Multibagger Stock | केमिकल कंपनीच्या शेअरने केली पैशांची उधळण, दीड रुपयाच्या शेअरने केले १ लाखाचे ४१ लाख, तेजी सुरूच...

Penny stock investment : साधना नायट्रो केम लि. ही एक केमिकल क्षेत्रातील कंपनी असून कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच वर्षात तुफान घोडदौड झाली आहे. या शेअरच्या किंमतीत मागील पाच वर्षात जवळपास ४१ पट वाढ झाली आहे. ६ जानेवारी २०१७ला हा शेअर फक्त १.४० रुपये प्रति शेअर या किंमतीला उपलब्ध होता. सध्या या शेअरची किंमत ५७.४० रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरने पाच वर्षात तब्बल ४,००० टक्के परतावा दिला आहे.

Multibagger Stock
मल्टीबॅगर शेअर 
थोडं पण कामाचं
  • या छोट्या शेअरने दिला ४,००० टक्क्यांचा परतावा
  • मागील काही दिवसात नोंदवली जोरदार तेजी
  • १.४० रुपयांवरून शेअरची घोडदौड ५७.४० रुपयांपर्यत

Share Market Investment | मुंबई : सरलेले वर्ष शेअर बाजाराने गाजवले आहे. कोरोना महामारीच्या संकटाला तोंड देत असतानादेखील भारतीय शेअर बाजाराने (Share market)उच्चांकी पातळी नोंदवली होती. मागील वर्षभरात अनेक शेअर्स मल्टीबॅगर्स (Multibagger stock)बनले होते. खास करून हे वर्ष पेनी स्टॉक्सने (Penny stock)गाजवले. या काही शेअर्सनी गुंतवणुकदारांना खरोखरच जबरदस्त कमाई करून दिली. साधना नायट्रो केम लि. (Stock of Sadhana Nitro Chem Ltd) हा शेअर असाच एक पेनी स्टॉक आहे जो वर्षभरात मल्टीबॅगर शेअर बनला आहे. या शेअरची किंमत १.४० रुपयांवरून ५७.४० रुपयांच्या पातळीवर पोचली आहे. जवळपास एक वर्षाच्या कालावधीत या शेअरच्या किंमतीत तिप्पट तर पाच वर्षात ४१ पट वाढ झाली आहे. (The Multibagger stock of Sadhana Nitro Chem Ltd turned Rs 1 lakh into Rs 41 lakhs in 5 years)

साधना नायट्रो केम लि. चा शेअर, दिला ४,००० टक्के परतावा

साधना नायट्रो केम लि.  ही एक केमिकल क्षेत्रातील कंपनी असून कंपनीच्या शेअरमध्ये मागील पाच वर्षात तुफान घोडदौड झाली आहे. या शेअरच्या किंमतीत मागील पाच वर्षात जवळपास ४१ पट वाढ झाली आहे. ६ जानेवारी २०१७ला हा शेअर फक्त १.४० रुपये प्रति शेअर या किंमतीला उपलब्ध होता. सध्या या शेअरची किंमत ५७.४० रुपये प्रति शेअर इतकी आहे. या शेअरने पाच वर्षात तब्बल ४,००० टक्के परतावा दिला आहे. या शेअरमध्ये गुंतवलेल्या १ लाख रुपयांचे मूल्य आज ४१ लाख रुपये झाले आहे.

मागील फक्त एका वर्षाचा विचार करता या शेअरची किंमती १५ रुपयांवरून ५७ रुपयांवर पोचली आहे. म्हणजेच फक्त वर्षभरात या शेअरने पैसे तिप्पट केले आहेत. तर चार महिन्यांच्या कालावधीत हा शेअर ३५ रुपयांवरून ५७.४० रुपये प्रति शेअरच्या पातळीवर पोचला आहे. चार महिन्यात यातील गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

बाजारातील वर्षभरातील चढउतार आणि तेजी

मागील दीड वर्ष शेअर बाजारासाठी अभूतपूर्व ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांकांनी आपली आतापर्यतची उच्चांकी पातळी नोंदवली आहे. मागील काही आठवड्यात झालेल्या घसरणीमुळे हे दोन्ही निर्देशांक उच्चांकीवरून मागे फिरले आहेत. मात्र अजूनही शेअर बाजारात तेजी दिसून येते आहे. अर्थात हा आठवडा शेअर बाजारासाठी फारसा चांगला गेला नाही. सुरूवातीला झालेल्या घसरणीनंतर बाजार पुन्हा सावरला. मात्र चढ उतारांचा सिलसिला सुरू आहे. परकी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मागील दोन महिन्यात मोठी रक्कम काढून घेतली असली तरी देशांतर्गत गुंतवणुकदारांच्या पैशाच्या जोरावर बाजारातील तेजी टिकून आहे. तरुण गुंतवणुकदार आणि नवीन गुंतवणुकदार वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजाराकडे आकर्षित झाले आहेत. मागील एका वर्षात मोठ्या संख्येने डीमॅट खाती सुरू झाली आहेत. ओमायक्रॉन, कच्चे तेल आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे धोरण यावर शेअर बाजाराची आगामी दिवसांमधील वाटचाल अवलंबून असणार आहे.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी