Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

Investment in Multibagger Penny Stock : आपण अशा जबरदस्त शेअरबद्दल जाणून घेऊया ज्याने गुंतवणुकदारांना अभूतपूर्व कमाई करून दिली आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना फक्त दोन वर्षांच्या कालावधीतच श्रीमंत म्हणजे करोडपती (Wealth creation)बनवले आहे. शेअर बाजारात (Share Market) अशा मल्टीबॅगर शेअर्सकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock)गुंतवणुकदारांना दोन वर्षांत तब्बल 1,65,375% चा परतावा दिला आहे.

Multibagger Penny Stock
मल्टीबॅगर पेनी स्टॉक 
थोडं पण कामाचं
  • फक्त 40 पैशांच्या शेअरने एकाच वर्षात दिला 1, 65, 37 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
  • गुंतवणुकदार झाले करोडपती, खिसेभरून कमाईच कमाई
  • फक्त एक लाख गुंतवणून झाली करोडोंची कमाई

Multibagger Penny Stock in 2022 : मुंबई :आपण अशा जबरदस्त शेअरबद्दल जाणून घेऊया ज्याने गुंतवणुकदारांना अभूतपूर्व कमाई करून दिली आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना फक्त दोन वर्षांच्या कालावधीतच श्रीमंत म्हणजे करोडपती (Wealth creation)बनवले आहे. शेअर बाजारात (Share Market) अशा मल्टीबॅगर शेअर्सकडे गुंतवणुकदारांचे लक्ष लागलेले आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock)गुंतवणुकदारांना दोन वर्षांत तब्बल 1,65,375% चा परतावा दिला आहे. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की हा शेअर आहे तरी कोणता? तर हा शेअर आहे एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लि. (SEL Manufacturing Company Limited)या कंपनीच्या शेअरने आपल्या जबरदस्त परताव्याने गुंतवणूकदारांना आश्चर्याने तोंडात बोटे घालायला लावली आहेत. कंपनीचा शेअर गेल्या काही ट्रेडिंग सत्रांमध्ये सातत्याने अप्पर सर्किटला धडकतो आहे. सध्यादेखील हा शेअर मुंबई शेअर बाजारात (BSE) 5 टक्क्यांनी वाढून 661.90 रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of SEL Manufacturing Company Limited turned  into  Rs 16 crore lakhs in 2 years)

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्समध्ये अजूनही तेजी दिसून येते आहे.

कल्पनेपलीकडचा तुफान परतावा

गेल्या 2 वर्षांतील शेअरच्या किंमतीचा ट्रेंड पाहता एसईएल मॅन्युफॅक्चरिंगच्या (SEL Manufacturing) शेअर्सनी आश्चर्यकारक परतावा दिला आहे. दोन वर्षांपूर्वी, 9 एप्रिल 2020 ला, कंपनीचे शेअर्स बीएसईवर 40 पैशांच्या (Share Price of SEL Manufacturing)किंमतीवर होते. जबरदस्त तेजी नोंदवत हा शेअर 13 एप्रिल 2022 ला 661.90 रुपयांच्या पातळीवर पोचला आहे. या कालावधीत या शेअरने 1,65,375% चा मजबूत परतावा दिला आहे. त्याच वेळी, गेल्या सहा महिन्यांत, SEL मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे शेअर्स 5.01 रुपये प्रति शेअरवरून 661.90 रुपयांपर्यंत वाढले आहेत. या कालावधीत शेअरने 13,111% परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 20 पैशांच्या शेअरचा धुमाकूळ...तेजी थांबता थांबेना...लागतेय अप्पर सर्किट...गुंतवणुकदारांची कमाई थांबेना

त्याच वेळी या वर्षी आतापर्यत या स्टॉकने आतापर्यंत 1,575.70% परतावा दिला आहे. 3 जानेवारी 2022 ला या शेअरची किंमत 39.50 रुपये रुपये प्रति शेअर इतकी होती. गेल्या एका महिन्याबद्दल बोलायचे झाले तर हा स्टॉक 275.30 रुपयांवरून 661.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. या कालावधीत त्याने 140% परतावा दिला आहे. या शेअरने मागील पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये तब्बल 22% परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

एक लाखाचे झाले 16 कोटी रुपये

एसईएल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीच्या ट्रेंडनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने दोन वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक 40 पैसे प्रति शेअर या दराने केली असेल आणि आजपर्यंत गुंतवणूक तशीच ठेवली असेल तर आता ही रक्कम 16.54 कोटी रुपये झाली असेल. त्याचप्रमाणे, एखाद्या गुंतवणूकदाराने या शेअरमध्ये सहा महिन्यांपूर्वी 5.01 रुपये प्रति शेअर प्रमाणे 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज या रकमेतून 1.32 कोटी रुपयांची कमाई झाली. त्याचप्रमाणे या वर्षात ही गुंतवणूक 16.75 लाख रुपये झाली असती. एका महिन्यात या शेअरमधील 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 2.40 लाख रुपये झाले असते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी