नवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील दैनंदिन कामाची कृषी उपकरणांसंर्भात (Agriculture Machinery) नवनवीन घडामोडी घडत आहेत. दरम्यान, प्रदूषणानांचा सर्वांना त्रास होत असतो, त्यामुळे प्रदूषणावर मात करण्यासाठी, इलेक्ट्रिक आणि सौर उर्जेवर चालणारी उपकरणे तयार केली जात आहेत. (Electric or Solar Powered Equipment) आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा कृषी उपकरणाबद्दल सांगणार आहोत, जे प्रत्येक शेतकऱ्याकडे असणे आवश्यक आहेत शिवाय ते यंत्रे शेतीवरील खर्चदेखील कमी करतील.
शेतात वापरण्यात येणारी अनेक साधनेही डिझेल आणि विजेवर चालणारी असतात. यामुळे शेतकऱ्यांचा शेतीवरील खर्च वाढत असतो. सध्याची परिस्थिती पाहता इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. कमी खर्चात शेतीची कामेदेखील होणं शक्य नाही, शिवाय डिझेल पेट्रोल, रॉकेलमुळे वायू प्रदूषण होत असते. यावर पर्याय म्हणून भोपाळमधील केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्थेने सौरऊर्जेवर चालणारे यंत्र बनवले आहे.
तुमच्या माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, अलीकडेच केंद्रीय कृषी अभियांत्रिकी संस्था, भोपाळ (Central Institute of Agricultural Engineering, Bhopal) शास्त्रज्ञांनी सौरऊर्जेवर चालणारे ई-प्राइम मूव्हर उपकरण विकसित केले आहे. (e-Prime Mover Machine) डॉ.मनोजकुमार त्रिपाठी यांनी हे साधन बनवले आहे. ई-प्राइम मूव्हर डिव्हाइस (e-Prime Mover Device) यामुळे शेतकऱ्यांच्या इंधनाची बचत होण्यास मदत होईलच, त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठीही हे एक उत्तम पाऊल आहे. या उपकरणाच्या वापरामुळे शेतकऱ्यांना तण काढणे, रोप लावणे या कामासाठी तसेच औषध फवारणीसाठी कोणत्याही इंधनाची गरज भासत नाही. हे फक्त आणि फक्त सौर ऊर्जेवर चालेल ज्यामुळे याची विशेषता आणखी वाढते.
याशिवाय या कृषी यंत्राच्या बॅटरीचा वापर करून शेतकरी आपल्या घरात लाईटही लावू शकतात. तसेच ही बॅटरी दुसरीकडे वाहून नेता येते. ज्यामुळे शेतकऱ्याच्या श्रमाची बचत होईल. हे यंत्र बॅटरी क्षमतेसह, 2 क्विंटलपर्यंतचा भार सहज उचलू शकते.
विशेष म्हणजे येथील शास्त्रज्ञांनी ट्रॅक्टरसाठी सीएनजी इंजिन तयार केले आहे. डिझेल इंधन बदलून सीएनजी इंजिन वापरून शेतकरी त्यांच्या ट्रॅक्टरमधील इंधनाची बचत करू शकतात तसेच त्यांचा खर्च निम्मा करू शकतात. त्यामुळे शेतीचा खर्चही कमी होईल आणि पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होईल.