Sovereign Gold Bond Scheme । मुंबई : महागाई कमी करण्यासाठी भारत सरकार आणि भारतीय रिजर्व बॅंक (RBI) सर्व प्रयत्न करत आहे. दरम्यान महागाईने सामान्य जनता देखीस त्रस्त झासी आहे, तर दुसरीकडे सरकारने जनतेला स्वस्तात सोने खरेदी करण्याची मोठी संधी दिली आहे. सार्वभौम गोल्ड बाँड योजना (SGB) आजपासून म्हणजेच २० जून २०२२ पासून गुंतवणुकीसाठी खुली करण्यात आली आहे. जर तुम्हालाही यात गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही कोणताही वेळ न घालवता यामध्ये गुंतवणूक करा. कारण या योजनेसाठी फक्त ५ दिवसांचा कालावधी आहे. लक्षणीय बाब म्हणजे चालू आर्थिक वर्षातील हा पहिला अंक आहे. (The Government of India is selling cheap gold under the Sovereign Gold Bond Scheme).
अधिक वाचा : Name Astrology: बेस्ट पार्टनर असतात या नावाचे लोक
दरम्यान, कोविड-१९ महासाथीच्या भीषण काळात, सार्वभौम गोल्ड बाँड योजनेत गुंतवणुकीकडे बरेच आकर्षण होते. खर तर कोरोनाच्या या कठीण काळात गुंतवणूकदार सुरक्षित पर्यायाच्या शोधात होते आणि त्यामुळे या सरकारी योजनेतील गुंतवणूक झपाट्याने वाढली होती. याशिवाय २०२०-२१ आणि २०२१-२२ मध्ये देशांतर्गत शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता होती. त्यामुळे गोल्ड बाँड अधिक आकर्षक राहिले. मागील दोन वर्षांमध्ये गोल्ड बॉंडची जेवढी विक्री झाली ती नोव्हेंबर २०१५ मध्ये योजना सुरू झाल्यापासून झालेल्या एकूण विक्रीच्या ते ७५ टक्के आहे.
सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या माध्यमातून तुम्हाला १ ग्रॅम सोनं ५,०९१ रूपयांमध्ये मिळेल. म्हणजेच १० ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला ५०,९१० एवढी रक्कम मोजावी लागेल.
जर तुम्ही यासाठी ऑनलाइन अर्ज केल्यास तुम्हाला सूट देखील मिळेल. ऑनलाइन अर्ज करणाऱ्या गुंतवणूकदारांना १ ग्रॅम सोन्यावर ५० रुपयांची सूट देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. म्हणजेच १ ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ५,०४१ रुपये मोजावे लागतील. लक्षणीय बाब म्हणजे यासाठी तुम्हाला डिजिटल माध्यमातूनच पेमेंट करावे लागेल.