Job Cuts : अरे बापरे! नोकरकपातीचे वारे आता पोचले चीनमधील बलाढ्य टेक कंपनीपर्यत, जाणार हजारोंच्या नोकऱ्या

Lay Off : चीनची (Chinese Tech company) बडी टेक कंपनी असलेल्या टेन्सेंटमध्ये (Tencent) कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरूवात झाली आहे. महसूलात घट, मंदीची भीती यामुळे अनेक कंपन्या आपला खर्च वाचवण्यासाठी कर्मचारी कपात करत आहेत. ट्विटरमधून हजारो कर्मचारी तडकाफडकी काढण्यात आले. त्यानंतर मग एकापाठोपाठ एक अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये हे लोण पोचले आहे. मेटा (Meta Lay off), ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन (Amazon) यांनी ऐतिहासिक नोकर कपात करण्यास सुरूवात केली आहे.

Lay Off
चीनमधील नोकरकपात 
थोडं पण कामाचं
  • मेटा (Meta Lay off), ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन (Amazon) यांच्याकडून ऐतिहासिक नोकर कपात
  • चीनची बडी टेक कंपनी असलेल्या टेन्सेंटमध्ये (Tencent) कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरूवात
  • व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि क्लाउड व्यवसायाशी निगडीत हजारो कर्मचाऱ्यांची छाटणी

Tencent Job Cuts Latest : नवी  दिल्ली :  सध्या जगातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये नोकर कपातीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यातही तंत्रज्ञान म्हणजे टेक कंपन्यांमध्ये जोरदार नोकर कपात केली जाण्यास सुरूवात झाली आहे. इलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर (Twitter)ताब्यात घेतल्यावर ट्विटरमधून हजारो कर्मचारी तडकाफडकी काढण्यात आले. त्यानंतर मग एकापाठोपाठ एक अनेक दिग्गज कंपन्यांमध्ये हे लोण पोचले आहे. मेटा (Meta Lay off), ट्विटर, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन (Amazon) यांनी ऐतिहासिक नोकर कपात करण्यास सुरूवात केली आहे. त्यानंतर आता चीनची (Chinese Tech company) बडी टेक कंपनी असलेल्या टेन्सेंटमध्ये (Tencent) कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सुरूवात झाली आहे. महसूलात घट, मंदीची भीती यामुळे अनेक कंपन्या आपला खर्च वाचवण्यासाठी कर्मचारी कपात करत आहेत. यामध्ये आता टेन्सेंट होल्डिंग्सचे (Tencent Holdings)नाव देखील जोडले गेले आहे. अर्थात याआधीही टेन्सेंटने कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. मात्र यावेळेस याचे स्वरुप खूपच मोठे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कंपनीतील व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि क्लाउड व्यवसायाशी निगडीत कर्मचाऱ्यांची छाटणी सुरू झाली आहे. (Tencent to lay off thousands of employees for cost cutting)

अधिक वाचा: Shraddha Murder case: क्राईम सीरिज पाहून गर्लफ्रेंडचे 35 तुकडे केले, असं काय आहे या अमेरिकन टीव्ही शोमध्ये? 

सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार टेन्सेंट मोठ्या प्रमाणात नोकरकपात करणार आहे. टेनसेंटच्या 6 व्यावसायिक विभागांपैकी 3 विभागांमध्ये या नोकरकपातीचा दणका आणि परिणाम दिसून येईल. या तीन विभागांमध्ये म्हणजे प्लॅटफॉर्म आणि सामग्री (PCG), इंटरएक्टिव्ह एंटरटेनमेंट डिपार्टमेंट (IEG) आणि क्लाउड आणि स्मार्ट इंडस्ट्रीज ग्रुप (CSIG) यांचा समावेश आहे. या तीनही विभागांचे काम प्रामुख्याने व्हिडिओ स्ट्रीमिंग, गेमिंग आणि क्लाउड व्यवसायाशी संबंधित आहे. 

या विभागातील नोकऱ्या जाणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयईजीच्या काही कर्मचाऱ्यांना मागील आठवड्यातच कामावरून काढून टाकण्यात आले होते. आता त्यानंतर इतरही विभागातील कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली जाणार आहे. अर्थात कंपनीने अधिकृतपणे यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. टेन्सेंटमधील नेमक्या किती जणांना नोकरी गमवावी लागणार याबद्दल अद्याप स्पष्टता नाही. मात्र ही संख्या मोठी असण्याची भीती व्यक्त करण्यात येते आहे.   टेन्सेंटमधील नोकरकपातीमागे चीनमध्ये झिरो कोविड पॉलिसी देखील आहे. कारण हे धोरण लागू झाल्यापासून कंपनीच्या व्यवसायाला मोठाच दणका बसला आहे. 

अधिक वाचा : Jitendra Awhad यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना फोन, काय झाली चर्चा?

कोविड प्रतिंबधक धोरणाचा परिणाम

चीन सरकारने शून्य कोविड धोरण अवलंबल्याने तेथील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. टेक कंपन्यांना तो जास्तच बसला आहे. या वर्षाच्या सुरूवातीपासूनच टेन्सेंटच्या कामावर याचा परिणाम झाला होता. त्याचवेळी अलीबाबा ग्रुपनेही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. या वर्षी ऑगस्टमध्ये Tencent ने आपल्या एकूण कर्मचाऱ्यांची माहिती दिली होती. त्यानुसार कंपनीमध्ये जूनमध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 116,213 होती. तर त्यानंतर ती कमी होत ऑगस्टमध्ये 110,715 पर्यत आली होती. 

अधिक वाचा : आमदारकीचा राजीनामा देतो, जितेंद्र आव्हाडांचे ट्वीट

गेमिंग व्यवसायाला मोठा फटका

टेन्सेंटच्या बोर्डाने अलीकडेच खर्च कमी करण्यासंदर्भात सांगितले होते. यात कर्मचारी कपातीचाही मुद्दा आहे. विशेष म्हणजे Tencent काही क्षेत्रातील नॉन-कोअर बिझनेस देखील बंद करत आहे. परिणामी या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. Tencent ऑनलाइन शिक्षण, ई-कॉमर्स आणि गेम लाइव्ह-स्ट्रीमिंगमध्ये मोठ्या खर्चात कपात करते आहे. चीनमधील शेन्झेन येथे स्थित असलेली ही कंपनी एकीकडे खर्चात कपात करत आहे. मात्र त्याचबरोबर जगातील अनेक देशांमध्ये विस्तार करण्याचाही कंपनीचा प्रयत्न आहे. जगातील गेमिंग कंपन्यांमधील हिस्सा विकत घेण्यावर कंपनीचा भर आहे. मात्र आगामी काळात टेन्सेंटमध्ये हजारोंच्या नोकऱ्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी