7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 46 टक्के DA, पगारात किती वाढ होणार?

7th Pay Commission: केंद्र सरकार डीएमध्ये वाढ करून केंद्रीय कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठी भेट देऊ शकते. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी डीएमध्ये जोरदार वाढ अपेक्षित आहे.

The government can increase this much DA for the next half year
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 46 टक्के DA, सरकार कधी देणार मोठी भेट?।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट
  • जानेवारी ते जून 2023 च्या पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये चार टक्क्यांनी वाढ
  • डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला.

7th Pay Commission:आगामी काळात सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखी एक मोठी भेट देऊ शकते. त्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे. या वर्षाच्या उत्तरार्धात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४६ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे. सरकारने जानेवारी ते जून 2023 च्या पहिल्या सहामाहीत महागाई भत्ता (DA) आणि महागाई मदत (DR) मध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. यानंतर डीए ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झाला. सरकार दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांचा डीए वाढवते. त्यामुळे पुढील वेळी चार टक्क्यांनी वाढ झाल्यास डीए ४६ टक्क्यांवर पोहोचेल, असा अंदाज आहे. (The government can increase this much DA for the next half year)

अधिक वाचा : सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर !, इंग्रजी, हिंदीसह मराठीतूनही CAPF ची परीक्षा देता येणार

दुसऱ्या सहामाहीसाठी म्हणजे जुलै ते डिसेंबर 2023, येत्या काही दिवसांत DA वाढीची घोषणा केली जाईल. यावेळी सरकार डीए वाढवण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ शकते, असे बोलले जात आहे. साधारणपणे सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये सरकार मान्यता देते. मात्र यावेळी ऑगस्टमध्ये घोषणा होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार डीएमध्ये वर्षातून दोनदा वाढ होते. पहिल्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अधिक वाचा : Credit Card Shopping: खरेदी करताना क्रेडिट कार्ड वापरण्याची सवय आहे? जाणून घ्या फायदे आणि तोटे

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के झाला तर त्यांच्या पगारातही वाढ होईल. समजा केंद्रीय कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे. 42 टक्के बघितले तर DA 7560 रुपये होतो. दुसरीकडे, जर डीए दुसऱ्या सहामाहीत 46 टक्क्यांपर्यंत वाढला तर तो 8,280 रुपये होईल. म्हणजेच पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. सरकारने 2022 च्या दुसऱ्या सहामाहीत डीएमध्ये चार टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे यंदाही एवढी वाढ अपेक्षित आहे. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी