Multibagger Stock | टाटा समूहाचा हाच तो सुपरहिट शेअर जो 2.5 रुपयांवरून पोचला 2500 रुपयांच्या पुढे, बिग बुलची मोठी गुंतवणूक...

Rakesh Jhunjhunwala Investment : शेअर बाजारात (Share Market) असो कि उद्योगविश्वास टाटा समूह (Tata Group)म्हटला की एक जबरदस्त विश्वासार्हता समोर येते. टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मात्र टाटांच्या काही कंपन्या अशा आहेत ज्यांची घोडदौड वायूच्या वेगाने झाली आहे. टाटा समूहाच्या एका कंपनीने गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांची या कंपनीत मोठी गुंतवणूक आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • टाटा समूहाच्या या कंपनीने गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला
  • या शेअरने एक लाखाच्या गुंतवणुकीचे केले 10 कोटी रुपये
  • राकेश झुनझुनवालांचीसुद्धा आहे मोठी गुंतवणूक

Rakesh Jhujhunwala Portfolio : मुंबई : शेअर बाजारात (Share Market) असो कि उद्योगविश्वास टाटा समूह (Tata Group)म्हटला की एक जबरदस्त विश्वासार्हता समोर येते. टाटा समूहातील अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मात्र टाटांच्या काही कंपन्या अशा आहेत ज्यांची घोडदौड वायूच्या वेगाने झाली आहे. टाटा समूहाच्या एका कंपनीने गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा परतावा दिला आहे. टाटा समूहाची ही कंपनी म्हणजे टायटन (Titan Ltd). टायटन कंपनीने आतापर्यंत गुंतवणुकदारांना 99,900 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. टायटन कंपनीच्या शेअर्सने गेल्या काही वर्षांत 2.5 रुपये ते 2500 रुपयांचा टप्पा पार केला आहे. दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा टायटन कंपनीत मोठा हिस्सा आहे.  (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Titan turned into Rs 10 crore)

अधिक वाचा : Multibagger Stock | 'मै रुकेना नहीं साला'...असे म्हणत या पेनी स्टॉकने 1 लाखाचे केले 16 कोटी, गुंतवणुकदारांची आयुष्यभराची कमाई

1 लाख रुपयांचे झाले 10 कोटींपेक्षा जास्त 

टायटन कंपनीचे शेअर्स 11 एप्रिल 2003 रोजी नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर 2.50 रुपयांच्या (Share Price of Titan) पातळीवर होते. सध्या टायटनचा शेअर 2,504.80 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर आहेत. कंपनीच्या समभागांनी गुंतवणूकदारांना 99,900  टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.  जर एखाद्या गुंतवणूकदाराने 11 एप्रिल 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या ही रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. जर एखाद्या व्यक्तीने 11 एप्रिल 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये देखील गुंतवले असते, तर सध्या ही रक्कम 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली असती. या कालावधीत या शेअरने गुंतवणुकदारांचा पैसा तब्बल 1,000 पटींनी वाढवला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | हा शेअर 36 पैशांवरून पोचला 80 रुपयांवर...एका वर्षात 50 हजाराचे झाले 1.11 कोटी

गुंतवणूकदारांचे पैसे दर 4 वर्षांनी दुप्पट 

टायटन कंपनीचे शेअर्स सातत्याने जबरदस्त परतावा देत आहेत. एप्रिल 2009 मध्ये टायटन कंपनीचे शेअर्स सुमारे 40 रुपयांच्या पातळीवर होते. एप्रिल 2013 मध्ये कंपनीचे शेअर्स 300 रुपयांच्या आसपास पोहोचले. ऑक्टोबर 2017 मध्ये टायटनचे शेअर्स 600 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, एप्रिल 2021 मध्ये, कंपनीचे शेअर्स सुमारे 1,460 रुपयांवर पोहोचले. 22 एप्रिल 2022 रोजी कंपनीचे शेअर्स  2500 रुपयांवर व्यवहार करत आहेत. टायटनच्या शेअर्सनी गेल्या एका वर्षात 70 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | याड लागलं गं याड लागलं...हा शेअर पळायचा थांबेना, 27 पैशांवरून पोचला 30 रुपयांवर, शिवाय कंपनी देणार बोनस शेअरसुद्धा

राकेश झुनझुनवाला यांची मोठी गुंतवणूक

मार्च 2022 ला संपलेल्या तिमाहीअखेर टायटन कंपनीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, राकेश झुनझुनवाला आणि त्यांची पत्नी रेखा झुनझुनवाला या दोघांचीही टायटनमध्ये मोठी गुंतवणूक आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीचे 3,53,10,395 शेअर्स किंवा 3.98 टक्के हिस्सा आहे. त्याच वेळी, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटन कंपनीमध्ये 95,40,575 शेअर्स किंवा 1.07 टक्के हिस्सा आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी