Multibagger Stock | जवळपास फुकटात मिळणाऱ्या 'या' शेअरने वर्षभरात 1 लाखाचे केले 25 लाख...सैराट झालं जी!

Investment in Multibagger Penny Stock : पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. मात्र मल्टीबॅगर पेनीस्टॉकमधून (Multibagger Penny Stock) मिळणारा परतावा छप्परफाड असतो. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदार दमदार पेनी स्टॉकच्या शोधात असतात. आपण अशाच एका सुपरडुपर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेऊया जो मल्टीबॅगर पेनी स्टॉक ठरला आहे. या पेनीस्टॉकची वर्षभरापूर्वीची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फक्त 12 महिन्यांपूर्वीच हा शेअर जवळपास फुकटात म्हणजे फक्त 19 पैशांना उपलब्ध होता.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • गुंतवणुकदारांना चिल्लरमधून श्रीमंत बनवणारा पेनी स्टॉक
  • या मल्टीबॅगर शेअरने दिला 2,421% चा दणदणीत परतावा
  • एक लाखाचे झाले 25 लाख रुपये

Multibagger Penny Stock in 2022 : मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market) मल्टीबॅगर पेनी स्टॉकचा दबदबा आहे. पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे जोखमीचे आहे. मात्र मल्टीबॅगर पेनीस्टॉकमधून (Multibagger Penny Stock) मिळणारा परतावा छप्परफाड असतो. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदार दमदार पेनी स्टॉकच्या शोधात असतात. आपण अशाच एका सुपरडुपर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेऊया जो मल्टीबॅगर पेनी स्टॉक ठरला आहे. या पेनीस्टॉकची वर्षभरापूर्वीची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. फक्त 12 महिन्यांपूर्वीच हा शेअर जवळपास फुकटात म्हणजे फक्त 19 पैशांना उपलब्ध होता. हा जबरदस्त शेअर आहे बीएलएस इन्फोटेक लि. (BLS Infotech Ltd)या कंपनीचा. या शेअरने गुंतवणुकदारांना एकाच वर्षात 2,421% चा मजबूत परतावा दिला आहे. (The Multibagger stock of BLS Infotech Ltd turned investment of Rs 1 Lakh into 25 lakhs in one year)

शेअर बाजारात सध्या मल्टीबॅगर शेअरची (Multibagger Stock)मोठी चर्चा आहे. गुंतवणुकदारांना अगदी कमी कालावधीत श्रीमंत बनवणाऱ्या या शेअर्सकडे सर्वांचेच लक्ष आहे. बीएलएस इन्फोटेक लि.चा शेअर असाच भन्नाट शेअर आहे, ज्याने गुंतवणुकदारांना कल्पनेपलीकडचा पैसा कमावून दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 3.48 रुपयांच्या या शेअरने एक लाखाचे केले 27 लाख...गुंतवणुकदार मालामाल

वर्षभरापूर्वी शेअरची किंमत होती 19 पैसे 

अगदी चिल्लरमधून बीएलएस इन्फोटेकच्या शेअरने गुंतवणुकदारांना मालामाल करून टाकले आहे. जर आपण बीएलएस इन्फोटेकच्या शेअरच्या किंमतीच्या (Share Price of BLS Infotech Ltd) पॅटर्नवर नजर टाकली तर आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. फक्त एक वर्षापूर्वी 17 मे 2021 ला या शेअरची किंमत बीएसई वर फक्त 19 पैसे होती. एका वर्षात म्हणजे 8 एप्रिल 2022ला हा स्टॉक 4.79 रुपयांवर पोचला आहे.   या कालावधीत या मल्टीबॅगर पेनीस्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 2,421.05% चा छप्परफाड परतावा दिला आहे. तर 21 ऑक्टोबर 2021 हा शेअर 33 पैशांवर होता. फक्त सहाच महिन्यात या शेअरची किंमत आता4.79 रुपयांवर पोचली आहे. या कालावधीत शेअरने 1,351.52 टक्के परतावा दिला आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | फारशी चर्चा न झालेला हा आहे छुपा रुस्तम शेअर...हजार गुंतवणाऱ्यांनी कमावले लाखो!

या वर्षी, स्टॉकमध्ये आतापर्यत 625.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यावर्षी हा शेअर 66 पैशांवरून (3 जानेवारी 2022 ची शेवटची किंमत) 4.79 रुपयांपर्यत वाढला आहे. मात्र गेल्या एका महिन्यात स्टॉकवर विक्रीचा दबाव आहे. एका महिन्यातच शेअरच्या किंमतीत 7.35% ची घसरण झाली आहे. त्याच वेळी, गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये शेअरच्या किंमतीत 20.65 टक्के वाढ झाली आहे. शुक्रवारी बीएलएस इन्फोटेक लिमिटेडचा ​​शेअर 4.81% तेजी नोंदवून 4.79 रुपयांवर बंद झाला

अधिक वाचा : Multibagger Stock | अदानींच्या या शेअरने घातली आकाशाला गवसणी....27 रुपयांचा शेअर पोचला 2420 रुपयांवर

एक लाखाचे झाले 25 लाख रुपये

बीएलएस इन्फोटेक लिमिटेडच्या शेअरच्या किंमतीच्या ट्रेंडनुसार गुंतवणुकदार एकाच वर्षात करोडपती झाले आहेत. जर एखाद्या गुंतवणुकदाराने वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये 19 पैसे प्रति शेअरच्या पातळीवर जर एक लाख रुपये गुंतवले असते आणि तर आज त्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 25.21 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर एखाद्या गुंतवणुकदाराने सहा महिन्यांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर त्याचे 1 लाख रुपये आता 14 लाख रुपये झाले असते. त्याच वेळी, जर कोणी या वर्षी 2022 मध्ये या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते तर आज ते 7.25 लाख रुपये झाले असते. म्हणजेच, तीन महिन्यांतच, गुंतवणुकदारांना 7 पट नफा झाला आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी