Multibagger Stock : औषधांबरोबरच 'या' कंपनीचा शेअरदेखील विकत घेतला असता तर...गुंतवणुकदारांच्या 1 लाख रुपयांचे झाले 5 कोटी

Investment in Multibagger Stock : शेअर बाजारात (share market) औषध निर्मिती कंपन्यांनी दणकून कमाई करून दिली आहे. फार्मा कंपन्यांच्या (Pharma Company) शेअर्सनी मागील काही वर्षात जोरदार तेजी दाखवली आहे. आज आपण अशा शेअरबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शिवाय आता कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. या शेअरने लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे करोडो केले आहेत.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या औषध निर्मिती कंपनीचा पेनीस्टॉक झाला मल्टीबॅगर, दिला 55336.24% परतावा
  • 2 रुपयांच्या शेअरने गुंतवणुकदारांना कमावून दिले करोडो
  • एक लाखाचे झाले 5.54 कोटी रुपये

Multibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजारात (share market) औषध निर्मिती कंपन्यांनी दणकून कमाई करून दिली आहे. फार्मा कंपन्यांच्या (Pharma Company) शेअर्सनी मागील काही वर्षात जोरदार तेजी दाखवली आहे. आज आपण अशा शेअरबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. हा शेअर आहे- 'अजंता फार्मा' (Ajanta Pharma)या औषधनिर्मिती कंपनीचा. अजंता फार्माच्या समभागांनी दीर्घ कालावधीत त्यांच्या गुंतवणुकदारांना 55,336% पेक्षा जास्त चांगला परतावा दिला आहे. आता आज मंगळवारी कंपनीने बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. अजंता फार्माने मंगळवारी जाहीर केले की त्यांच्या संचालक मंडळाने आज झालेल्या बैठकीत बोनस इक्विटी शेअर्स 1:2 च्या प्रमाणात जारी करण्यास मान्यता दिली आहे. हे कंपनीच्या भागधारकांच्या मान्यतेच्या अधीन आहे. BSE वर अजंता फार्माचे शेअर्स जवळपास 4% घसरून 1,652.30 रुपयांवर बंद झाले. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Ajanta Pharma turned into Rs 5.5 crores)

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 3 रुपयांवरून पोचला 1300 रुपयांच्या पार, 1 लाखाचे झाले 5 कोटींपेक्षा जास्त...

गुंतवणुकदार झाले करोडपती

अजंता फार्माच्या शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती (Wealth Creation) निर्माण केली आहे. 28 मार्च 2003 ला अजंता फार्माचे शेअर्स NSE वर 2.98 रुपये प्रति शेअर (Share Price of Ajanta Pharma) या पातळीवर होते. सध्या या शेअरने 1600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. म्हणजेच, या अजंता फार्माच्या शेअरने या कालावधीत सुमारे 55336.24% परतावा दिला आहे. म्हणजेच 2003 मध्ये जर एखाद्या गुंतवणुकदाराने या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत गुंतवणूक तशीच ठेवली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आज जवळपास 5.54 कोटी रुपये झाले असते. हा शेअर एक जबरदस्त मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock)ठरला आहे. गुंतवणुकदारांनी या शेअरद्वारे अभूतपूर्व कमाई केली आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | या कंपनीचा शेअर 36 पैशांवरून पोचला 130 रुपयांवर...1 लाखाचे झाले 3.5 कोटी रुपये

कंपनीची कामगिरी आणि बोनस शेअरची घोषणा 

31 मार्च 2022 पर्यंत बोनस शेअर इश्यू  (Bonus Share) कंपनीच्या फ्री रिझर्व्हच्या बाहेर असेल म्हणजेच कंपनीच्या राखीव भांडवलातून बोनस शेअर देण्यात आलेला असेल असे कंपनीने म्हटले आहे. बोनस शेअर्स हे कंपनीने तिच्या विद्यमान भागधारकांना दिलेले अतिरिक्त शेअर्स पूर्ण भरलेले असतात. चौथ्या तिमाहीत (Q4FY22) कंपनीच्या कामकाजातून अजंता फार्माचा महसूल 870 कोटी रुपये इतका होता. तर गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला 757 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. कंपनीच्या महसूलात या कालावधीत 15% ची वाढ झाली आहे. मात्र याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 159 कोटी रुपयांवरून किंचित घटून 151 कोटी रुपयांवर आला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | टाटा समूहाचा हाच तो सुपरहिट शेअर जो 2.5 रुपयांवरून पोचला 2500 रुपयांच्या पुढे, बिग बुलची मोठी गुंतवणूक...

बोनस शेअर म्हणजे काय? (What is Bonus Share)

तुमच्या माहितीसाठी जेव्हा एखाद्या कंपनीला तिच्या व्यवसायातून अतिरिक्त नफा मिळतो, तेव्हा कंपनी त्या नफ्याच्या भांडवलाचा एक भाग तिच्या रिझर्व्ह आणि सरप्लसमध्ये राखून ठेवते म्हणजेच भांडवल बाजूला राखून ठेवते. भविष्यात, रिझर्व्ह आणि सरप्लसमधून, म्हणजे राखीव भांडवलातून कंपनी तिच्या गुंतवणुकदारांना अतिरिक्त शेअर्स जारी करते. हे शेअर्स आधीच बाजारात असलेल्या शेअरपेक्षा अतिरिक्त शेअर असतात. कंपनीचे शेअर्स आधीच विकत घेतलेल्या गुंतवणुकदारांना हे बोनस रुपात मिळतात. यामुळे त्यांच्याकडील शेअर्सची संख्या वाढते आणि तीही कोणताही पैसा खर्च न करता. गुंतवणुकदारांकडे आधीच असलेल्या कंपनीच्या शेअर्सच्या विशिष्ट प्रमाणात हे शेअर्स दिले जातात. यालाच बोनस शेअर म्हणतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी