आहे. टेक महिंद्राच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये गेल्या दोन वर्षांत ४५ टक्क्यांनी वाढ होऊन ती ३ अब्ज डॉलर झाली आहे. ही वाढ केंद्रित ब्रँड बिल्डिंगच्या प्रयत्नांचा परिणाम आहे, अहवालात म्हटले आहे की, शाश्वत भविष्य निर्माण करण्याच्या वचनबद्धतेसाठी प्रिन्स ऑफ वेल्सकडून टेरा कार्टा सील मिळवणारी ही एकमेव भारतीय संस्था आहे.
ब्रँड फायनान्स आयटी सर्व्हिसेस 25, 2022 च्या अहवालानुसार लार्सन अँड टुब्रो इन्फोटेक (LTI) ने जागतिक स्तरावर सर्वात मौल्यवान IT सेवा ब्रँडमध्ये 22 वे स्थान मिळवले आहे. भारतीय IT सेवा ब्रँड्सनी 2020 ते 2022 पर्यंत सरासरी वाढीसह 51 टक्क्यांनी झेप घेतली आहे. त्या तुलनेत यूएसमधील ब्रँड्सच्या मूल्यात सात टक्के घट झाली आहे.