Inflation in India : महागाईचा फटका; एका वर्षात वाढल्या खाण्या-पिण्याच्या वस्तूंच्या किमती, भाव आटोक्यात आणण्यात सरकार अपयशी

काम-धंदा
भरत जाधव
Updated Aug 10, 2022 | 08:28 IST

देशातील सामान्य नागरिकांना (citizens) आता जीवन जगणं महाग झाले आहे. खाद्यपदार्थांच्या (foods) सतत वाढत्या किमती पाहून नागरिकांची एकावेळची भाकरी (bread) बंद होण्याची शक्यता आहे. वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारचे (government) प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. मिठाच्या दरातही वाढ झाली आहे.

inflation, food prices rise sharply during the year
महागाईचा फटका, वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • तुरीची डाळ वर्षापूर्वी १०४ रुपये किलो होती, जी आता १०८ रुपये किलो झाली आहे.
  • १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी लागू झाल्यानंतर पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीत अचानक वाढ
  • वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे.

Inflation in India : देशातील सामान्य नागरिकांना (citizens) आता जीवन जगणं महाग झाले आहे. खाद्यपदार्थांच्या (foods) सतत वाढत्या किमती पाहून नागरिकांची एकावेळची भाकरी (bread) बंद होण्याची शक्यता आहे. वर्षभरात खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. सरकारचे (government) प्रयत्न करूनही भाव आटोक्यात येत नाहीत. मिठाच्या दरातही वाढ झाली आहे. ग्राहक मंत्रालयाच्या (Ministry of Consumer Affairs) आकडेवारीनुसार एका वर्षापूर्वी तांदळाची (rice) किंमत ३४.८६ रुपये प्रति किलो होती, ती आता ३७. ३८ रुपये झाली आहे. गहू (wheat) २५ रुपयांवरून ३०.६१ रुपये, तर पीठाची (flour) किमत २९.४७ रुपयांवरून ३५ रुपये किलो झाला आहे.

डाळींचे भावही वाढले 

तुरीची डाळ वर्षापूर्वी १०४ रुपये किलो होती, जी आता १०८ रुपये किलो झाली आहे. उडीद डाळ १०४ रुपयांवरून १०७ रुपये किलो, मसूर डाळ ८८ रुपयांवरून ९७ रुपये आणि दूध ४८.९७ रुपयांवरून ५२.४१ रुपये प्रतिलिटर झाले आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार किरकोळ महागाईचा दर अजूनही ६ टक्क्यांच्या वर राहील. ग्राहक मंत्रालयाने तेल कंपन्या आणि संघटनांना तेलाच्या किमती कमी करण्यासाठी अनेकदा आवाहन केले आहे. कंपन्यांचे म्हणणे आहे की ते सतत तेलाच्या किमती कमी करत आहेत. पण तरीही खुल्या बाजारात तेलाचे दर १५० रुपयांच्या वर आहेत.

  Read Also : मनोधैर्य योजनेकडे शासनाचं दुर्लक्ष, चित्रा वाघ यांचा आरोप

वस्तू     किमत (८ ऑगस्ट,22) किमत  ( ८ ऑगस्ट, 21)
शेंगदाणा  तेल    १८८     १७६
मोहरीचे  तेल  १७४   १६९ 
वनस्पती तेल   १५४      १३४
सोया तेल   ५७ १४८
सूर्यफूल तेल १८० १६६
बटाटा २८ २०
मीठ २०     १९

पीठ, मैदा आणि रवा निर्यातीसाठी गुणवत्ता प्रमाणपत्र आवश्यक

१३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर पीठाची निर्यात वाढली केंद्र सरकारने आता गव्हाचे पीठ, मैदा आणि रवा यांच्या निर्यातीला गुणवत्ता प्रमाणपत्र मंजूर करणे आवश्यक केले आहे. एका अधिसूचनेत म्हटले आहे की ही मंजुरी निर्यात तपासणी परिषदेकडून (Export Inspection Council) (EIC) मिळवावी लागेल. त्याची प्रमुख केंद्रे मुंबई, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता येथे आहेत. वास्तविक, १३ मे रोजी गव्हाच्या निर्यातीवर बंदी लागू झाल्यानंतर पीठ, मैदा आणि रव्याच्या निर्यातीत अचानक वाढ झाली होती.

Read Also : उत्तर महाराष्ट्राला एक नाही दोन नाही थेट पाच मंत्रिपदे

देशांतर्गत बाजारात पिठाच्या उपलब्धतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. यामुळे दरही वाढू शकतात. यावर मात करण्यासाठी १२ जुलै रोजी विदेशी व्यापार महासंचालनालयाने (DGFT) पीठ, मैदा आणि रवा यांच्या निर्यातीवरही बंदी घातली होती. या वस्तूंच्या निर्यातीसाठी आंतर-मंत्रिमंडळ गटाची परवानगी आवश्यक असेल.

वस्तूंच्या किमती कमी करण्याचा प्रयत्न

वस्तूंच्या किमती कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र, सरकार अपयशी ठरत असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव जास्त आहेत. किरकोळ चलनवाढीचा दर (CPI) जुलै २०२१ मध्ये ५.५९ टक्के होता, तो जून २०२२ मध्ये ७. ०१ टक्के होता. जुलैमध्ये त्यात किरकोळ घट अपेक्षित आहे. ते ६.६ टक्क्यांच्या आसपास राहू शकते, असे विश्लेषकांचे मत आहे. जुलैची आकडेवारी १२ ऑगस्टला जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी