Salary Hike in 2023: खासगी नोकरी करणाऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी, पुढील वर्षी पगारात होणार इतकी मोठी वाढ

काम-धंदा
भरत जाधव
Updated Aug 16, 2022 | 17:31 IST

तुम्ही खासगी क्षेत्रात (private sector) काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. होय, 2022 सालचे वेतन (salary) वाढीचे चक्र पूर्ण झाले आहे आणि प्रत्येक नोकरदार (employee) व्यक्ती आता 2023 मधील पगारवाढीची वाट पाहत आहे. आता बातमी आली आहे की देशातील कंपन्या 2023 मध्ये पगारात 10 टक्के वाढ करू शकतात. एका अहवालानुसार, कंपन्या कठीण टप्प्यातून जात आहेत.

There will be such a huge increase in the salary of private employees
खासगी नोकरी करणाऱ्यांसच्या पगारात होणार इतकी मोठी वाढ   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • देशातील कंपन्या 2023 मध्ये पगारात 10 टक्के वाढ करू शकतात.
  • मागील वर्षी प्रत्यक्ष वेतनवाढ 9.5 टक्के होती.
  • आशिया पॅसिफिक (APAC) क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ भारतात होणार आहे.

Salary Hike: तुम्ही खासगी क्षेत्रात (private sector) काम करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे आणि ही बातमी वाचून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. होय, 2022 सालचे वेतन (salary) वाढीचे चक्र पूर्ण झाले आहे आणि प्रत्येक नोकरदार (employee) व्यक्ती आता 2023 मधील पगारवाढीची वाट पाहत आहे. आता बातमी आली आहे की देशातील कंपन्या 2023 मध्ये पगारात 10 टक्के वाढ करू शकतात. एका अहवालानुसार, कंपन्या कठीण टप्प्यातून जात आहेत.

पगारवाढीसाठी बजेट वाढवला 

जागतिक सल्लागार, ब्रोकिंग आणि सोल्यूशन सेवा प्रदाता विलिस टॉवर्स वॉटसन यांच्या अहवालात असे आढळून आले आहे की भारतातील कंपन्या 2022-23 मध्ये 10% वेतन वाढीची व्यवस्था करत आहेत. मागील वर्षी प्रत्यक्ष वेतनवाढ 9.5 टक्के होती. अहवालानुसार, भारतातील निम्म्याहून अधिक (58 टक्के) नियोक्त्यांनी चालू आर्थिक वर्षासाठी गेल्या वर्षीपेक्षा जास्त वेतनवाढीसाठी बजेट मांडले आहे.

Read Also : शोपियामध्ये दोन काश्मिरी पंडितांवर गोळीबार

25 टक्क्यांनी नाही बदलले बजेट 

एक चतुर्थांश (24.4 टक्के) बजेटमध्ये कोणतेही बदल केले नाहीत. अहवालात म्हटले आहे की 2021-22 च्या तुलनेत केवळ 5.4 टक्के बजेट कमी केले आहे. अहवालानुसार, आशिया पॅसिफिक (APAC) क्षेत्रात सर्वाधिक पगारवाढ भारतात होणार आहे. पुढील वर्षी चीन सहा टक्के, हाँगकाँग आणि सिंगापूर चार टक्क्यांनी वेतन वाढवेल. हा अहवाल एप्रिल आणि मे 2022 मध्ये 168 देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावर आधारित आहे. भारतातील 590 कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर तयार करण्यात आला आहे.

Read Also : गजकर्णामुळे चारचौघात बसणं-उठणं अवघड झालंय का? मग हे उपाय करा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी