Multibagger Stock : IPO असावा तर असा...102 रुपयांवरून 7200 रुपयांवर पोचला हा शेअर, एका वर्षात 70 पटीने वाढ...

Share Market Investment : मागील काही वर्षात शेअर बाजारात (Share Market) आयपीओंनी धूम उडवून दिली आहे. काही आयपीओ फारसे यशस्वी झाले नाहीत. मात्र काही आयपीओंनी गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या वर्षी बहुतांश आयपीओ (Initial Public Offering) भलेही मजबूत परतावा देऊ शकले नसतील, परंतु 2021 मध्ये अनेक कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर त्यात गुंतवणूक करणारे श्रीमंत झाले.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • आयपीओद्वारे काही गुंतवणुकदारांनी केली तुफान कमाई
  • या कंपनीच्या आयपीओने गुंतवणुकदारांना 6900 टक्क्यांचा तुफान परतावा
  • 102 रुपयांचा शेअर पोचला 7200 रुपयांवर

Multibagger Penny Stock Investment: मुंबई : मागील काही वर्षात शेअर बाजारात (Share Market) आयपीओंनी धूम उडवून दिली आहे. काही आयपीओ फारसे यशस्वी झाले नाहीत. मात्र काही आयपीओंनी गुंतवणुकदारांना आयुष्यभराची कमाई करून दिली आहे. या वर्षी बहुतांश आयपीओ (Initial Public Offering) भलेही मजबूत परतावा देऊ शकले नसतील, परंतु 2021 मध्ये अनेक कंपन्यांची शेअर बाजारात नोंदणी झाल्यानंतर त्यात गुंतवणूक करणारे श्रीमंत झाले. काही शेअर्स बाजारात नोंदणी झाल्यानंतर मल्टीबॅगर शेअर ( Multibagger Stock)बनले आहेत. अशीच एक कंपनी आहे ईकेआय एनर्जी सव्हिसेस ( EKI energy services). या कंपनीने 2021 मध्ये IPO लाँच केल्यानंतर कंपनीच्या शेअरने आतापर्यत गुंतवणुकदारांना 6900 टक्क्यांचा तुफान परतावा दिला आहे. (The Multibagger IPO of EKI energy services gave 69,000 % in one year)

अधिक वाचा : Multibagger Stock : हा 23 पैशांचा शेअर पोचला 9 रुपयांवर...एका वर्षात 1 लाखाचे झाले 40 लाख

या शेअरने नोंदणीनंतर करून दिली मोठी कमाई

ईकेआय एनर्जी सव्हिसेस ( EKI energy services)या कंपनीचा IPO (प्रारंभिक सार्वजनिक ऑफर) मार्च 2021 मध्ये लाँच करण्यात आला. या IPO ची इश्यू किंमत 102 रुपये प्रति शेअर होती. ईकेआय एनर्जी सव्हिसेसचा शेअर ( EKI energy services) 7 एप्रिल 2021 रोजी BSE वर 140 रुपये प्रति शेअर या किंमतीने सूचीबद्ध झाला. ज्या गुंतवणुकदारांना आयपीओद्वारे कंपनीचे शेअर्स मिळाले त्यांना जवळपास 37 टक्के नफा शेअर सूचीबद्ध होताच झाला.

ईकेआय एनर्जी सव्हिसेस ( Share Price of EKI energy services)कंपनीच्या शेअर्सची आजची किंमत 7200 रुपये प्रति शेअर आहे. हा शेअर त्याची शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून फक्त एका वर्षाच्या कालावधीत 102 रुपयांच्या इश्यू किंमतीवरून तब्बल 7200 रुपयांपर्यंत वाढला आहे. ज्यामुळे ईकेआय एनर्जी सव्हिसेसच्या शेअरधारकांना तब्बल 6900 टक्क्यांचा छप्परफाड परतावा मिळाला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock : या 25 पैशांच्या शेअरने केले गुंतवणुकदारांच्या एक लाखाचे 2 कोटी, अजूनही आहे तेजीत...

एक लाखाचे झाले 70 लाख

जर एखाद्या गुंतवणुकदाराने महिन्यापूर्वी ईकेआय एनर्जी सव्हिसेसच्या ( EKI energy services)शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य 94,000 रुपये झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 6 महिन्यांपूर्वी या मल्टीबॅगर स्टॉकमध्ये (Multibagger Stock) 1 लाख रुपये गुंतवले असते, तर आज त्याचे मूल्य 1.32 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने कंपनी सूचीबद्ध झाल्यानंतरही 1 लाख रुपयांची गुंतवणूक ईकेआय एनर्जी सव्हिसेस ( EKI energy services)च्या शेअर्समध्ये केली असती, तर त्या गुंतवणुकीचे मूल्य आज 70 लाख रुपयांपेक्षा जास्त झाले असते.

अधिक वाचा : Multibagger Stock : या आयटी कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये गुंतवले असते तर आज 900 कोटींचा मालक झाला असता, पाहा कसे

ईकेआय एनर्जी सव्हिसेसच्या किंमतीचा ट्रेंड

ईकेआय एनर्जी सव्हिसेसचा शेअर 12,500 रुपयांवर ईकेआय एनर्जी सव्हिसेस कंपनीचा शेअर सुपरफास्ट वेगाने आकाशाला भिडला आहे. जानेवारी 2022 मध्ये या शेअरच्या किंमतीने आपला 12,599.95 रुपये प्रति शेअरचा सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर, आता या शेअरमध्ये विक्री होते आहे. गेल्या एका महिन्यात, हा मल्टीबॅगर शेअर 6 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. तर 2022 मध्ये तो 30 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गेल्या 6 महिन्यांत, हा शेअर 5450 रुपयांवरून 7200 रुपयांपर्यंत वाढला आहे. शेअरमध्ये या कालावधीत 32 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी