Multibagger Stock Investment : मुंबई : शेअर बाजारात एखादा मल्टीबॅगर शेअर (Multibagger Stock) तुम्हाला छोट्याशा गुंतवणुकद्वारे मालामाल करू शकतो. अर्थात शेअर बाजारात (Share Market)जोखीम भरपूर आहेच मात्र तिथे तुम्हाला होणारी कमाईदेखील तुफान असते. शेअर बाजारातील घसरणीच्या वातावरणात काही शेअर्स तुफानी परतावा देतात. असाच एक मल्टीबॅगर शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस पाडला आहे. हा शेअर आहे सिम्फनी लि.(Symphony Ltd) या कंपनीचा. काही हजारांच्या गुंतवणुकीचे रुपांतर या शेअरने करोडोंमध्ये केले आहे. (The investment of Rs 10,000 in Multibagger stock of Symphony Ltd turned into Rs 2.5 crore)
अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख
सिम्पनी लि.चा हा मल्टीबॅगर शेअर फक्त काही पैशांना मिळत होता. 1994 मध्ये, सिम्फनी बॉम्बे, जेव्हा बाजारात सूचीबद्ध झाली तेव्हा या शेअरची किंमत फक्त 0.58 रुपये (Share price of Symphony Ltd)होती. सध्या हा शेअर 1,455-1,466 रुपयांवर पातळीवर व्यवहार करतो आहे. या शेअरने 16 वर्षात 2,53,000 टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. 16 वर्षांपूर्वी केलेल्या फक्त 10 हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 2.5 कोटींहून अधिक झाले आहे. म्हणजेच जर एखाद्या गुंतवणूकदाराने त्यात पैसे गुंतवून संयम राखला असता, तर तो आज नक्कीच करोडपती झाला असता.
सिम्फनी ही एक ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आहे जी एअर कूलर, डेझर्ट कूलर, रूम कूलर, वैयक्तिक कूलर आणि पोर्टेबल एअर कूलर बनवते. त्याच्या कूलरची मागणी भारतात सर्वाधिक आहे. अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील 60 देशांमध्ये त्याच्या शाखा आहेत. ती मेक्सिकोमध्ये इमको आणि चीनमध्ये केरुलाई एअर कूलर नावाने कंपनी चालवते. म्हणजेच कंपनीची बाजारपेठही मजबूत आहे. त्यामुळे भविष्यातही हा शेअर चांगली कमाई करून देऊ शकतो.
गुंतवणुकदार शेअर मार्केटमध्ये (Share Market) पैसे गुंतवून दणदणीत कमाई करू शकतात. विशेषत: छोट्या शेअरमध्ये गुंतवणूक कमालीची फायद्याची ठरू शकते. मात्र या प्रकारच्या गुंतवणुकीत (Investment) जोखीम मोठी असते मात्र जर ती योग्य ठरली तर तुफान कमाईची संधी मिळते. अर्थात प्रत्येकवेळा अशी गुंतवणूक कमाई करूनच देईल असे नाही. त्यामुळे आपली जोखीम क्षमता प्रत्येक गुंतवणुकदाराने नीट ओळखली पाहिजे. सध्या जागतिक शेअर बाजारांचा कल आणि अमेरिकेतील घटकांचा प्रभाव शेअर बाजारावर पडतो आहे. भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून मोठी घसरण होते आहे. महागाईला आळा घालण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्हने उचललेल्या पावलांचा प्रभाव वित्तीय बाजारावर पडतो आहे.
(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)