Currency Note : अखेर 2000 रुपयांच्या नोटा का गायब झाल्या आहेत? माहिती अधिकारात समोर आले मोठे कारण

Currency Notes : तुम्ही मागच्या वेळेस 2000 रुपयांची नोट शेवटी कधी पाहिली होती? काही आठवते आहे का. नाही आठवणार कारण त्याला बरेच दिवस झाले असतील. याचे कारण आता समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. IANS या वृत्तसंस्थेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराखालील (RTI) एका अर्जाला सरकारने दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.

2000 Currency note
दोन हजारांच्या चलनी नोटा 
थोडं पण कामाचं
  • मागील काही दिवसांपासून बाजारातील दोन हजारांच्या नोटांची संख्या घटली
  • काही वर्षांपासून दोन हजारांच्या बनावट नोटांची संख्या वाढली
  • माहिती अधिकारातून समोर आले दोन हजाराच्या नोटांची संख्या कमी करण्याचे कार

Rs 2000 currency note : नवी दिल्ली : चलनी नोटांमध्ये 2000 रुपयांची नोट ही सर्वाधिक मूल्य असलेली नोट आहे. मात्र सध्या बाजारात दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा (2000 rupee currency note) फारशा दिसत नाहीत. तुम्ही मागच्या वेळेस 2000 रुपयांची नोट शेवटी कधी पाहिली होती? काही आठवते आहे का. नाही आठवणार कारण त्याला बरेच दिवस झाले असतील. याचे कारण आता समोर आले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे मागील तीन वर्षांपासून दोन हजार रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही. त्यामुळे 2000 रुपयांची नोट चलनातच दिसत नाही. बाजारात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी झालेले दिसते. IANS या वृत्तसंस्थेने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराखालील (RTI) एका अर्जाला सरकारने दिलेल्या उत्तरातून ही बाब समोर आली आहे.  8 नोव्हेंबर 2016 ला सरकारने जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालून नोटाबंदीची (Demonetization) घोषणा केली होती. त्यानंतरच 2000 रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्या होत्या. (The reason behind the shortage of 2000 rupee currency notes)

अधिक वाचा  : मेव्हण्याचं केलं अपहरण...खंडणी म्हणून मागितली वधू

2000 रुपयांच्या किती नोटा छापल्या

माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार, 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या वर्षांमध्ये 2,000 रुपयांच्या नवीन नोटा छापण्यात आलेल्या नाहीत. आरबीआय नोट मुद्रण लि.ने ( RBI Note Mudran (P) Limited ) 2016-17 या आर्थिक वर्षात 2,000 रुपयांच्या 3,5429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. मात्र यानंतर आरबीआयकडून 2017-18 या आर्थिक वर्षात अत्यंत कमी म्हणजे 1115.07 कोटी नोटा (2000 रुपयांची नोट) छापण्यात आल्या होत्या. तर 2018-19 या आर्थिक वर्षात यांची संख्या आणखी कमी करून फक्त 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 

अधिक वाचा  : खासदार गजानन किर्तीकर बाळासाहेबांच्या शिवसेनेत

बाजारात बनावट नोटांची संख्या वाढली

आश्चर्याची बाब म्हणजे बाजारात बनावट नोटांच्या संख्येत वाढ झाली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात बनावट नोटांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. जप्त करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरून 2,44,834 वर पोचली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2016 मध्ये देशात 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 इतकी होती. 2017 मध्ये हीच संख्या 74,898 पर्यंत वाढली होती. यानंतर, 2018 मध्ये ही संख्या 54,776 पर्यंत कमी झाली. मात्र त्यानंतर 2019 मध्ये हा आकडा 90,566 वर पोचला. तर 2020 मध्ये 2,000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या  2,44,834 इतकी होती.

अधिक वाचा  : एकादशी आणि रविवारी तुळशीला का अर्पण नाही करत जल?

बहुतांश बनावट नोटा कमी दर्जाच्या 

रिझर्व्ह बॅंकेने (RBI) 2015 मध्ये नवीन क्रमांकन पॅटर्नसह महात्मा गांधी मालिका - 2005 मध्ये सर्व मूल्यांच्या नोटा जारी केल्या होत्या. त्यामुळे व्हिजिबल सिक्युरिटी फीचरमुळे सर्वसामान्य नागरिकांना बनावट चलन सहजपणे ओळखता येतात. बँकिंग व्यवस्थेत आढळलेल्या 90 टक्क्यांहून अधिक बनावट नोटा (दोन हजार रुपयांच्या नोटा) कमी दर्जाच्या होत्या. त्यात कोणत्याही प्रमुख सुरक्षा वैशिष्ट्यांशी तडजोड केलेली नाही. सामान्य लोकांसाठी या नोटांच्या (2000 रुपयांची नोट) सुरक्षा वैशिष्ट्यांचा तपशील आरबीआयच्या वेबसाइटवर उपलब्ध करून दिला जातो.

माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीत म्हटले आहे की, आरबीआय बनावट नोटा रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत देशातील बँकांना वेगवेगळ्या सूचना जारी करते. रिझर्व्ह बॅंक नियमितपणे बँकांचे कर्मचारी/अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात रोकड हाताळणाऱ्या संस्थांसाठी यासाठी प्रयत्नशील असते. आरबीआय कर्मचारी आणि संस्थांसाठी बनावट नोटा शोधण्याचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करत असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी