Multibagger Stock | याड लागलं गं याड लागलं...हा शेअर पळायचा थांबेना, 27 पैशांवरून पोचला 30 रुपयांवर, शिवाय कंपनी देणार बोनस शेअरसुद्धा

Investment in Penny Stock : शेअर बाजारात मागील दीड दोन वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) ठरले आहेत. आज आपण एका अशा शेअरबद्दल जाणून घेऊया, ज्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अगदी काही पैशांना मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. हा पेनी स्टॉक एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) ठरला आहे. या पेनी स्टॉकने गेल्या काही वर्षांत तुफान परतावा दिला आहे.

Multibagger Penny stock
मल्टीबॅगर पेनी स्टॉक 
थोडं पण कामाचं
  • गुंतवणुकदारांना श्रीमंत बनवणारा सुपर डुपर पेनी स्टॉक
  • शेअरला लागतंय अप्पर सर्किट, तेजी थांबायचे नाव घेईना
  • एक लाखाच्या गुंतवणुकीने झाली करोडोंची कमाई

Multibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजारात मागील दीड दोन वर्षात अनेक शेअर मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) ठरले आहेत. आज आपण एका अशा शेअरबद्दल जाणून घेऊया, ज्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अगदी काही पैशांना मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. हा पेनी स्टॉक एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) ठरला आहे. या पेनी स्टॉकने गेल्या काही वर्षांत तुफान परतावा दिला आहे. हा सुपरहिट शेअर आहे ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजचा (Ducon Infratechnologies Ltd) या कंपनीचा. या कंपनीचे शेअरची किंमत 27 पैशांवरून वाढून आता 30.40 रुपये झाली आहे. शिवाय ही कंपनी आता आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स (Bonus Shares)देखील देणार आहे. बोनस इश्यूच्या रेकॉर्ड डेटच्या आधी कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 4.10 टक्क्यांनी वाढ होत ते 30.40 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचले. कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 11,159 टक्क्यांचा कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Ducon Infratechnologies Ltd turned into Rs 1.02 crores)

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

1 लाख रुपयांचे झाले 1 कोटी रुपये

ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज लि.च्या शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. मुंबई शेअर बाजारात (BSE) 23 मे 2014 ला ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​शेअरची (Share Price of Ducon Infratechnologies Limited) किंमत  27 पैशांच्या पातळीवर होती. तर 19 एप्रिल 2022 ला कंपनीचे शेअरची किंमत 30.40 रुपयांवर पोचली आहे. जर एखाद्या व्यक्तीने 23 मे 2014 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि ती गुंतवणूक तशीच कायम ठेवली असती, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 1.12 कोटी रुपये झाले असते. ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजच्या शेअर्सचा 52 आठवड्यांची नीचांक पातळी 5.48 रुपये प्रति शेअर इतकी आहे. त्याच वेळी या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 29.50 रुपये प्रति शेअर इतकी आहे. आज या शेअरला अप्पर सर्किट लागत शेअरची किंमत 30.40 रुपयांवर पोचली आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 36 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर...एका वर्षात 50 हजाराचे झाले 1.11 कोटी

2 वर्षात शेअरने दिला तुफान परतावा 

मुंबई शेअर बाजारात 3 एप्रिल 2020 ला ड्युकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज लि.चे (Ducon Infratechnologies Ltd)शेअर्स 2.22 रुपयांच्या पातळीवर होते. यात तेजी येत कंपनीचे शेअर्स 19 एप्रिल 2022 ला 30.40 रुपयांवर बंद झाले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 12.50 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते. ड्यूकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 340 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. त्याचबरोबर या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरने 35 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. मागील 6 महिन्यांत शेअरने 140 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

कंपनी देणार बोनस शेअर

ड्यूकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीज लिमिटेड त्यांच्या गुंतवणुकदारांना 1:10 च्या प्रमाणात बोनस शेअर्स जारी करणार आहे. बोनस शेअर जारी करण्याची रेकॉर्ड तारीख 19 एप्रिल 2022 ही आहे. म्हणजे या तारखेला ज्या गुंतवणुकदारांकडे या कंपनीचे जितक्या प्रमाणात शेअर्स असतील तितक्या प्रमाणात कंपनी त्यांना बोनस शेअर देईल. बोनस शेअर्स हे कंपनीकडून गुंतवणुकदारांना मोफत दिले जाणारे शेअर्स असतात. यामुळे गुंतवणुकदारांकडे असलेल्या शेअर्सच्या संख्येत वाढ होते. जास्त शेअर्स म्हणजे जास्त पैसा. ड्यूकॉन इन्फ्राटेक्नॉलॉजीजचे बाजार भागभांडवल सुमारे 632.3 कोटी रुपये इतके आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी