Multibagger Stock | फार्मा कंपनीचा शेअर ३.५० रुपयांवरून पोचला ९२५ रुपयांवर, १ लाखाचे झाले २.६४ कोटी, अजूनही तेजीतच...

Penny stock : नाटको फार्मा लि. ही एक फार्मा क्षेत्रातील कंपनी असून कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच- सहा वर्षात तुफान घोडदौड झाली आहे. या शेअरच्या किंमतीत २० वर्षात जवळपास २६४ पट वाढ झाली आहे. ३ जानेवारी २००१ला हा शेअर फक्त ३.५० रुपये प्रति शेअर या किंमतीला उपलब्ध होता. सध्या या शेअरची किंमत ९२५.०० रुपये प्रति शेअर इतकी आहे.

Share of Natco Pharma
नॅटको फार्माचा करोडपती बनवणारा शेअर 
थोडं पण कामाचं
  • या फार्मा शेअरने दिला २६,३२८ टक्क्यांचा परतावा
  • एक लाखाच्या गुंतवणुकीचे झाले २.६४ कोटी रुपये
  • वीस वर्षात सर्वसामान्य माणूस झाला करोडपती

Share Market Investment | मुंबई : शेअर बाजारात तेजीतील शेअर्सची धामधूम आहे. सरलेले वर्ष शेअर बाजाराने गाजवले आहे. कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत असतानादेखील भारतीय शेअर बाजाराने (Share market)उच्चांकी पातळी नोंदवली होती. मागील वर्षभरात अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger stock)बनले होते. खास करून हे वर्ष पेनी स्टॉक्सने (Penny stock)गाजवले. या काही शेअर्सनी गुंतवणुकदारांना खरोखरच जबरदस्त कमाई करून दिली. नॅटको फार्मा लि. (Stock of Natco Pharma Ltd.) हा शेअर असाच एक पेनी स्टॉक आहे जो वर्षभरात मल्टीबॅगर शेअर बनला आहे. या शेअरची किंमत ३.५० रुपयांवरून ९२५.०० रुपयांच्या पातळीवर पोचली आहे. या शेअरच्या किंमतीत वीस वर्षात २६४ पट वाढ झाली आहे. (The Multibagger stock of Natco Pharma Ltd turned Rs 1 lakh into Rs 2.64 crore in 20 years)

नॅटको फार्मा लि.चा शेअरने दिला २६,३२८ टक्के परतावा

नॅटको फार्मा लि. ही एक फार्मा क्षेत्रातील कंपनी असून कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच- सहा वर्षात तुफान घोडदौड झाली आहे. या शेअरच्या किंमतीत २० वर्षात जवळपास २६४  पट वाढ झाली आहे. ३ जानेवारी २००१ला हा शेअर फक्त ३.५० रुपये प्रति शेअर या किंमतीला उपलब्ध होता. सध्या या शेअरची किंमत ९२५.०० रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरने २० वर्षात तब्बल २६,३२८ टक्क्यांचा छप्परफाड परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज २.६४ कोटी रुपये झाले आहे.मागील फक्त पाच वर्षांचा विचार करता या शेअरची किंमत ५३० रुपयांवरून ९२५ रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच पाच वर्षभरात या शेअरने पैसे जवळपास दुप्पट केले आहेत. 

शेअर बाजारातील अभूतपूर्व तेजी

मागील दीड वर्ष शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी