FD Interest Rates : या 5 बँका एफडीवर देतायेत 7% पेक्षा जास्त व्याजदर...गुंतवणुकीची उत्तम संधी

Investment in Fixed Deposit : आजही मोठ्या संख्येने भारतीयांसाठी मुदतठेवी म्हणजे एफडी (Fixed Deposit) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. आरबीआयने (RBI)रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात (Interest rates) लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे एफडीमधील गुंतवणुकीसंदर्भात लोकांचे आकर्षण पुन्हा वाढले आहे. मात्र बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका अजूनही मुदतठेवींवर महागाईवर मात करणारे व्याजदर देत नाहीत. मात्र काही स्मॉल फायनान्स बॅंका दमदार व्याजदर देत आहेत.

FD interest rates
मुदतठेवीवरील व्याजदर 
थोडं पण कामाचं
  • मोठ्या संख्येने भारतीयांसाठी मुदतठेवी म्हणजे एफडी (Fixed Deposit) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय
  • आरबीआयने (RBI)रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात (Interest rates) लक्षणीय वाढ केली
  • अनेक छोट्या फायनान्स बँका FD वर महागाईवर मात करणारे व्याजदर देत आहेत

Small Finance Bank  Interest Rates : नवी दिल्ली : आजही मोठ्या संख्येने भारतीयांसाठी मुदतठेवी म्हणजे एफडी (Fixed Deposit) हा पसंतीचा गुंतवणूक पर्याय आहे. आरबीआयने (RBI)रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी मुदत ठेवींवरील व्याजदरात (Interest rates) लक्षणीय वाढ केली आहे. त्यामुळे एफडीमधील गुंतवणुकीसंदर्भात लोकांचे आकर्षण पुन्हा वाढले आहे. मात्र बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका अजूनही मुदतठेवींवर महागाईवर मात करणारे व्याजदर देत नाहीत. जूनमध्ये किरकोळ चलनवाढीचा दर किरकोळ घसरून 7.01 टक्क्यांवर आला. जेव्हा तुम्ही मुदतठेवींमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला महागाई दरापेक्षा जास्त परतावा मिळणे चांगले असते. आज आम्ही तुम्हाला स्मॉल फायनान्स बँकांच्या (Small Finance Bank) अशाच काही एफडींबद्दल सांगणार आहोत, ज्या महागाईवर मात करणारे व्याजदर देत आहेत. (These 5 small finance banks are giving more than 7% interest rate on FD)

अधिक वाचा : Uday Samant यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'गाडीवर दगड मारुन....'

विविध स्मॉल फायनान्स बॅंकांचे मुदतठेवीवरील व्याजदर - 

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक (Ujjivan Small Finance Bank)

बँक सध्या सामान्य ग्राहकांना 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवर 7.20 टक्के परतावा देते आहे. हा परतावा 2 मॅच्युरिटी कालावधीच्या एफडीवर आहे. 990 दिवसांच्या एफडीवर आणि 42 महिने एक दिवस ते 60 महिन्यांच्या एफडीवर व्याजदर देते आहे. त्याच वेळी, बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के जास्त व्याजदर देते आहे. बँकेने 13 जून 2022 रोजी अखेरचे व्याजदर बदलले.

अधिक वाचा : Inflation rate: भाजपशासित राज्यांत महागाई कमी अन् इतर राज्यांत जास्त? खासदाराने आकडेवारीच केली जाहीर

जन स्मॉल फायनान्स बँक (Jana Small Finance Bank)

ही स्मॉल फायनान्स बँक सर्वसामान्य नागरिकांना 7.25 ते 7.35 पर्यंत FD वर उच्च व्याजदर देते आहे. त्याच वेळी, ज्येष्ठ नागरिकांच्या एफडीवर 8.05 टक्के ते 8.15 टक्के व्याजदर दिला जातो आहे. सर्वसामान्य आणि ज्येष्ठ नागरिकांना एक वर्ष ते 5 वर्षांपर्यंतच्या एफडीवर हा बंपर परतावा मिळू शकतो.

ESAF स्मॉल फायनान्स बँक (ESAF Small Finance Bank)

ही बँक सर्वसामान्य नागरिकांना FD वर 7.25% परतावा देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर 2 वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर दिला जातो आहे.

अधिक वाचा : Balance Disorder: तर तुम्हालाही असू शकतो बॅलेंस डिसऑर्डर आजार...

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank)

ही स्मॉल फायनान्स बँक सध्या ग्राहकांना 7.49 टक्के व्याजदर देत आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना 7.99 टक्के व्याजदर दिला जात आहे. हा व्याजदर ग्राहकांना 999 दिवसांच्या FD वर दिला जातो आहे.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक (Utkarsh Small Finance Bank)

ही स्मॉल फायनान्स बँक सध्या 700 ते 1000 दिवसांच्या FD वर 7.25 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, या कालावधीतील एफडीवर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के परतावा दिला जातो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी