TCS Women employees | टाटांच्या टीसीएसमध्ये आहेत देशातील सर्वाधिक महिला कर्मचारी, रिलायन्स खूपच मागे

Women employees | टीसीएसमध्ये देशातील सर्वाधिक महिला कर्मचारी (highest employer of women)आहेत. टीसीएसमध्ये एकूण १,७८,३५७ महिला कर्मचारी काम करतात. ही माहिती समोर आली आहे २०२१च्या 'बर्गंडी प्रायव्हेट हरुन इंडिया लिस्ट ऑफ ५०० मोस्ट व्हॅल्यूएबल कंपनीज' (latest 2021 Burgundy Private Hurun India list of 500 most valuable companies) या यादीमध्ये टीसीएसने बाजी मारली आहे. टीसीएसमध्ये एकूण ५,०६,९०८ कर्मचारी आहेत.

TCS employees highest Women employees
टीसीएसमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक 
थोडं पण कामाचं
  • टीसीएसमध्ये देशातील सर्वाधिक महिला कर्मचारी
  • आयटी क्षेत्रानंतर बॅंकिंग क्षेत्रात महिला कर्मचाऱ्यांची मोठी संख्या
  • अंबानींच्या रिलायन्सचा क्रमांक यात बराच मागे

Highest Number of Women employees | नवी दिल्ली : टाटा समूहाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (Tata Consultancy Services)म्हणजे टीसीएसमध्ये देशातील सर्वाधिक महिला कर्मचारी (highest employer of women)आहेत. टीसीएसमध्ये एकूण १,७८,३५७ महिला कर्मचारी काम करतात. ही माहिती समोर आली आहे २०२१च्या 'बर्गंडी प्रायव्हेट हरुन इंडिया लिस्ट ऑफ ५०० मोस्ट व्हॅल्यूएबल कंपनीज' (latest 2021 Burgundy Private Hurun India list of 500 most valuable companies) या यादीमध्ये टीसीएसने बाजी मारली आहे. टीसीएसमध्ये एकूण ५,०६,९०८ कर्मचारी आहेत. कंपनीचे एकूण बाजारमूल्य १३,०९,४८८ कोटी रुपयांचे आहे. (TCS has highest number of women employees in India, IT sector tops)

आयटी कंपन्यांमध्ये महिला मोठ्या प्रमाणात

देशातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये जवळपास ६९ लाख लोक काम करतात. यानुसार सरासरी एका कंपनीत १३,८०० कर्मचारी काम करतात. टीसीएसनंतर महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत इन्फोसिसचा क्रमांक लागतो. इन्फोसिसमध्ये एकूण २,५९,६१९ कर्मचारी काम करतात. यातील १,००,३२१ कर्मचारी हे महिला आहेत. त्याखालोखाल विप्रोचा क्रमांक असून विप्रोमध्ये ७२,००० महिला कर्मचारी आहेत. अर्थात एकूण कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत टीसीएसनंतर क्वेस कॉर्प या कंपनीचा नंबर असून यात एकूण ३,६३,१३६ कर्मचारी काम करतात आणि त्यात ६१,७३३ कर्मचारी महिला आहेत.

अंबानींच्या रिलायन्सचा क्रमांक खाली

आश्चर्याची बाब म्हणजे बॅंकिंग क्षेत्रात आयसीआयसीआय बॅंकेने सर्वात जास्त महिला कर्मचाऱ्यांना नोकरी दिली आहे. आयसीआयसीआय बॅंकेत ३१,०५९ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. यानंतर बॅंकिंग क्षेत्रात एचडीएफसी बॅंकेचा क्रमांक लागतो. एचडीएफसी बॅंकेत २१,७४६ महिला कर्मचारी काम करतात. याबाबतीत अंबानींच्या रिलायन्सचा क्रमांक बराच खाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये एकूण २,३६,३३४ कर्मचारी काम करतात आणि त्यातील १९,५६१ कर्मचारी महिला आहेत.

कंपन्यांच्या संचालक मंडळात महिला संचालक

विविध कंपन्यांच्या संचालक मंडळातील महिलांच्या संख्येचा जेव्हा मुद्दा येतो तेव्हा चार कंपन्या आघाडीवर आहेत. यात गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइस, गोदरेज अॅग्रोवेट आणि इंडिया सिमेंट्स या कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये प्रत्येकी ५ महिला संचालक आहेत. टॉप ५०० कंपन्या, ज्यांचा या अहवालात अभ्यास करण्यात आला आहे, यामध्ये एकूण ६४४ महिला संचालक कंपन्यांच्या संचालक मंडळावर आहेत. ही यादी बर्गंडी प्रायव्हेट आणि हरुन इंडिया यांच्याकडून बनवण्यात आली आहे. यात देशातील टॉप ५०० कंपन्यांच्या अभ्यास करण्यात आला. या यादीत समाविष्ट असलेल्या कंपन्यांचे किमान बाजारमूल्य ५,६०० कोटी रुपयांचे होते.

आयटी कंपन्यांमधील कामाचे स्वरुप, मिळणारे वेतन, या क्षेत्रात आवश्यक असणारी कौशल्ये या घटकांमुळे इतर क्षेत्रांपेक्षा आयटी क्षेत्रात महिला मोठ्या प्रमाणात काम करताना दिसतात. त्यामुळेच टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांमध्ये महिला कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी