Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

Penny Stock Investment : जर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका उत्कृष्ट पेनी स्टॉकबद्दल सांगत आहोत. सध्या शेअर बाजारात (Share Market) पेनी स्टॉकने धमाल उडवून दिली आहे. एका वर्षात या छोट्याशा शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,952 टक्क्यांहून अधिक परतावा देऊन श्रीमंत केले आहे. या स्टॉकने केवळ 39 ट्रेडिंग दिवसांत 590.37 टक्के स्टॉक परतावा देऊन गुंतवणूकदारांना थक्क केले आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • छोट्याशा शेअरने दिला 3,952 टक्के परतावा
  • पेनी स्टॉकने गुंतवणुकदारांना वर्षभरातच केले मालामाल
  • फक्त 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य झाले जवळपास 40 लाख रुपये

Multibagger Penny Stock : मुंबई : जर तुम्ही पेनी स्टॉक (Penny Stock) शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला एका उत्कृष्ट पेनी स्टॉकबद्दल सांगत आहोत. सध्या शेअर बाजारात (Share Market) पेनी स्टॉकने धमाल उडवून दिली आहे. एका वर्षात या छोट्याशा शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 3,952 टक्क्यांहून अधिक परतावा देऊन श्रीमंत केले आहे.  हा पेनी स्टॉक मल्टीबॅगर (Multibagger Stock) बनला आहे. त्याच वेळी, या स्टॉकने केवळ 39 ट्रेडिंग दिवसांत 590.37 टक्के स्टॉक परतावा देऊन गुंतवणूकदारांना थक्क केले आहे. या शेअरचे नाव आहे- राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. (Raj Rayon Industries Ltd).शुक्रवारी कंपनीचे शेअर्स जवळपास 5 टक्क्यांनी वाढून 9.32 रुपयांवर पोहोचले.  (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Raj Rayon Industries Ltd turned into Rs 40 Lakhs in 1 year)

अधिक वाचा : Multibagger Stock : औषधांबरोबरच 'या' कंपनीचा शेअरदेखील विकत घेतला असता तर...गुंतवणुकदारांच्या 1 लाख रुपयांचे झाले 5 कोटी

राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअरचा ट्रेंड 

थोड्याच अवधीत राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअरने जबरदस्त घोडदौड केली आहे. 16 मार्च 2022 रोजी राज रेयॉन इंडस्ट्रीजचे शेअर्स (Share price of Raj Rayon Industries Ltd))अवघ्या 1.35 रुपयांच्या पातळीवर होते. 13 मे रोजी कंपनीच्या समभागांनी प्रति शेअर 9.32 रुपयांची पातळी गाठली आहे. म्हणजेच, केवळ 39 ट्रेडिंग सत्रांमध्ये, या समभागाने 590% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. त्याच वेळी, हा शेअर एका महिन्यात 3.59 रुपयांवरून 8.88 रुपयांपर्यंत वाढला. गेल्या एका महिन्यात स्टॉकने 136.55% परतावा दिला आहे. गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये स्टॉक 21.35% वाढला आहे. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) गुंतवणुकदारांना मालमाल करून टाकले आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 3 रुपयांवरून पोचला 1300 रुपयांच्या पार, 1 लाखाचे झाले 5 कोटींपेक्षा जास्त... 

गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले 40 लाख

राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या (Raj Rayon Industries Ltd) शेअरच्या किंमतीच्या इतिहासानुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 39 दिवसांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याला आज 6.90 लाख रुपयांचा नफा झाला असता. म्हणजेच एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य एका महिन्यात 2.59 लाख रुपये झाली. गेल्या एका वर्षात स्टॉकने 3,952.17 चा परतावा दिला आहे. वर्षभरापूर्वी शेअरची किंमत केवळ 23 पैसे होती. म्हणजेच वर्षभरापूर्वी राज रेयॉन इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये गुंतवलेल्या 1 लाख रुपयांचे मूल्य आज जवळपास 40 लाख रुपये झाले आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | या कंपनीचा शेअर 36 पैशांवरून पोचला 130 रुपयांवर...1 लाखाचे झाले 3.5 कोटी रुपये

पेनी स्टॉक हे अतिशय कमी किंमतीचे साधारणपणे 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शेअर असतात. यातील गुंतवणूक प्रचंड परतावा मिळवून देत तुफान कमाई करू देऊ शकते. मात्र पेनी स्टॉक मधील गुंतवणूक अतिशय जोखमीची असते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी यासंदर्भात भान राखणे महत्त्वाचे ठरते. कारण त्यात नुकसानदेखील होऊ शकते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी