Interest rates| सेव्हिंग्स खात्यावर जबरदस्त व्याजदर, या बॅंकेची आहे बंपर ऑफर...

Savings Account Interest Rates: मुदतठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit Interest Rates) घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले पैसे बचत खात्यात (Saving Account)ठेवण्यास सुरूवात केली आहे. बॅंकेचे बचत खाते तुम्हाला पैसे जमा करण्याची, काढण्याची सुविधा देते त्याचबरोबर तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर व्याजदेखील मिळते. बचत खात्याचे अनेक लाभ असतात. पैसे सुरक्षित ठेवणे, आर्थिक व्यवहारांसाठी वापर, व्याजदराची प्राप्ती इत्यादी. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका बचत खात्यावर व्याज देतात.

Savings Account Interest Rates
बचत खात्यावर अधिक व्याजदर देणाऱ्या बॅंका 
थोडं पण कामाचं
  • बचत खात्यात असणाऱ्या रकमेवर ग्राहकांना व्याज मिळते.
  • वेगवेगळ्या बॅंकेत वेगवेगळे व्याजदर असतात
  • डीसीबी बॅंकेत बचत खात्यावर ६.५ टक्के व्याजदराची ऑफर

Savings Account Interest Rates: नवी दिल्ली : अलीकडच्या काळात मुदतठेवींवरील व्याजदरात (Fixed Deposit Interest Rates) घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपले पैसे बचत खात्यात (Saving Account)ठेवण्यास सुरूवात केली आहे. बॅंकेचे बचत खाते तुम्हाला पैसे जमा करण्याची, काढण्याची सुविधा देते त्याचबरोबर तुम्हाला बचत खात्यातील रकमेवर व्याजदेखील मिळते. बचत खात्याचे अनेक लाभ असतात. पैसे सुरक्षित ठेवणे, आर्थिक व्यवहारांसाठी वापर, व्याजदराची प्राप्ती इत्यादी. खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंका बचत खात्यावर व्याज देतात. खासगी क्षेत्रातील छोट्या बॅंका जास्तीत जास्त ग्राहक आकर्षित करण्यासाठी एचडीएफसी बॅंक किंवा आयसीआयसीआय बॅंकेसारख्या मोठ्या बॅंकांच्या तुलनेत अधिक व्याज देतात. (These banks are giving higher interest rates on savings account)

पाहूया कोणती बॅंक बचत खात्यावर किती व्याज देते आहे (Interest Rates On Savings Account)-

  1. डीसीबी बॅंक (DCB Bank)बचत खात्यावर ६.५ टक्क्यांपर्यत व्याज देते आहे. खासगी बॅंकांमध्ये हा सर्वाधिक व्याजदर आहे. या बॅंकेत बचत खात्यातील किमान बॅलन्सची आवश्यकता २,५०० रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यत आहे. 
  2. बंधन बॅंक (Bandhan Bank)बचत खात्यावर ६ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी ५,००० रुपये आवश्यक असतात.
  3. आरबीएल बॅंक (RBL Bank)देखील बचत खात्यावर ६ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी ५,००० रुपये आवश्यक असतात.
  4. येस बॅंक (Yes Bank)बचत खात्यावर ५.२५ टक्के व्याजदर देते आहे. यात बॅलन्ससाठी दरमहा सरासरी १०,००० रुपयांपासून २५,००० रुपये आवश्यक असतात.
  5. आयडीएफसी फर्स्ट बॅंक (IDFC First Bank) आणि इंडसइंड बॅंक (IndusInd Bank) बचत खात्यावर ५ टक्के व्याजदर देते आहे. आयडीएफसी फर्स्ट बॅंकेत दरमहा सरासरी १०,००० रुपये आवश्यक असतात. तर इंडसइंड बॅंकेत दरमहा सरासरी १,५०० रुपयांपासून ते १०,००० रुपये आवश्यक असतात.

खासगी क्षेत्रातील छोट्या बॅंका मोठ्या बॅंकांच्या तुलनेत बचत खात्यावर जास्त व्याजदर देतात. बॅंकेची निवड करताना ट्रॅक रेकॉर्ड, चांगली सेवा, बॅंकेच्या शाखांचे नेटवर्क आणि एटीएम सेवा देणारी बॅंक निवडली पाहिजे.

नव्या वर्षात एटीएममधून कॅश काढणे झाले महाग

नव्या वर्षात १ जानेवारीपासून एटीएममधून कॅश काढणे महाग झाले आहे. एक जानेवारीपासून ग्राहकांना फ्री एटीएम ट्रान्झॅक्शनची सीमा पार केल्यानंतर तुलनेने अधिक शुल्क भरावे लागणार आहे. मागील वर्षापर्यत बॅंकांच्या एटीएममधून कॅश किंवा नॉन कॅश ट्रान्झॅक्शनवर महिन्यामध्ये ५ ट्रान्झॅक्शन मोफत असायचे. यानंतर २० रुपये प्रति ट्रान्झॅक्शनचा चार्ज लागायचा. मात्र १ जानेवारी २०२२ पासून हा चार्ज २१ रुपये प्रति ट्रान्झॅक्शन झाला आहे. सर्व एटीएममधून केल्या जाणाऱ्या मोफत ट्रान्झॅक्शनवरील (ATM Transaction Charge)मर्यादा संपल्यानंतर होणाऱ्या ट्रान्झॅक्शनवरील चार्ज रिझर्व्ह बॅंकेने (RBI)वाढवला आहे. मायक्रो एटीएम (Micro ATM) आणि आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम (Aadhaar Enabled Payment System) या दोन पर्यायांद्वारे एटीएमवरील शुल्क वाचवता येते.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी