Dr. Babasaheb Ambedkar | रुपयाच्या प्रश्नावर बोलणारा जगातील पहिला अर्थतज्ज्ञ...डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Dr. Babasaheb Ambedkar | दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल (Contribution in Economics) फारसे बोलले जात नाही, लिहिले जात नाही. सोमवार ६ डिसेंबर २०२१ रोजी ६५वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021) आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ (World class distinguished Economist)होते ही गोष्ट अनेकांच्या विस्मरणातच गेली आहे.

Dr. Babasaheb Ambedkar, The Forgotten Economist
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विस्मरणात गेलेला एक थोर अर्थतज्ज्ञ 
थोडं पण कामाचं
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ
  • रुपयाच्या प्रश्नाची मांडणी करणारा जगातील पहिला अर्थतज्ज्ञ
  • युरोप, अमेरिकेसह जगाने घेतली होती अर्थशास्त्रीय ज्ञानाची दखल

Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021 | मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना आपण संविधान निर्माते (Constitution of India)म्हणून जाणतो. दलितांसाठी आणि मागासलेल्या समाजासाठी त्यांनी केलेल्या महान कार्याबद्दल नेहमीच बोलले जाते. परंतु दुर्दैवाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल (Contribution in Economics) फारसे बोलले जात नाही, लिहिले जात नाही. सोमवार ६ डिसेंबर २०२१ रोजी ६५वा महापरिनिर्वाण दिन (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan 2021) आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ (World class distinguished Economist)होते ही गोष्ट अनेकांच्या विस्मरणातच गेली आहे. आज जेव्हा आपण सातत्याने रुपया (Rupee) आणि डॉलर (Dollar) यांच्या मूल्याबद्दल बोलतो. आयात निर्यात, व्यापारी तूट यावर बोलतो. डॉलरच्या तुलनेत घसरणाऱ्या रुपयाच्या मूल्यावर चर्चा केली जाते. तेव्हा डॉ. आंबेडकरांचे अर्थशास्त्रीय काम हे अत्यंत समकालीन होऊन बसते. त्यांच्या कामाचे आणि ज्ञानाचे महत्त्व आजही तितकेच महत्त्वाचे ठरते. एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांनी रुपयाच्या प्रश्नावर केलेले विश्लेषण आणि हा प्रश्न, त्यावरील उत्तराची मांडणी त्यांच्यातील जबरदस्त अर्थतज्ज्ञाची जाणीव करून देतो. (Dr. Babasaheb Ambedkar, The Forgotten Economist who analyzed the problem of rupee a century ago)

युरोप आणि अमेरिकेनेदेखील घेतली होती दखल

डॉ. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. कायदेतज्ज्ञ, समाज सुधारक, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत इत्यादी. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील एका पैलूकडे त्यांच्या ज्ञानाच्या एका मोठ्या क्षेत्राकडे नेहमीच दुर्लक्ष होते ते म्हणजे अर्थशास्त्र. ते एक महान अर्थतज्ज्ञ होते हे आपण विसरून जातो. किंबहुना या दृष्टीने डॉ. आंबेडकरांचे विश्लेषण फारच कमी वेळा होते. त्यांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानाबद्दल, त्यांनी मांडलेल्या विविध सिद्धांताबद्दल, त्यांच्या अर्थशास्त्रीय शोद निबंधांबद्दल क्वचितच चर्चा केली जाते. महत्त्वाची बाब म्हणजे त्या अर्थशास्त्रीय सिद्धांताची गरज आज जास्त आहे. ते आज अधिक लागू पडतात. डॉ. आंबेडकरांच्या अर्थशास्त्रीय ज्ञानाची दखल त्यावेळी युरोप आणि अमेरिकेने घेतली होती. दुर्दैवाने त्यांचा हा पैलू भारतात मात्र उपेक्षितच राहिला आहे.

जागतिक दर्जाचा अर्थतज्ज्ञ

अर्थशास्त्र या विषयात रितसर विद्यापीठीय शिक्षण घेऊन पदवी मिळणवणाऱ्या सुरूवातीच्या मोजक्या भारतीयांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश आहे. किंबहुना त्या काळातील पहिला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा अर्थतज्ज्ञ म्हणजे डॉ. आंबेडकर यांचेच नाव पुढे येते. त्यांनी १९१७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र या विषयात पीएचडी मिळवली. त्यानंतर १९२१ मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेतून अर्थशास्त्रात डीएससी मिळवली. या दोन्ही संस्था जागतिक कीर्तीच्या संस्था होत्या आणि आहेत. त्या काळातील भारतासमोरील आर्थिक प्रश्न, चलनाचा प्रश्न, रुपयासमोरील आव्हाने, ब्रिटिशांनी लागू केलेल्या चलन व्यवस्थेमुळे भारताला तोंड द्यावी लागत असलेली संकटे यांची मांडणी करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आपल्या अर्थशास्त्रीय ज्ञानाचा पुरेपूर वापर केला. डॉ. आंबेडकरांनी पतधोरण, सार्वजनिक वित्तपुरवठा, शेतीचे अर्थशास्त्र, समाजातील आर्थिक व्यवस्था, देशाची अर्थव्यवस्था इत्यादी महत्त्वाच्या विषयांवर विपुल चिंतन आणि लेखन केले आहे.

रुपयाचा प्रश्न आणि त्याची उत्तरे मांडली

आज आपण सातत्याने जागतिक अर्थव्यवस्था, तिचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, आयात-निर्यात धोरण, पतधोरण, रिझर्व्ह बॅंकेचे धोरण, रुपयाचे डॉलरच्या तुलनेत असलेले मूल्य याबद्दल बोलतो. या विषयांबद्दल नेहमी चिंता व्यक्त होते. विशेषत: रुपया या भारतीय चलनाचे जगातील स्थान आणि त्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम हा विषय नेहमीच चर्चिला जातो. मात्र रुपयाच्या प्रश्नावर बोलणारा जगातील पहिला अर्थतज्ज्ञ कोण असेल तर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे होते. या विषयावरील त्यांचे पुस्तक आजही या विषयावरील जागतिक कीर्तीचे पुस्तक असून त्यातील चिंतन, त्यांनी सुचवलेले उपाय आजही लागू पडतात. या पुस्तकाचे नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी: इट्स ओरिजिन आणि इट्स सोल्यूशन (The Problem of Rupee: Its Origin and Its Solution)

आंतरराष्ट्रीय पातळीवर केली मांडणी

रुपयाच्या प्रश्नावर विवेचन करताना सोने हे प्रमाण मानून त्या आधारावर केलेली चलनाची रचना. सोने हे प्रमाण आणि सोन्याच्या विनियोगाचे प्रमाण या मुद्दयावर त्यांनी अतिशय गंभीर मुद्दे मांडले. त्यांचे हे मुद्दे त्यांनी हिल्टन यंग कमिशनसमोर मांडले होते. या मुद्द्यांची आणि विश्लेषणाची दखल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची स्थापना करतानादेखील घेण्यात आली होती. आपल्या मुद्द्यांची शास्त्रशुद्धपणे मांडणी करताना आणि विश्लेषण करताना डॉ. आंबेडकरांनी त्यावेळेचे जागतिक कीर्तीचे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ जॉन केन्स यांच्या सिध्दांतांनाही विरोध केला होता आणि तो सप्रमाण मांडून दाखवला होता. ब्रिटिशांच्या अर्थनितीमुळे रुपयासमोर आणि पर्यायाने भारतासमोर निर्माण झालेल्या आर्थिक संकटांची मांडणी डॉ. आंबेडकरांनी आपल्या या महान ग्रंथात केली होती. आजही ते विश्लेषण रुपयासमोरील प्रश्नांना तितकेच लागू पडते यातच या द्रष्ट्या अर्थतज्ज्ञाची महानता दडलेली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी