Multibagger Stock | हा शेअर 36 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर...एका वर्षात 50 हजाराचे झाले 1.11 कोटी

Investment in Penny Stock : पेनी स्टॉकमध्ये (Penny Stock) गुंतवणूक करणे धोक्याचे असले तरी कंपनीच्या मूलभूत गोष्टी आणि आर्थिक स्थिती भक्कम असेल तर यातील गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. हा शेअर या वर्षातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger Stock) एक आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या फक्त काही पैशांमध्येे मिळणाऱ्या पेनी स्टॉकने उडवून दिली धमाल
  • फक्त छोट्याशा शेअरने एकाच वर्षात दिला 22,219 टक्क्यांहून अधिक परतावा
  • हजारांच्या गुंतवणुकीचे झाले करोडो रुपये

Multibagger Penny Stock : मुंबई : पेनी स्टॉकमध्ये (Penny Stock)गुंतवणूक करणे धोक्याचे असले तरी कंपनीच्या मूलभूत गोष्टी आणि आर्थिक स्थिती भक्कम असेल तर यातील गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. आज आम्‍ही तुम्‍हाला एका अशा शेअरबद्दल सांगत आहोत, ज्या शेअरने अवघ्या एका वर्षात गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या शेअरचे नाव आहे - कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation Ltd). हा शेअर या वर्षातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी (Multibagger Stock) एक आहे. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरच्या किंमतीने गेल्या एका वर्षात तब्बल 22,219 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. या वर्षी देखील, स्टॉकने आतापर्यंत 2,651% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Kaiser Corporation Ltd turned into Rs 1.11 crore  in 1 year)

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरचा ट्रेंड 

कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरने मागील 12 महिन्यांच्या कालावधीत तुफान घोडदौड केली आहे. कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​शेअर्स 5 मे 2021 ला मुंबईत शेअर बाजारात 36 पैसे प्रति शेअर या पातळीवर होते. फक्त एका वर्षात या शेअरची किंमत 80.35 रुपयांवर पोचली आहे. या कालावधीत, त्याने आपल्या गुंतवणुकदारांना 22,219.44% चा मजबूत परतावा दिला आहे. त्याच वेळी गेल्या सहा महिन्यांत हा स्टॉक 44 पैशांवरून 80.35 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 18,161.36% परतावा दिला. त्याचप्रमाणे, यावर्षी 2,651.71% परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2.92 रुपयांच्या पातळीवर होते. त्याच वेळी, गेल्या एका महिन्यात हा स्टॉक 33.70 रुपयांवरून 80.35 रु. पर्यंत वाढला. म्हणजेच या शेअरने एका महिन्यात 138.43% परतावा दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 21.37% वाढला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

गुंतवणुकदार झाले करोडपती

कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या या मल्टीबॅगर शेअरमध्ये एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी 36 पैसे दराने 50 हजार रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक आजपर्यंत टिकवली असती तर आज ही रक्कम 1.11 कोटी  रुपये झाली असती. त्याच वेळी, 50 हजार रुपयांची गुंतवणूक 6 महिन्यांत 91.30 लाख रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे या वर्षी एखाद्या गुंतवणुकदाराने या शेअरमध्ये 2.92 रुपये प्रतिशेअर दराने 50 हजार रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 13 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, 50 हजार रुपयांची गुंतवणूक एका महिन्यात 1.19 लाख रुपये झाली असेल.

अधिक वाचा : Multibagger Stock | 20 पैशांच्या शेअरचा धुमाकूळ...तेजी थांबता थांबेना...लागतेय अप्पर सर्किट...गुंतवणुकदारांची कमाई थांबेना

कंपनी काय करते

कैसर कॉर्पोरेशनची स्थापना सप्टेंबर 1993 मध्ये मुंबईत झाली. 15 मार्च 1995 रोजी कंपनीचे रूपांतर कैसर प्रेस लिमिटेड या नावाने पब्लिक लिमिटेड कंपनीत करण्यात आले. 5 नोव्हेंबर 2013 रोजी कंपनीचे नाव बदलून "कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड" असे करण्यात आले. कैसर कॉर्पोरेशन लि. (Kaiser Corporation Limited) (KCL) लेबल, स्टेशनरी लेख, मासिके आणि कार्टन्सच्या व्यवसायात गुंतलेली आहे. KCL तिच्या उपकंपन्यांद्वारे अभियांत्रिकी वस्तू, इलेक्ट्रिक आणि मेकॅनिकल हीट ट्रेसिंग आणि टर्नकी प्रकल्पांमध्ये देखील व्यवहार करते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी