Multibagger Stock | या कंपनीचा शेअर 36 पैशांवरून पोचला 130 रुपयांवर...1 लाखाचे झाले 3.5 कोटी रुपये

Investment in Penny Stock : शेअर बाजारात मागील काही कालावधीत अनेक शेअर्स मल्टीबॅगर (Multibagger Stock) ठरले आहेत. आज आपण एका अशा शेअरबद्दल जाणून घेऊया, ज्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अगदी काही पैशांना मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. हा पेनी स्टॉक एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) ठरला आहे. हा शेअर 36 पैशांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • छोटासा पेनीस्टॉक बनला मल्टीबॅगर शेअर, पैसे कमावून देणारी मशीन
  • या शेअरने गुंतवणुकदारांना दिला 36,000 टक्क्यांहून अधिक परतावा
  • एक लाखाच्या गुंतवणकीचे झाले 3.5 कोटी रुपये

Multibagger Penny Stock : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) मागील काही कालावधीत अनेक शेअर्स मल्टीबॅगर  (Multibagger Stock) ठरले आहेत. आज आपण एका अशा शेअरबद्दल जाणून घेऊया, ज्या शेअरने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. अगदी काही पैशांना मिळणाऱ्या या शेअरने गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. हा पेनी स्टॉक एक मल्टीबॅगर पेनी स्टॉक (Multibagger Penny Stock) ठरला आहे. कमी किमतीच्या स्टॉकने जबरदस्त परतावा दिला आहे. हा शेअर 36 पैशांवरून 130 रुपयांपर्यंत वाढला आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक कैसर कॉर्पोरेशन (Kaiser Corporation)या कंपनीचा आहे. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षात गुंतवणुकदारांना 36,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांनी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले ते श्रीमंत झाले आहेत. कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सचा 52 आठवड्यांचा नीचांक 35 पैसे आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Kaiser Corporation turned into Rs 3.5 crores)

अधिक वाचा : Multibagger Stock | टाटा समूहाचा हाच तो सुपरहिट शेअर जो 2.5 रुपयांवरून पोचला 2500 रुपयांच्या पुढे, बिग बुलची मोठी गुंतवणूक...

एक लाखाचे 3.5 कोटी रुपये

या सुपर डुपर शेअरमध्ये ज्यांनी 1 लाख लावले त्यांनी 3.5 कोटींहून अधिक कमावले आहेत. कैसर कॉर्पोरेशनचे शेअर्स (Share Price of Kaiser Corporation) 5 मे 2021 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 36 पैशांच्या पातळीवर होते. 29 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 130.55 च्या पातळीवर पोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी एका वर्षापेक्षा कमी कालावधीत गुंतवणुकदारांना 36,163 टक्के परतावा दिला आहे. एखाद्या व्यक्तीने वर्षभरापूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक टिकवून ठेवली असती तर आज तो श्रीमंत झाला असता. कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांची किंमत 3.6 कोटी रुपयांच्या जवळपास असेल. या चिल्लर शेअरने गुंतवणुकदारांसाठी मोठी संपत्ती निर्माण (Wealth Creation) केली आहे. गुंतवणुकदारांनी यातून आयुष्यभराची कमाई केली आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

छप्परफाड परतावा देणारा शेअर

कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी या वर्षी आतापर्यंत 4,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 रोजी कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 2.92 रुपयांच्या पातळीवर होते. ते वाढून 29 एप्रिल 2022 ला 130.55 रुपयांवर पोचले आहेत. एखाद्या व्यक्तीने वर्षाच्या सुरुवातीला कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या ही गुंतवणूक 44.70 लाख रुपयांच्या जवळपास पोचली असती. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 6 वर्षात 23,212 टक्के परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या 1 महिन्यात कैसर कॉर्पोरेशनच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना 175 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 36 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर...एका वर्षात 50 हजाराचे झाले 1.11 कोटी

पेनी स्टॉक हे अतिशय कमी किंमतीचे साधारणपणे 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शेअर असतात. यातील गुंतवणूक प्रचंड परतावा मिळवून देत तुफान कमाई करू देऊ शकते. मात्र पेनी स्टॉक मधील गुंतवणूक अतिशय जोखमीची असते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी यासंदर्भात भान राखणे महत्त्वाचे ठरते. कारण त्यात नुकसानदेखील होऊ शकते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी