Multibagger Penny Stock Investment : मुंबई : आपण अशा एका स्टॉकबद्दल पाहत आहोत ज्याने अवघ्या सहा महिन्यांत बंपर परतावा देऊन गुंतवणुकदारांना श्रीमंत केले आहे. गुंतवणुकदार शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवून करोडपती देखील होऊ शकतात. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखमीची असते मात्र जर ती योग्य ठरली तर तुफान कमाईची संधी मिळते. असा एक सुपर डुपर शेअर आहे कैसर कॉर्पोरेशन लिमिटेड (Kaiser Corporation Ltd.) या कंपनीचा. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअरने सहा महिन्यांत त्यांच्या गुंतवणुकदारांना थोडाथोडका नव्हे तर तब्बल 6,142.27 टक्क्यांचा मजबूत परतावा दिला आहे. अजूनही कंपनीचा शेअर तेजी दाखवतो आहे आणि 4.94% वाढ नोंदवून 60.55 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करतो आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Kaiser Corporation Ltd turned into Rs 62 Lakhs)
अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडचे शेअर्स गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये सातत्याने घसरत होते. गेल्या एका महिन्यात तो 46.34% घसरला आहे. मात्र, आज कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून आली. सहा महिन्यांपूर्वी या शेअरची किंमत (Share price of Kaiser Corporation Ltd.) मुंबई शेअर बाजारात फक्त 95 पैसे होती, जी आता 60.55 रुपये झाली आहे. या कालावधीत या पेनी स्टॉकने 6,142 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. त्याच वेळी, या वर्षी आतापर्यत कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या समभागांनी आतापर्यंत 1,973.63% परतावा दिला आहे. या काळात हा शेअर 2.92 रुपयांवरून 60.55 रुपयांपर्यंत वाढला आहे.
अधिक वाचा : Multibagger Stock : टाटांच्या या शेअरबद्दल माहित आहे का? गुंतवणुकदार झाले करोडपती, लाखाचे झाले करोडो...
कैसर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीच्या ट्रेंडनुसार जर एखाद्या गुंतवणुकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज ही रक्कम 62.42 लाख रुपये झाली असती. त्याच वेळी, जर एखाद्या गुंतवणुकदाराने या वर्षी 2022 मध्ये या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य आतापर्यंत 20.73 लाख रुपये झाले असते.
या शेअरने जरी अल्पावधीत गुंतवणुकदारांना मालामाल केले असले. तरी दीर्घकालीन गुंतवणुकीचे आणि संयमाचे आपले एक वैशिष्ट्य आणि महत्त्व असते. शेअर बाजारात याची नेहमीच प्रचिती येत असते. त्यामुळे गुंतवणूक करताना नेहमी दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवूनच गुंतवणूक केली पाहिजे.
पेनी स्टॉकमधील गुंतवणूक ही खूप जोखमीची असते. यात प्रचंड चढउतार होत असतात. त्यामुळे तुमची जोखीम क्षमता लक्षात घेऊनच या प्रकारच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली पाहिजे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)