Warren Buffett Investment Rules : नवी दिल्ली : जगप्रसिद्ध गुंतवणुकदार आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले वॉरन बफे (Warren Buffett)यांनी अनेक वेळा उद्धृत केले आहे की त्यांच्या संपत्ती मागची खरी ताकद ही चक्रवाढीची शक्ती (power of compounding) आहे. "माझी संपत्ती अमेरिकेत राहणे, काही भाग्यवान जीन्स आणि चक्रवाढ व्याज यांच्या संयोगातून आलेली आहे" असे ते अनेकदा गंमतीने म्हणत देखील असतात. गुंतवणूक करताना काही मूलभूत सूत्रे (Investment rules) समजून घेणे महत्त्वाचे आहे. ही सूत्रे समजल्यास तुम्ही मोठी संपत्ती निर्माण करू शकता, मुख्य म्हणजे त्यासाठी तुम्हाला जुगार खेळण्याची किंवा अवास्तव जोखीम पत्करण्याची गरज नसते. मात्र बहुतांश वेळा गुंतवणुकदार झटपट श्रीमंत होण्याच्या नादात या सूत्रांकडे दुर्लक्ष करतात. गुंतवणुकीच्या विश्वात ज्या सूत्राकडे तुम्ही दुर्लक्षच करू शकत नाही असे सूत्र म्हणजे चक्रवाढ व्याज किंवा चक्रवाढीची ताकद. (The secret behind Warren Buffett's wealth is in power of compounding, understand the concept)
अधिक वाचा : PhonePe Gold Offer | अक्षय्य तृतियेला स्वस्तात सोने खरेदी कराचंय? फक्त 4 दिवसांसाठी इथे मिळतेय बंपर ऑफर...
चक्रवाढ व्याज ही व्याजाची गणना करण्याची पद्धत आहे ज्यामध्ये व्याज मूळ रकमेवर आणि त्या वेळेपर्यंत जमा झालेल्या व्याजावर मोजले जाते.
गुंतवणुकीच्या विश्वात नेहमी उल्लेख केले जाणारे आणि ज्याला आर्थिक जगात आठवे आश्चर्य म्हणूनदेखील वर्णले जाते ते म्हणजे चक्रवाढ पद्धतीची वाढ. कोणतीही संपत्ती निर्मिती होताना ही शक्ती नेहमीच तिथे काम करत असते. नेमके चक्रवाढ कसे काम करते आणि यातून संपत्ती निर्मिती कशी होते ते एका उदाहरणाद्वारे आपण समजून घेऊया.
ही पद्धत अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, गृहीत धरा की तुम्ही गुंतवणूक योजनेमध्ये 100 रुपये ठेवले आहेत जी सरासरी 10 टक्के वार्षिक परतावा देते. तर,वर्षाच्या शेवटी, तुम्हाला 110 रुपये मिळतील. आता पुढील व्याज-कमाईच्या चक्रासाठी, तुमची प्रारंभिक मूळ रक्कम ही आता 100 रुपयांऐवजी 110 रुपये असेल. चक्रवाढ होऊन मूळ रक्कम येथे दुसऱ्या वर्षाच्या शेवटी, तुमच्याकडे 121 रुपये, पुढील वर्षासाठी 133 रुपये आणि त्यापुढील वर्षासाठी, 146 रुपये अशी वाढत जाईल.
चक्रवाढ व्याजात मिळणारे व्याज कालांतराने वाढत जाते आणि हे गुंतवणुकदारांसाठी एक आदर्श धोरण बनवते ज्यांचे उद्दिष्ट वेळोवेळी त्यांचे भांडवल जलद वाढवायचे असते. तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीची पर्वा न करता तुम्हाला निश्चित व्याज मिळणाऱ्या साध्या व्याजाच्या दृष्टिकोनापेक्षा हा दृष्टिकोन खूपच चांगला आहे.
अधिक वाचा : CNG Price Hike | पुण्यात सीएनजी 2.20 रुपयांनी महाग, आजपासून मोजावी लागेल एवढी किंमत...
सायकोलॉजी ऑफ मनी या लोकप्रिय पुस्तकाचे लेखक, मॉर्गन हाऊसेल, एका गुंतवणुकदाराचे उदाहरण वापरून, एखाद्याची संपत्ती वाढवण्यासाठी चक्रवाढीचा वापर करताना वेळ हा सर्वात महत्त्वाचा घटक कसा आहे यावर प्रकाश टाकतो. या पुस्तकात लेखक निदर्शनास आणतात की वॉरेन बफेच्या गुंतवणुकीवर त्यांच्या गुंतवणुकीवर वार्षिक सरासरी 22 टक्के परतावा मिळतो, तर न्यूयॉर्क-आधारित हेज फंड रेनेसान्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक जिम सिमन्स यांचा वार्षिक परतावा 66 टक्के आहे. केवळ आकड्यांच्या आधारे, सिमन्स हे तांत्रिकदृष्ट्या चांगले गुंतवणुकदार आहेत.
पण तरीही, वॉरेन बफेची एकूण संपत्ती 117 अब्ज डॉलर इतकी प्रचंड आहे तर 2022 पर्यंत जिम सिमनची निव्वळ संपत्ती फक्त 25.4 अब्ज डॉलर इतकी आहे.
हे कसे शक्य आहे? याचे उत्तर गुंतवणुकीच्या कालावधीत आहे. वॉरन बफे यांनी 1940 च्या सुरुवातीस गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तर सिमन्सने 1988 मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यामुळेच गुंतवणुकीवर जास्त परतावा असूनही, एकूण गुंतवणूक कालावधी कमी असल्यामुळे सिमन्सची संपत्ती बफेच्या संपत्तीशी आसपासदेखील नाही.