नवी दिल्ली : कांदा (Onion) आणि टोमॅटो (tomato) या दोन महत्त्वाच्या भाज्या भारतीय स्वयंपाकघरात (kitchen) वापरल्या जातात. या फळ भाज्यांच्या किंमती वाढल्या तर स्वयंपाक घरातील बजेट कोलमडत असतं आणि गृहणी वर्गात नाराजी असते. दरम्यान, टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत (All India Average Retail Price) मागील महिन्याच्या तुलनेत 29 टक्क्यांनी कमी झाली आहे.
बाजारातील आवक सुधारल्याने टोमॅटोच्या सरासरी भावात घट झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने (Ministry of Public Distribution) मंगळवारी सांगितले की, मान्सूनच्या पावसामुळे मंडयांमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. त्यामुळे दरात दिलासा मिळाला आहे. मंत्रालयाने आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे की, बाजारातील कांद्याच्या किरकोळ किंमतीही गेल्या वर्षीच्या तुलनेत नऊ टक्क्यांनी कमी झाल्या आहे.
Read Also : अमेरिकेत समलैंगिक विवाहाला फेडरल संरक्षण
मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी (19 जुलै) टोमॅटोची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत प्रति किलो 37.35 रुपये होती. तर महिनाभरापूर्वी ते 52.5 रुपये किलो होती. त्याच वेळी, सरकारी आकडेवारीनुसार, मंगळवारी कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 25.78 रुपये प्रति किलो होती.
Read Also : 'मार डाला' गाण्यावर थिरकली अन् मग गाईने चांगलीच जिरवली
केंद्र सरकारने चालू वर्षात 2.50 लाख टन कांद्याचा साठा तयार केला आहे, जो आतापर्यंतचा सर्वाधिक खरेदी केलेला कांद्याचा बफर स्टॉक आहे. या निर्णयामुळे 317.03 लाख टन कांद्याचे विक्रमी उत्पादन झाले असले तरी, यंदा मंडईत भाव कोसळलेले नाहीत, असा सरकारचा विश्वास आहे. मंत्रालयाकडून असेही सांगण्यात आले आहे की यावर्षी कांद्याचा हा बफर स्टॉक ऑगस्ट ते डिसेंबर या काळात बाजारात कांद्याचे भाव स्थिर ठेवण्यासाठी वापरला जाईल. दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत वेगवेगळ्या कारणांमुळे देशातील मंडईंमध्ये कांद्याच्या किमतीत वाढ होत असल्याचं अनेकवेळा निदर्शनात आले आहे.
Read Also : प्रेयसी सबा आझादसोबत हृतिक रोशन लग्नबंधनात अडकणार
ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सांगितले आहे की कांद्याचा बफर स्टॉक खुल्या बाजारात विक्रीद्वारे सोडला जाईल. ते राज्य, केंद्रशासित प्रदेश आणि सरकारी संस्थांना किरकोळ दुकानांमध्ये पुरवठ्यासाठी दिले जाईल. सरकारने म्हटले आहे की कांद्याचा बफर स्टॉक देशातील लक्ष्यित बाजारपेठांमध्ये वापरला जाईल जिथे गेल्या महिन्याच्या तुलनेत भाव वाढत आहेत. त्या भागातील प्रमुख मंडईंमध्ये कांद्याचा बफर स्टॉक वापरून कांद्याची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.