Real Estate: घर खरेदीसाठी ठाणे पश्चिमला सर्वाधिक पसंती, उत्तर प्रदेशचे नोएडा एक्सटेंशन तिसऱ्या क्रमांकावर

काम-धंदा
Updated Mar 28, 2023 | 13:43 IST | टाइम्स नाऊ मराठी

Buying House in Mumbai: मुंबईत राहण्यासाठी उत्तम ठिकाण कोणतं? याच उत्तर रिअल इस्टेट पोर्टल हाउसिंग डॉट कॉमने दिलं आहे. यानुसार 2022 मध्ये, मुंबईत ठाणे पश्चिम भागात लोकांनी घराचा सर्वाधिक शोध घेतल्याचे दाखविले आहे.

Thane West is most preferred for home buying, Uttar Pradesh's Noida Extension is third
Real Estate: घर खरेदीसाठी ठाणे पश्चिमला सर्वाधिक पसंती  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • Real Estate: घर खरेदीसाठी ठाणे पश्चिमला सर्वाधिक पसंती
  • उत्तर प्रदेशचे नोएडा एक्सटेंशन तिसऱ्या क्रमांकावर
  • पुण्यातील वाकड परिसर सातव्या क्रमांकावर

Most Searched for Buying a House: मुंबईत राहण्यासाठी उत्तम ठिकाण कोणतं? याच उत्तर रिअल इस्टेट पोर्टल हाउसिंग डॉट कॉमने दिलं आहे. यानुसार 2022 मध्ये, मुंबईत ठाणे पश्चिम भागात लोकांनी घराचा सर्वाधिक शोध घेतल्याचे दाखविले आहे. तर बंगळुरूचे व्हाइटफील्ड आणि दिल्ली-एनसीआरचे नोएडा (नोएडा एक्स्टेंशन) अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. (Thane West is most preferred for home buying, Uttar Pradesh's Noida Extension is third)

अधिक वाचा: LIC New User Registration : LIC मध्ये तुम्ही स्वतः करु शकता नवीन ग्राहकांसाठी ऑनलाईन नोंदणी

Housing.com ने सोमवारी त्यांच्या अधिकृत प्लॅटफॉर्मवर घरांसाठी सर्वाधिक शोधल्या गेलेल्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध केली. या यादीनुसार कोलकाता न्यू टाऊन आणि मुंबईचा मीरा रोड पूर्व अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. दुसरीकडे ऑनलाइन सर्चमध्ये अहमदाबादचा चांदखेडा परिसर सहाव्या तर पुण्यातील वाकड परिसर सातव्या आणि खारघर आठव्या क्रमांकावर आहे. 

अधिक वाचा: Aadhaar-PAN Card Link न केल्यास होतील हे 3 नुकसान, आयकर विभागाचा नवा आदेश जारी

अहमदाबादचा गोटा आणि वस्त्राल भाग या यादीत अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर आहेत. या पोर्टलनुसार जानेवारी ते डिसेंबर 2022 दरम्यान, लोकांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी निवासी मालमत्तांचा सर्वाधिक शोध घेतला. यापैकी 60 टक्के लोकांना या परिसरात राहण्यासाठी घर घ्यायचे होते, तर उर्वरित लोकांना भाड्याने घर घ्यायचे होते. बहुतेक शोध 50 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या घरांसाठी शोध घेतला. हाऊसिंग डॉट कॉमचे ग्रुप सीईओ ध्रुव अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही महिन्यांमध्ये व्याजदरात वाढ झाली असली तरी घर खरेदीचा हाच वेग कायम राहण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी