Multibagger Stock : टाटांच्या या शेअरबद्दल माहित आहे का? गुंतवणुकदार झाले करोडपती, लाखाचे झाले करोडो...

Share Market Investment : गुंतवणुकदार शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवून करोडपती देखील होऊ शकतात. शेअर बाजारातून कमाई करण्यासाठी तुम्ही संयमाने गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकालावधीत चांगल्या कंपनीचा शेअर तुम्हाला आयुष्यभरातीच कमाई करून देऊ शकतो. टाटा समूहाच्या (Tata Group) अशाच एका कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांसाठी संपत्ती निर्माण (Wealth Creation) केली आहे. गुंतवणुकदारांनी अक्षरश: तुफान कमाई केली आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • टाटा समूहाच्या या शेअरने दिला 14102% परतावा
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले दीड कोटी
  • गुंतवणुकदारांनी केली आयुष्यभराची कमाई

Multibagger Stock Investment : मुंबई : गुंतवणुकदार शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवून करोडपती देखील होऊ शकतात. शेअर बाजारातून कमाई करण्यासाठी तुम्ही संयमाने गुंतवणूक केली पाहिजे. दीर्घकालावधीत चांगल्या कंपनीचा शेअर तुम्हाला आयुष्यभरातीच कमाई करून देऊ शकतो. टाटा समूहाच्या (Tata Group) अशाच एका कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांसाठी संपत्ती निर्माण (Wealth Creation) केली आहे. गुंतवणुकदारांनी अक्षरश: तुफान कमाई केली आहे. हा शेअर आहे टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा एलेक्झी (Tata Elxsi) या कंपनीचा. हा एक मल्टीबॅगर स्टॉक (Multibagger Stock)बनला आहे. या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. टाटा समूहाच्या या शेअरने मागील 13 वर्षांत त्याच्या गुंतवणुकदारांना 14,102% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. ज्यांनी दीर्घकालावधीसाठी पैसा गुंतवला त्यांना करोडोंचा फायदा झाला आहे. (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Tata Elxsi turned into Rs 1.42 Crore Lakhs)

अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

फक्त 59.20 रुपयांचा शेअर झाला 8,408.55 रुपयांचा 

टाटा एलेक्झीच्या शेअरने जबरदस्त घोडदौड केली आहे. 8 मे 2009 ला टाटा अलेक्सईच्या शेअरची BSE वर किंमत (Share Price of Tata Elxsi) 59.20 प्रति शेअर इतकी होती. तर 20 मे 2022 ला टाटा एलेक्झीचा शेअर BSE वर 8,408.55 रुपयांच्या पातळीवर पोचला होता. या कालावधीत कंपनीच्या शेअरने सुमारे 14,102.7% परतावा दिला आहे. या मल्टीबॅगर शेअरने (Multibagger Stock) पाच वर्षांत 1,137.19% परतावा दिला आहे. या कालावधीत हा शेअर 679.65 रुपयांवरून 8,408.55 रुपयांपर्यंत पोचला आहे. त्याच वेळी, गेल्या एका वर्षात हा शेअर 3568 रुपयांवरून 8,408.55 रुपये प्रति शेअरच्या पातळीपर्यंत वाढला आहे. या कालावधीत या तुफानी शेअरने 135.62% परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock : औषधांबरोबरच 'या' कंपनीचा शेअरदेखील विकत घेतला असता तर...गुंतवणुकदारांच्या 1 लाख रुपयांचे झाले 5 कोटी

गुंतवणुकदार झाले करोडपती 

टाटा एलेक्झीच्या (Tata Elxsi) शेअर किंमत चार्ट पॅटर्ननुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने 13 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये  59.20 रुपये प्रति शेअर दराने एक लाख रुपये गुंतवले असते आणि आजपर्यंत त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर आज या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 1.42 कोटी रुपये झाले असते. दुसरीकडे, पाच वर्षांपूर्वी जर एखाद्याने या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे 12.37 लाख रुपये झाले असते. तर गेल्या एका वर्षात, या स्टॉकने 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे 2.35 लाख रुपये केले आहेत.

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 3 रुपयांवरून पोचला 1300 रुपयांच्या पार, 1 लाखाचे झाले 5 कोटींपेक्षा जास्त... 

दीर्घकालीन गुंतवणुकीचे आणि संयमाचे आपले एक वैशिष्ट्य आणि महत्त्व असते. शेअर बाजारात याची नेहमीच प्रचिती येत असते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी