Tejas Express आठवड्यातून 5 दिवस धावणार, मुंबई-अहमदाबाद प्रवास झाला सोपा

तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी ट्रेन आहे. ही लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या दोन्ही मार्गांवर आठवड्यातून चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार धावते. बुकिंगमधील सकारात्मकता पाहता तेजस एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहे. ती आता आठवड्यातून 5 दिवस धावेल.

The Tejas Express will run 5 days a week, making the Mumbai-Ahmedabad journey easier
Tejas Express आठवड्यातून 5 दिवस धावणार, मुंबई-अहमदाबाद प्रवास झाला सोपा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी ट्रेन आहे.
  • आठवड्यातून चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार धावत होती
  • ख्रिसमसमुळे एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यात येत असून ती आता आठवड्यातून 5 दिवस धावेल.

मुंबई : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडने ख्रिसमस गर्दीसाठी अहमदाबाद-मुंबई-अहमदाबाद मार्गावरील तेजस एक्स्प्रेस (ट्रेन क्र. 82901/82902) च्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. IRCTC नुसार, ही तेजस ट्रेन 22 डिसेंबर 2021 पासून आठवड्यातून 5 दिवस धावेल. (The Tejas Express will run 5 days a week, making the Mumbai-Ahmedabad journey easier)

तेजस एक्सप्रेस ही देशातील पहिली खाजगी ट्रेन आहे. यामध्ये डायनॅमिक भाडे आहे, म्हणजेच भाडे त्यात चढ-उतार होते. ही लखनौ-नवी दिल्ली आणि अहमदाबाद-मुंबई या दोन्ही मार्गांवर आठवड्यातून चार दिवस म्हणजे शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार धावते. 

कोरोना महामारीमुळे बंद पडल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबर 2020 मध्ये जेव्हा ते चालवण्याचा निर्णय घेण्यात आला, तेव्हा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांनुसार एक सीट सोडून बुकिंग केले जात होते. मात्र, आता सर्व जागांवर बुकिंग होणार आहे. गेल्या वर्षी, तेजस एक्सप्रेस 19 मार्च 2020 पासून बंद होती ती 17 ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, महिनाभरानंतर नोव्हेंबरमध्ये तिकीटांचे बुकिंग कमी झाल्याने ते बंद करावे लागले.

अहमदाबाद-मुंबई मार्गावरील तेजस एक्सप्रेसची सेवा कोविड-19 प्रोटोकॉलचे पालन करून ७ ऑगस्ट २०२१ पासून पुन्हा सुरू करण्यात आली. रेल्वेने प्रवास करणाऱ्या लोकांनी या तेजस एक्सप्रेस ट्रेनवर विश्वास व्यक्त केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या ट्रेनमध्ये कोरोनाचा प्रोटोकॉल चांगला पाळला जातो. स्वच्छतेच्या बाबतीतही ट्रेन लोकांना खूप आवडते.

रेल्वेच्या म्हणण्यानुसार, बुकिंगमधील सकारात्मकता पाहता तेजस एक्स्प्रेसच्या फेऱ्या वाढवण्यात येत आहे. सध्याच्या काळाबद्दल बोलायचे झाले तर ही तेजस ट्रेन सध्या आठवड्यातून फक्त 4 दिवस धावते. येत्या 22 तारखेपासून ही ट्रेन बुधवार, शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार म्हणजे आठवड्यातून 5 दिवस धावणार आहे. त्यामुळे लोकांना ये-जा करणे सोपे होईल आणि कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

असं करा तिकिट बुक

तुम्‍ही काही सोप्या ट्रिक्सद्वारे ट्रेनचे तत्काळ तिकीट अगदी सहजपणे बुक करू शकता. वेळखाऊपणाच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी, IRCTC तुम्हाला एक पर्याय देते ज्यामध्ये तुम्हाला प्रवाशांची माहिती पुन्हा पुन्हा द्यावी लागणार नाही. हे तुम्हाला प्रवाशांचे तपशील सेव्ह करण्याचा पर्याय देते. अशा परिस्थितीत तुम्हाला प्रवाशांचे तपशील पुन्हा पुन्हा भरावे लागणार नाहीत आणि तुमचा वेळ वाचू शकेल. यामुळे तुम्ही तत्काळमध्ये लवकर तिकीट बुक करू शकाल.

जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, तर तिकीट बुक करताना, जेव्हा तुम्ही ट्रेन आणि क्लास निवडता. त्यानंतर प्रवाशांचे तपशील भरताना New चा पर्याय येतो, त्यानंतर त्यावर क्लिक करण्याऐवजी Add Existing वर क्लिक करावे लागेल. यानंतर, सर्व प्रवाशांचे प्रोफाइल तुमच्या समोर येतील ज्यासाठी तुम्हाला तिकीट बुक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला पत्ता टाकावा लागेल. पत्ता प्रविष्ट केल्यानंतर, पेमेंट मोडवर क्लिक करा. येथे तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI चा पर्याय दिसेल. यापैकी कोणत्याही मदतीने तुम्ही पेमेंट करून तुमचे तिकीट बुक करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी