Indian Railways: भारतातील एकमेव ट्रेन जिथे आहे मोफत प्रवास; ७३ वर्षांपासून ट्रेन आहे सुसाट 

काम-धंदा
Updated May 22, 2022 | 15:59 IST | टाइम्स नाऊ मराठी

Indian Railways । देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण देशातील खूप कमी लोकांना माहिती असेल की भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी तुम्हाला शुल्क आकारले लागत नाही.

The only train in India where there is free travel
भारतातील एकमेव ट्रेन जिथे आहे मोफत प्रवास, वाचा सविस्तर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • भारतातील एकमेव ट्रेन जिथे आहे मोफत प्रवास.
  • ही विशेष ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते.
  • मागील ७३ वर्षांपासून या ट्रेनमधून एकूण २५ गावांतील लोक मोफत प्रवास करत आहेत.

Indian Railways । नवी दिल्ली : देशात दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. पण देशातील खूप कमी लोकांना माहिती आहे की भारतात अशी एक ट्रेन आहे ज्यामध्ये प्रवास करण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. चला तर म जाणून घेऊया या खास ट्रेनबद्दल. (The only train in India where there is free travel). 

अधिक वाचा : मुंबईच्या विजयात नाहून गेले RCB चे खेळाडू, पाहा फोटो

ही विशेष ट्रेन हिमाचल प्रदेश आणि पंजाबच्या सीमेवर धावते. जर तुम्हाला भाक्रा नागल डॅम पाहायला जायचे असेल तर तुम्ही या ट्रेनमधून मोफत प्रवासाचा आनंदही घेऊ शकता.

अधिक वाचा : उर्फी जावेदची हटके स्टाईल

या ट्रेनमध्ये शुल्क आकारले जात नाही

दरम्यान, ही ट्रेन नागल ते भाक्रा डॅम दरम्यान ही ट्रेन धावते. मागील ७३ वर्षांपासून या ट्रेनमधून एकूण २५ गावांतील लोक मोफत प्रवास करत आहेत. त्यामुळे ही ट्रेन शुल्क का आकारत नाही याबाबतीत अनेकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. 

लक्षणीय बाब म्हणजे भगरा धरणाची माहिती लोकांना देण्यासाठी ही विशेष ट्रेन चालवली जाते. हे धरण बनवताना कोणत्या अडचणी आल्या हे लोकांना सांगावे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. हे भाक्रा बियास व्यवस्थापन मंडळाद्वारे चालवले जाते. हा रेल्वे ट्रॅक पर्वत तोडून बनवण्यात आला होता. 

७३ वर्षांपासून लोक करत आहेत प्रवास 

ही ट्रेन १९४९ मध्ये प्रथम धावली होती आणि गेली ७३ वर्षे लोक यामधून मोफत प्रवास करत आहेत. या ट्रेनमधून दररोज २५ गावातील ३०० लोक प्रवास करतात. या ट्रेनचा सर्वाधिक फायदा विद्यार्थ्यांना होतो. नांगल ते धरणापर्यंत ही ट्रेन धावते आणि दिवसातून दोनदा फेऱ्या मारते. डिझेल इंजिनवर चालणारी ही ट्रेन एका दिवसात ५० लिटर डिझेल खाते. या गाडीचे इंजिन सुरू झाले की भाक्रा येथून परत आल्यानंतरच ती थांबते.

किती वाजता चालते ही ट्रेन?

ही खास ट्रेन नांगलहून सकाळी ७.०५ वाजता निघते आणि भाखराहून सकाळी ८.२० वाजता नांगलला परत येते. यानंतर पुन्हा एकदा दुपारी ३.०५ वाजता ती नांगल येथून निघते आणि सायंकाळी ४.२० वाजता भाक्रा धरणातून नांगलला परत येते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी