Multibagger Penny Stock : मुंबई : तान्ला प्लॅटफॉर्मच्या (Tanla Platforms) शेअर्सनी जबरदस्त परतावा दिला आहे. कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत लोकांना श्रीमंत केले आहे. तान्ला प्लॅटफॉर्मचे शेअर्स आता 3 रुपयांवरून 1300 रुपयांच्या पुढे गेले आहेत. काही वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअरमध्ये केवळ 1 लाख रुपये गुंतवणारे गुंतवणुकदार आता करोडपती झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या समभागांनी 45,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. तान्ला प्लॅटफॉर्मचे (Tanla Platform) नाव पूर्वी तान्ला सोल्यूशन्स ( Tanla Solutions)असे नाव होते. या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे करोडपती झाले आहेत. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Tanla Platforms turned into Rs 5 crores)
पेनी स्टॉक हे अतिशय कमी किंमतीचे साधारणपणे 10 रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शेअर असतात. यातील गुंतवणूक प्रचंड परतावा मिळवून देत तुफान कमाई करू देऊ शकते. मात्र पेनी स्टॉक मधील गुंतवणूक अतिशय जोखमीची असते. त्यामुळे गुंतवणुकदारांनी यासंदर्भात भान राखणे महत्त्वाचे ठरते. कारण त्यात नुकसानदेखील होऊ शकते.
अधिक वाचा : Multibagger Stock | या कंपनीचा शेअर 36 पैशांवरून पोचला 130 रुपयांवर...1 लाखाचे झाले 3.5 कोटी रुपये
2 ऑगस्ट 2013 ला तान्ला प्लॅटफॉर्मचे शेअर्स (Share Price of Tanla Platforms)बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 2.67 रुपयांच्या पातळीवर होते. 6 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1,375 रुपयांच्या पातळीवर होते. कंपनीच्या समभागांनी 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत 45,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 2 ऑगस्ट 2013 रोजी तन्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि आपली गुंतवणूक ठेवली असती, तर या गुंतवणुकीचे मूल्य आज 5.14 कोटी रुपये झाले असते.
तन्ला प्लॅटफॉर्मच्या शेअर्सने गेल्या पाच वर्षांत गुंतवणुकदारांना जवळपास 2,610 टक्के परतावा दिला आहे. 12 मे 2017 रोजी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये कंपनीचे शेअर्स 50.70 रुपये होते. 6 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स BSE वर 1375 रुपयांच्या पातळीवर आहेत. जर एखाद्या व्यक्तीने 5 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर याचे मूल्य आज 27 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.
Tanla Platforms समभागांचा 52 आठवड्यांचा नीचांक 735 रुपये आहे. त्याच वेळी, कंपनीच्या समभागांची 52 आठवड्यांची उच्च पातळी 2,094.40 रुपये आहे. कंपनीचे बाजारमूल्य म्हणजे मार्केट कॅप 18,657 कोटी रुपयांच्या जवळपास आहे. कंपनीच्या समभागांनी या वर्षी आतापर्यंत गुंतवणुकदारांना 25 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. त्याचवेळी, गेल्या 1 वर्षात कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना सुमारे 55 टक्के परतावा दिला आहे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)