Multibagger Stock | 20 पैशांच्या शेअरचा धुमाकूळ...तेजी थांबता थांबेना...लागतेय अप्पर सर्किट...गुंतवणुकदारांची कमाई थांबेना

Investment in Multibagger Penny Stock : मागील दीड दोन वर्षात बाजारात नव्याने आलेल्या गुंतवणुकदारांना झटपट तुफानी कमाई करण्यासाठी पेनी स्टॉकचा (Penny Stock) पर्याय आकर्षित करतो आहे. दहा रुपयांच्या खाली किंमत असणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून प्रचंड परतावा मिळवण्याची अनेकांची इच्छा आहे. कदाचित तुम्हीदेखील अशा शेअरच्या शोधात असाल. मात्र मित्रांनो जर तुम्हाला काही रुपयांऐवजी फक्त काही पैशांमध्ये मिळणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करता आली तर, धमालच येईल ना.

Multibagger Penny Stock
मल्टीबॅगर पेनी स्टॉक 
थोडं पण कामाचं
  • 20 पैशांच्या शेअरने एकाच वर्षात दिला 1,300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा
  • गुंतवणुकदारांची कमाई सुरूच, शेअर तुफान तेजीत
  • टेक्सटाइल क्षेत्रातील कंपनीच्या शेअरने केले मालामाल

Multibagger Penny Stock in 2022 : मुंबई : शेअर बाजारात (Share Market)सध्या पेनी स्टॉकचे आकर्षण शिगेला पोचलेले आहे. मागील दीड दोन वर्षात बाजारात नव्याने आलेल्या गुंतवणुकदारांना झटपट तुफानी कमाई करण्यासाठी पेनी स्टॉकचा (Penny Stock) पर्याय आकर्षित करतो आहे. दहा रुपयांच्या खाली किंमत असणाऱ्या पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून प्रचंड परतावा मिळवण्याची अनेकांची इच्छा आहे. कदाचित तुम्हीदेखील अशा शेअरच्या शोधात असाल. मात्र मित्रांनो जर तुम्हाला काही रुपयांऐवजी फक्त काही पैशांमध्ये मिळणाऱ्या शेअरमध्ये गुंतवणूक करून जबरदस्त कमाई करता आली तर, धमालच येईल ना. मग आपण अशाच एका  मल्टीबॅगर पेनी स्टॉकबद्दल (Multibagger Penny Stock) जाणून घेऊया ज्याने एका वर्षात गुंतवणुकदारांचे खिसे भरून टाकले आहेत. मल्टीबॅगर शेअरमध्ये (Multibagger stock) गुंतवणूक करण्याचा प्रयत्न गुंतवणुकदार मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहेत. त्यातच जर छोट्याशा गुंतवणुकीतून मोठी रक्कम कमावता आली तर ते सर्वांनाच हवे असते.  राज रेयॉन इंडस्ट्रीज लि.चा (Raj Rayon Industries Ltd) मल्टीबॅगर पेनी स्टॉकने एकाच वर्षात गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई करून दिली आहे. (The Multibagger stock of Raj Rayon Industries Ltd turned investment of Rs 1 Lakh into 14 lakhs in one year)

अधिक वाचा : Multibagger Stock | 10 पैशांची किंमत ती काय? नाही...10 पैशांच्या या शेअरने बनवले करोडपती, अजूनही संधी

धमाल शेअर तुफान कमाई

शेअर बाजारात जितकी जोखीम जास्त तितकी कमाईदेखील जास्त. पेनी स्टॉकसाठी हा सिद्धांत अगदी तंतोतंत लागू पडतो. मल्टीबॅगर पेनीस्टॉकमधून (Multibagger Penny Stock) मिळणारा परतावा छप्परफाड असतो. त्यामुळेच अनेक गुंतवणुकदारांचा कल असाच एखादा दमदार पेनी स्टॉक शोधून त्यात गुंतवणूक करण्याकडे असतो. असाच एक दमदार पेनी स्टॉकबद्दल मल्टीबॅगर पेनी स्टॉक ठरला आहे. या पेनीस्टॉकची वर्षभरापूर्वीची किंमत ही रुपयांमध्ये नाहीतर पैशांमध्ये होती. वर्षभरापूर्वी म्हणजे राज रेयॉन इंडस्ट्रीज लि.च्या (Raj Rayon Industries Ltd)शेअरची किंमत 20 पैसे होती. त्यानंतर हा शेअर जबरदस्त तेजी दाखवत 2.80 रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. अजूनही हा शेअर जबरदस्त तेजी दाखवतो आहे. या शेअरमध्ये सातत्याने तेजी दिसते आहे आणि शेअरची किंमत वाढत चालली आहे.

अधिक वाचा : Multibagger Stock | जवळपास फुकटात मिळणाऱ्या 'या' शेअरने वर्षभरात 1 लाखाचे केले 25 लाख...सैराट झालं जी!

एक लाखाचे वर्षभरात 14 लाख

फक्त 12 महिन्यांपूर्वीच हा शेअर 20 पैशांच्या पातळीवर होता. आता हा शेअर जबरदस्त तेजी दाखवत 2.80 रुपयांवर पोचला आहे. या शेअरने गुंतवणुकदारांना एकाच वर्षात 1,300 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजेच जर एक वर्षापूर्वी राज रेयॉन इंडस्ट्रीज लि.च्या शेअरमध्ये तुम्ही 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य जवळपास 14 लाख रुपये झाले असते. या पेनी स्टॉकला अप्पर सर्किट लागते आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना यातून अजून कमाईची आशा आहे. अर्थात शेअर बाजारातील सर्वात मोठी जोखीम म्हणजे पेनी स्टॉकमध्ये पैसे गुंतवणे. मात्र जर तुम्हाला जोखीम घेता येत असेल आणि तितकी तुम्ही क्षमता असेल तर तुम्हाला दणदणीत कमाई करता येईल.

अधिक वाचा : Multibagger Stock | फक्त 3.48 रुपयांच्या या शेअरने एक लाखाचे केले 27 लाख...गुंतवणुकदार मालामाल

राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. काय करते

राज रेयॉन इंडस्ट्रीज लि. या कंपनीची स्थापना 1993 मध्ये झाली होती. ही कंपनी पॉलीइस्टर रेयॉनच्या यार्नचे उत्पादन करते. 

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी