Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

Investment in Multibagger Penny Stock : आज ज्यांनी तिशी- पस्तीशी ओलांडली आहे त्यांच्या बालपणीच्या सुखद आठवणींमध्ये या 10 पैशाचे स्थान खूप मोठे आहे. मात्र तुम्ही म्हणाल विषय तर शेअर बाजार (Share Market) आणि मल्टीबॅगर शेअरचा (Multibagger stock)आहे आणि आम्ही काय 10 पैशांचे कौतुक घेऊन बसलो आहोत. तर मित्रांनो आजचा आपला शेअरदेखील 10 पैशांचाच होता आणि त्यांने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • फक्त 10 पैशांच्या शेअरने एकाच वर्षात दिला 1,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
  • छोट्याशा गुंतवणुकीतून गुंतवणुकदार झाले मालामाल
  • या आयटी सेवा क्षेत्रातील मल्टीबॅगर पेनी स्टॉकने केली कमाल

Multibagger Penny Stock in 2022 : मुंबई : तुम्हाला आठवतंय का? लहानपणी 10 पैशांना किंवा 50 पैशांना चॉकलेट विकत घेऊन खाणे ही किती आनंदाची गोष्ट होती. आज 10 पैसे इतिहासजमा झाले असले तरी आज ज्यांनी तिशी- पस्तीशी ओलांडली आहे त्यांच्या बालपणीच्या सुखद आठवणींमध्ये या 10 पैशाचे स्थान खूप मोठे आहे. मात्र तुम्ही म्हणाल विषय तर शेअर बाजार (Share Market) आणि मल्टीबॅगर शेअरचा (Multibagger stock)आहे आणि आम्ही काय 10 पैशांचे कौतुक घेऊन बसलो आहोत. तर मित्रांनो आजचा आपला शेअरदेखील 10 पैशांचाच होता आणि त्यांने गुंतवणुकदारांना करोडपती बनवले आहे. शेअर बाजारात सध्या छोट्या आणि कमी किंमतीच्या शेअरचा बोलबाला आहे. अशा काही शेअर्सनी गुंतवणुकदारांना थोड्या कालावधीत मालामाल करून टाकले आहे. या शेअर्सना मल्टीबॅगर पेनी स्टॉक असे म्हणतात. एमपीएस इन्फोटेनिक्स लि.च्या (MPS Infotecnics Ltd) या छोट्याशा मल्टीबॅगर पेनी स्टॉकने (Multibagger Penny Stock) एकाच वर्षात गुंतवणुकदारांचे नशीब पालटून टाकले आहे. या शेअरने काय जादू केली आहे ते पाहूया. (The Multibagger stock of MPS Infotecnics Ltd turned investment of Rs 1 Lakh into 11.5 lakhs in one year)

वर्षभरात शेअरने केली धमाल

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणे अत्यंत जोखमीचे असते. मात्र मल्टीबॅगर पेनीस्टॉकमधून (Multibagger Penny Stock) मिळणारा परतावा छप्परफाड असतो. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदारांचा कल असाच एखादा दमदार पेनी स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक करण्याकडे असतो. आज आपण अशाच एका सुपरडुपर पेनी स्टॉकबद्दल जाणून घेऊया जो मल्टीबॅगर पेनी स्टॉक ठरला आहे. या पेनीस्टॉकची वर्षभरापूर्वीची किंमत ही इतकी कमी आहे की चॉकलेट घेण्यासाठीदेखील त्यापेक्षा जास्त पैसे लागतात. वर्षभरापूर्वी म्हणजे 24 मे 2021ला एमपीएस इन्फोटेनिक्स लि.च्या (Share Price of MPS Infotecnics Ltd)शेअरची किंमत 10 पैसे होती. सध्या हा सुपर बंपर शेअर 1.10 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे.

एक लाखाचे वर्षभरात 11 लाख

फक्त 12 महिन्यांपूर्वीच हा शेअर 10 पैशांच्या पातळीवर होता. आता हा शेअर जबरदस्त तेजी दाखवत 1.10 रुपयांवर पोचला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना एकाच वर्षात 1,000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजेच जर एक वर्षापूर्वी एमपीएस इन्फोटेनिक्स लि.च्या शेअरमध्ये तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 11 लाख रुपये झाले असते. या पेनी स्टॉकमध्ये मागील दोन महिन्यात घसरण झाली असली तरी काही गुंतवणुकदारांना यातून अजून कमाईची आशा आहे. अर्थात शेअर बाजारातील सर्वात मोठी जोखीम म्हणजे पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवणे. मात्र जर तुम्हाला जोखीम घेता येत असेल आणि तितकी तुम्ही क्षमता असेल आणि अशी जोखीम घेतल्यावर रात्री तुम्ही शांत झोपू शकत असाल तर पेनी स्टॉक लोकांना कमी कालावधीत करोडपती बनवतात. अर्थात प्रत्येक पेनी स्टॉकच्या बाबतीत हे होत नाही.

थोडेसे एमपीएस इन्फोटेनिक्स लि.बद्दल

एमपीएस इन्फोटेनिक्स लि. या कंपनीची स्थापना 1989 मध्ये झाली होती. ही कंपनी सिस्टम इंटेग्रेशन आणि नेटवर्क सोल्युशन्सच्या क्षेत्रात काम करते. त्याचबरोबर कंपनी टेलीकम्युनिकेशन्स, एंटरप्राइस सॉफ्टवेअर, डोमेन रजिस्ट्रेशन आणि वेब होस्टिंगच्या व्यवसायातदेखील कार्यरत आहे. शिवाय कंपनी व्हॅल्यू अॅडेड आयटी सेवांदेखील पुरवते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी