Job Loss Insurance : नोकरी गेली तरी नो टेन्शन! हा विमा घेईल तुमच्या आर्थिक गरजांची काळजी...पाहा काय असतो हा विमा

Insurance : जर तुम्ही तुमची नोकरी गमावली (Job Loss) असेल आणि तुमच्या खर्चाची काळजी करत असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. आपल्या सर्वांच्या आयुष्यात खर्च हे असतातच. मात्र उत्पन्न नियमित राहील याची शाश्वती नसते. म्हणूनच तर तुम्ही तुमची नोकरी गमावली तर फक्त नोकरी गमावण्याचे विमा संरक्षण (Job Loss Insurance) तुम्हाला तुमच्या खर्चासाठी मदत करू शकते.

Job loss insurance
नोकरी गेल्यास विमा संरक्षण  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • विमा हा आर्थिक नियोजनातील महत्त्वाचा घटक
  • कोरोना संकट किंवा इतर अनेक कारणांमुळे लोकांच्या नोकऱ्या जातात
  • नोकरी गेल्यास हा खास विमा देतो आर्थिक संरक्षण

Job Loss Insurance Policy : नवी दिल्ली : तुम्ही आरोग्य विमा, आयुर्विमा (Life Insurance) किंवा प्रवास विमा, वाहन विमा इत्यादी विम्यांचे प्रकार ऐकले असतील. मात्र तुमच्या नोकरीसाठीही एक विमा (Insurance)असतो. हे तुम्हाला माहित आहे का? नोकरदार माणसासाठी नोकरी खूप महत्त्वाची असते. काही कारणास्तव नोकरी गेली तर ती खूप चिंतेची बाब होते. मात्र आता यासंदर्भात एक जबरदस्त पर्याय आहे. जर तुम्ही तुमची नोकरी गमावली (Job Loss) असेल आणि तुमच्या खर्चाची काळजी करत असाल तर तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही.  नोकरी गमावण्याचे विमा संरक्षण (Job Loss Insurance) हे नोकरी गेल्यावर तुमच्या आर्थिक गरजांची काळजी घेते. आपल्या सर्वांच्या आयुष्यात खर्च हे असतातच. मात्र उत्पन्न नियमित राहील याची शाश्वती नसते. त्यामुळेच अलीकडच्या काळात विविध आर्थिक संकटाना तोंड देण्यासाठी नोकरी विम्याची उपयुक्तता कमालीची वाढली आहे. पाहूया काय असतो नोकरी गमावल्याचा विमा. (The lob loss insurance will take care of your financial needs in case you loose job)

सध्याच्या काळात कर गृहकर्जाचा ईएमआय, मुलांच्या शाळेची फी, कार लोन इत्याहीसह अनेक खर्चांसाठी नोकरी किंवा नियमित उत्पन्न खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच तर तुम्ही तुमची नोकरी गमावली तर फक्त नोकरी गमावण्याचे विमा संरक्षण (Job Loss Insurance) तुम्हाला तुमच्या खर्चासाठी मदत करू शकते. 2008 मध्ये अमेरिकेत आलेली मंदी आणि 2020 मध्ये आलेल्या कोरोना संकटामुळे जगभरातील लोकांना अशा संकटाचा सामना करावा लागला.

अधिक वाचा :   Eknath Shinde : राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवून दाखवा, आदित्य ठाकरे यांचे शिंदे गटाला आव्हान 

नोकरी संरक्षण विमा (Job Loss Insurance)

तुमच्या माहितीसाठी आरोग्य आणि आयुर्विम्याप्रमाणेच नोकरी विम्याची संकल्पना आहे. अर्थात भारतात अजून नोकरी विम्याशी संबंधित कोणतीही स्वतंत्र पॉलिसी नाही. टर्म प्लॅन आणि इतर विम्यासह अतिरिक्त लाभ म्हणून नोकरी संरक्षण विमा घेतला जाऊ शकतो. या विम्याअंतर्गत पॉलिसीमध्ये दिलेल्या कोणत्याही कारणामुळे व्यक्तीची नोकरी गेली तर अशा परिस्थितीत त्याला आर्थिक मदत मिळते.

अधिक वाचा : Nawab Malik: नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, लवकरच ईडी मालमत्तेवर आणणार टाच

अद्याप भारतात नोकरीच्या विम्याबाबत स्वतंत्र धोरण नाही. म्हणूनच तुम्ही तुमच्या इतर विमा पॉलिसींसोबत टर्म प्लॅन आणि इतर विम्यासोबत जोडून अतिरिक्त फायदे मिळवू शकता. नोकरी विम्याचे फायदे तुम्ही गृह विमा किंवा आरोग्य विमा पॉलिसीसह घेऊ शकता. टर्म इन्शुरन्समध्येही या प्रकारचे कव्हर मिळू शकते. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की  प्रत्येक विमा कंपनीच्या यासाठी असणाऱ्या अटी व शर्ती या वेगवेगळ्या असतात.

अधिक वाचा  : महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागू शकतात- उद्धव ठाकरे

नोकरी संरक्षण विम्याचे फायदे-

  1. नोकरी गमावण्याच्या विमा संरक्षणामध्ये, पॉलिसीच्या अटींनुसार एखाद्या व्यक्तीने नोकरी गमावल्यास विमाधारकास आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये तुम्हाला विशिष्ट कालावधीसाठी पैशांची मदत केली जाते.
  2. यामुळे नोकरी गेल्यावर निर्माण झालेल्या परिस्थितीत त्या विमाधारकाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
  3. नोकरी गमावण्याच्या विमा संरक्षणामध्ये प्रत्येक विमा कंपनीच्या वेगवेगळ्या अटी आणि शर्ती असतात.
  4. नोकरी विमा संरक्षणामध्ये, तात्पुरते पैसे काढल्यावरही संरक्षण मिळते.
  5. मात्र तुमची नोकरी कोणत्या कारणामुळे गेली हेदेखील महत्त्वाचे असते. फसवणूक, भ्रष्टाचार किंवा इतर गैरप्रकार आणि आरोपांमुळे नोकरी गेली तर मात्र विम्याचा फायदा मिळत नाही. 
  6. याशिवाय जर तुम्ही प्रोबेशन पीरियडमध्ये असाल आणि नोकरी गेली तरी विम्याचा फायदा मिळत नाही.
  7. कायमस्वरुपी नोकरी असणाऱ्यांनाच या प्रकारच्या विम्याचा लाभ मिळतो. तात्पुरत्या किंवा कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या लोकांना हे विमा संरक्षण मिळत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी