Multibagger Stock : या 25 पैशांच्या शेअरने केले गुंतवणुकदारांच्या एक लाखाचे 2 कोटी, अजूनही आहे तेजीत...

Share Market Investment : शेअर बाजारातील (Share Market) अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉकने (Penny Stock) दणदणीत कामगिरी केली आहे. या जोखमीच्या छोट्या शेअर्सनी बंपर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात काही पैशांच्या या शेअरने इतकी जोरदार उडी मारली की थेट 9 रुपयांचा टप्पा पार केला. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) एका महिन्यात तब्बल 163.77 टक्के बंपर परतावा दिला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या छोट्याशा शेअरने गुंतवणुकदारांना बनवले करोडपती
  • 25 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर
  • गुंतवणुकदारांच्या लाखाचे झाले दोन कोटी

Multibagger Penny Stock Investment: मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) अस्थिरतेच्या काळात काही पेनी स्टॉकने (Penny Stock) दणदणीत कामगिरी केली आहे. या जोखमीच्या छोट्या शेअर्सनी बंपर परतावा दिला आहे. गेल्या एका महिन्यात काही पैशांच्या या शेअरने इतकी जोरदार उडी मारली की थेट 10 रुपयांचा टप्पा पार केला. हा सुपर डुपर शेअर आहे झेनिथ स्टील पाईप्स अॅंड इंडस्ट्रीज लि. (Zenith Steel Pipes & Industries Ltd)या कंपनीचा. या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) एका महिन्यात तब्बल 163.77 टक्के बंपर परतावा दिला आहे.  (The investment of Rs 1 Lakh in Multibagger stock of Zenith Steel Pipes & Industries Ltd turned into Rs 2 crore)

अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

गुंतवणुकदार शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवून करोडपती देखील होऊ शकतात. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक (Investment) जोखमीची असते मात्र जर ती योग्य ठरली तर तुफान कमाईची संधी मिळते. आपण अशाच एका स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरबद्दल जाणून घेऊया ज्याने गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे तेदेखील फक्त काही महिन्यांच्या कालावधीत. ही कंपनी फारशी प्रसिद्ध नाही, फार कमी लोकांना याबद्दल माहिती असेल. ही कंपनी आहे आहे झेनिथ स्टील पाईप्स अॅंड इंडस्ट्रीज लि.. या कंपनीचे शेअर्स वर्षभरापूर्वी अगदी चिल्लरमध्ये म्हणजे काही पैशांत उपलब्ध होते. त्या कालावधीत या शेअरमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली ते आज करोडपती झाले आहेत. 

अधिक वाचा : Multibagger Stock : बघता बघता हा 19 पैशांचा शेअर पोचला 32 रुपयांवर, 1 लाखाच्या गुंतवणुकीचे झाले 1.5 कोटी

झेनिथ स्टील पाईप्स अॅंड इंडस्ट्रीज लि. चा सुपर शेअर

निफ्टी स्मॉलकॅप 100 च्या तुलनेत झेनिथ स्टील पाईप्स अॅंड इंडस्ट्रीज लि. च्या स्टॉकने 1554.55% चा परतावा 3 वर्षाच्या कालावधीत दिला आहे.  एका आठवड्याची कामगिरी पाहिली तर या मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock)25.52 टक्के परतावा दिला आहे. तर 3 महिन्यांत 727.27 टक्के आणि एका वर्षात 770 टक्क्यांचा दणदणीत परतावा गुंतवणुकदारांना दिला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 10 रुपये आणि नीचांक 80 पैसे इतका आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock : या छोट्याशा शेअरने अवघ्या 6 महिन्यांत 1 लाखाच्या गुंतवणुकीचे केले 62 लाख

लाखाचे झाले 1 कोटी 84 लाख

3 वर्षांच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर या शेअरमध्ये गुंतवलेल्या एक लाख रुपयांचे मूल्य जवळपास 2 कोटी झाले आहे. या शेअरची किंमत 3 वर्षात 18300 टक्के वाढली आहे. 1 जून 2018 रोजी त्याचे मूल्य झेनिथ स्टील पाईप्स अॅंड इंडस्ट्रीज लि. च्या शेअरची किंमत (Share Price of Zenith Steel Pipes & Industries Ltd) फक्त 25 पैसे प्रति शेअर इतकी होती. NSE वर त्याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 10 रुपये आहे आणि तर नीचांक 1.35 रुपये आहे. या शेअरला अप्पर सर्किट लागते आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी