Money Making in Share market | या कारणांमुळे शेअर बाजारात पैसा गमावतात लोक, चुका टाळल्यास होईल मोठी कमाई

Share market investment | नव्याने गुंतवणूक (Investment) सुरू करणारे किंवा छोटे सर्वसामान्य गुंतवणुकादारांमध्ये फार थोडे लोक असे आहेत ज्यांचा शेअर बाजारातील अनुभव चांगला असतो. शेअर बाजारात तेजी असताना किंवा नसताना, मोठे गुंतवणुकदार सातत्याने पैसा कमावत असताना (Money making in share market) असे कोणते घटक आहे किंवा कोणत्या बाबी आहेत ज्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदार पैसा गमावतात.

Share market mistakes
शेअर बाजारात होणाऱ्या चुका 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजारात सध्या चढ उतार सुरू
  • नवे गुंतवणुकदार बाजारात पैसा गमावतात
  • शेअर बाजारात कमाई करण्यासाठी लक्षात घ्यायचे मुद्दे

Share Market Investment | मुंबई : शेअर बाजारात (Share market)सध्या चढ उतार सुरूआहेत. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये कधी तेजी येते आहे तर कधी घसरण होते आहे. अर्थात मागील वर्षभरात बाजाराने कमाईच्या अनेक संधी गुंतवणुकदारांना दिल्या आहेत. मात्र नव्याने गुंतवणूक (Investment) सुरू करणारे किंवा छोटे सर्वसामान्य गुंतवणुकादारांमध्ये फार थोडे लोक असे आहेत ज्यांचा शेअर बाजारातील अनुभव चांगला असतो. शेअर बाजारात तेजी असताना किंवा नसताना, मोठे गुंतवणुकदार सातत्याने पैसा कमावत असताना (Money making in share market) असे कोणते घटक आहे किंवा कोणत्या बाबी आहेत ज्यामुळे सर्वसामान्य गुंतवणुकदार पैसा गमावतात. छोट्या किंवा सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडून होणाऱ्या अशा चुका (Mistakes to be avoided in share market) ज्यामुळे ते शेअर बाजारात पैसा गमावतात त्या जाणून घेऊया. या चुका टाळल्यास बाजारातून चांगला पैसा कमावता येऊ शकेल. (The common mistakes small investors make while investing in share market)

१. गुंतवणूक करताना इतरांची नक्कल करणे

छोट्या गुंतवणुकदारांची सर्वात मोठी अडचण म्हणजे ते इतरांकडे पाहून किंवा इतरांना मिळालेला नफा पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेतात आणि सुरूवात करतात. शेअर बाजारात जर तेजी दिसत असेल आणि चांगला परतावा मिळत असेल तर पुढे काय याचादेखील विचार झाला पाहिजे. कारण बाजारात आज तेजी आहे तर उद्या मंदीदेखील येऊ शकते. शेअर बाजार अस्थिर असतो. शेअर बाजार जेव्हा खूपच तेजीत असतो तेव्हा शेअर्सच्या किंमती खूपच वाढलेल्या असतात, तिथून त्या खाली येण्याचीही शक्यता असते. अशावेळी बाजारात सावधपणे पैसा गुंतवावा आणि असे शेअर्स जे चांगले आहेत मात्र ज्यांनी फारच उच्चांकी पातळी गाठलेली नाही असे शेअर्स शोधावेत.

२. अनावश्यक सल्ले किंवा माहिती

अलीकडे एसएमएस किंवा ब्रोकर किंवा जाहिरातींद्वारे कोणत्यातरी ब्रोकर किंवा कंपनी किंवा अॅपद्वारे गुंतवणुकीचा सल्ला दिला जातो. यात तुम्ही कसे भरपूर पैसे चटकन कमावू शकता हे सांगितलेले असते. अशा सल्ल्यांपासून सावध राहिले पाहिजे. या गोष्टींचे मोह टाळले पाहिजे. अनेकवेळा लोक स्वत: तर हे करतातच मात्र आपल्या जवळपासच्या लोकांनादेखील हे करण्यास सांगतात. अशा प्रकारे सल्ला देणारे तुम्हाला फसवू शकतात किंवा बाजारात ठराविक शेअर्सच्या किंमती वाढवण्याचा सापळा असू शकतो किंवा लोकांना मोहात पाडून सर्वसामान्य गुंतवणुकदारांकडून पैसे उकळण्याचाही प्रकार असू शकतो. अशा गोष्टींपासून तुम्ही लांब राहिले पाहिजे.

३. इंट्रा डे ट्रेडिंग करणे

शेअर बाजारात सर्वाधिक नशा कसा असेल तर इंट्रा डे ट्रेडिंग किंवा ट्रेडिंग करण्याचा. सकाळी शेअर घेऊन दुपारी विकून नफा कमावणे किंवा आज शेअर घेऊन दोन तीन दिवसात विकून नफा कमावणे, याचे जबरदस्त आकर्षण असते. ट्रेडिंग करण्यासाठी तुम्हाला शेअर बाजाराची चांगली माहिती हवी, चांगला अनुभव हवा. तुम्हाला बाजारातून पैसा कमवायचा असल्यास शेअर बाजारात थोडा काळ घालवा. यासाठी वेळ द्या. सुरूवातीला दीर्घकालीन गुंतवणुकीवरच लक्ष केंद्रीत करा. शेअर बाजारासाठीची समज विकसित झाल्यावरच हळूहळू ट्रेडिंग करण्यास सुरूवात करा. अन्यथा रोज थोडे थोडे करत तुम्ही मोठी रक्कम ट्रेडिंगमध्ये गमावून बसाल.

४. छोट्या शेअर्समधून झटपट मोठी कमाई करण्याचा मोह

शेअर बाजार जबरदस्त तेजीत असताना किंवा विक्रमी पातळीवर असताना अनेक छोटे शेअर्स किंवा साधारण शेअर्सच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होते. या शेअर्सची किंमत सुरूवातीला दहा रुपयांच्या आत असते. मात्र काही महिन्यातच किंवा आठवड्यात हे शेअर कित्येक पटींनी वाढतात. कमी किंमतीत मिळणारा शेअर वधारून त्याची किंमत खूप वाढेल आणि त्यामुळे छोट्या गुंतवणुकीतून आपण खूप पैसे कमावू असे गुंतवणुकदारांना वाटते. मात्र अशा शेअरची किंमत काही वेळा जाणीवपूर्वक देखील वाढवलेली असते. अशा शेअर्समध्ये गुंतवणूक करताना त्याची आर्थिक स्थिती आणि त्यातील प्रवर्तकांचा हिस्सा तपासून घ्या. सर्वसामान्य गुंतवणुकदारांनी अशा शेअर्सपासून जरा लांबच राहावे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी