Changes from 1st October 2022: आजपासून होणार हे 10 मोठे बदल...तुमच्यावर होणार थेट परिणाम, पाहा कोणते

Rule changes from 1st October : 1 ऑक्टोबरपासून काही बदल होणार आहेत, काही नियमांमध्ये बदल होणार आहेत जे तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहेत. हे बदल कोणते आहेत किंवा कोणत्या नियमांमध्ये बदल होणार आहे ते जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. विविध सेवांपासून ते गुंतवणुकीपर्यत अनेक ठिकाणी हे बदल होणार आहे.

Changes from 1st October 2022
1 ऑक्टोबरपासून होणार बदल 
थोडं पण कामाचं
  • 1 ऑक्टोबर 2022 पासून होणारे हे बदल तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार
  • अटल पेन्शन योजना, वीज सबसिडी, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम , म्युच्युअल फंडाचे नियम , वाहनांची किंमत, अल्पबचत योजना, 5G सेवा सारख्या महत्त्वाच्या बाबी
  • हे बदल काय आहेत आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होणार

Changes from 1st October 2022 : नवी दिल्ली : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेपासून काही बदल होत असतात. आज 1 ऑक्टोबरपासून (1st October 2022) देखील काही बदल होणार आहेत, काही नियमांमध्ये बदल होणार आहेत जे तुमच्या आयुष्यावर थेट परिणाम करणार आहेत. हे बदल कोणते आहेत किंवा कोणत्या नियमांमध्ये बदल  (Changes from 1st October 2022) होणार आहे ते जाणून घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. कारण या सर्व बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील होणार आहे. या बदलांमध्ये अटल पेन्शन योजना, वीज सबसिडी, डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम (Tokenisation), म्युच्युअल फंडाचे नियम (Mutual Funds), वाहनांची किंमत, अल्पबचत योजना, 5G सेवा यासारख्या दहा महत्त्वाच्या बदलांचा समावेश आहे. 1 ऑक्टोबर 2022 पासून होणारे हे महत्त्वाचे बदल तपशीलात जाणून घेऊयात. (These changes from 1st October 2022 will impact your life, check the details)

अधिक वाचा : Fake identity for sim: व्हॉट्सअपवर खोटं नाव सांगितलं तर पडेल दंड, होईल तुरुंगवास!

1 ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलांची यादी-

1 - देशात 5G सेवा सुरू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑक्टोबर 2022 रोजी भारतात बहुप्रतिक्षित 5G सेवा सुरू करणार आहेत. पंतप्रधान मोदी देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करणार आहेत. यानंतर येत्या काही वर्षांत 5G सेवेचा देशभरात विस्तार केला जाईल.

2 - म्युच्युअल फंडाच्या नियमांमध्ये बदल
1 ऑक्टोबर पासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या लोकांनी नामांकन तपशील देणे आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर असे न करणाऱ्या गुंतवणुकदारांना एक घोषणापत्र भरावे लागेल. यामध्ये नामांकनाचा उल्लेख करावा लागेल. यापूर्वी हा नियम 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार होता, मात्र तसे होऊ शकले नाही आणि ही मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आता या महिन्यापासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.  म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकदारांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे. 

3 - डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी टोकनायझेशनचा नियम 
1 ऑक्टोबरपासून डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले जात आहेत. 1 ऑक्टोबरपासून कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशनचा नियम लागू होणार आहे. या संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितले की, टोकनायझेशन प्रणाली लागू केल्यानंतर कार्डधारकांना पेमेंट करण्याचा नवा अनुभव मिळेल. आत्तापर्यंत तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्डने पेमेंट करता तेव्हा तुमच्या कार्डची माहिती संबंधित वेबसाइटवर सेव्ह केली जाते. ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटना पाहता सरकार आता नियमात बदल करत आहे. जेणेकरून फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल. यामध्ये, व्यवहारादरम्यान एक टोकन तयार होईल आणि त्यातून पैसे भरता येतील. यामुळे डेबिट आणि क्रेडिट कार्डने व्यवहार करणे पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होईल. ही प्रणाली लागू झाल्यानंतर फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होईल.

अधिक वाचा : Pakistani Airlines latest : एअर होस्टेसने विमानात योग्य अंडरगारमेंट परिधान करावे... पाकिस्तानी एअरलाइनचा विचित्र आदेश

4 - अल्पबचत योजनांचे व्याजदर
अल्पबचत योजनांवरील व्याजदरात आगामी तिमाहीसाठी वाढ झाली आहे. केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचा व्याजदर 7.4% वरून 7.6% केला आहे. तर किसान विकास पत्रासाठी (KVP) व्याजदर 6.9% वरून 7% वर नेला आहे. याशिवाय दोन आणि तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरदेखील वाढवला आहे. एवढेच नाही तर किसान विकास पत्राबाबतच्या कालावधीतदेखील बदल करण्यात आला आहे. तुमच्या माहितीसाठी आता किसान विकास पत्रासाठीचा गुंतवणूक कालावधी 123 महिने करण्यात आला आहे तर व्याजदर 7 टक्के करण्यात आला आहे. एकीकडे सरकारने काही अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ केली आहे. तर दुसरीकडे बचत ठेवी, 1-वर्ष, 5-वर्षांसाठीच्या एफडी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NCS), सुकन्या समृद्धी योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)या योजनांवरील व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

5- डिमॅट खात्याच्या नियमांमध्ये होणार बदल 
डीमॅट खाते आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने 14 जून रोजी अधिसूचना जारी केली आहे की 30 सप्टेंबरपर्यंत डीमॅट खात्यांमध्ये द्वि-घटक प्रमाणीकरण सक्षम करणे आवश्यक आहे. याशिवाय, ग्राहक 1 ऑक्टोबरपासून डीमॅट खात्यात लॉग इन करू शकणार नाहीत. आता खात्यात लॉग इन करण्यासाठी, प्रथम बायोमेट्रिक प्रमाणीकरण आणि नंतर पासवर्ड टाकणे करणे आवश्यक आहे. त्यामुळे डिमॅट खात्याशी संबंधित फसवणुकीची प्रकरणे थांबतील.

6- अनुदान बंद होईल
समोर आलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत मोफत विजेच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आता नियम बदलले आहेत. 31 सप्टेंबरनंतर दिल्ली सरकारकडून वीज बिलावर दिले जाणारे अनुदान बंद होणार आहे. आता अनुदानासाठी अर्ज केलेल्या ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नुकताच हा नवीन नियम जाहीर केला होता.

7- ही नवीन योजना अमलात येणार आहे
वायू प्रदूषणाविरुद्ध लढा देण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून दिल्ली एनसीआरमध्ये ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन लागू केला जाईल. दिल्ली-एनसीआरमध्ये वायू प्रदूषण हिवाळ्यात चिंताजनक पातळीवर पोहोचते हे उल्लेखनीय आहे. ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन अंतर्गत, प्रदूषण वाढवण्यास मदत करणाऱ्या सर्व कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. अशा परिस्थितीत जनरेटरपासून धूर पसरवणाऱ्या वाहनांपासून ते सर्वांवर त्याचा परिणाम होणार आहे. हिवाळा सुरू झाला की दिल्ली-एनसीआरमध्ये प्रदूषणाची समस्या वाढते.

8 - अटल पेन्शन योजनेत बदल
सरकारने आपल्या लोकप्रिय योजना अटल पेन्शन योजनेचे नियम बदलले आहेत. यापुढे करदात्यांना याचा लाभ घेता येणार नाही. म्हणजेच जर तुम्ही प्राप्तिकराच्या कक्षेत येत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. यापूर्वी केंद्र सरकारच्या या लोकप्रिय पेन्शन योजनेत सहभागी होण्यासाठी अशी कोणतीही अट लागू नव्हती. परंतु सरकारने एका अधिसूचनेत म्हटले आहे की 1 ऑक्टोबर 2022 नंतर कोणताही करदाता अटल पेन्शन योजनेत सामील होण्यास पात्र राहणार नाही. या तारखेला किंवा त्यापूर्वी एखादा सदस्य करदाता असल्याचे आढळल्यास, त्याचे अटल पेन्शन योजना खाते बंद केले जाईल आणि त्या दिवसापर्यंत जमा केलेले पेन्शन परत केले जाईल.

अधिक वाचा : Avalanche in Uttarakhand : उत्तराखंडमध्ये बाबा केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन, सुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही

9 - फोक्सवॅगनच्या गाड्या महागणार
फोक्सवॅगनच्या गाड्या 1 ऑक्टोबरपासून महागणार आहेत. कंपनीने अलीकडेच सांगितले होते की, कच्च्या मालाच्या वाढत्या किमतींमुळे 1 ऑक्टोबरपासून सर्व वाहनांच्या किमती 2% ने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. फोक्सवॅगन सध्या भारतात चार मॉडेल्स विकते. यामध्ये दोन सेडान आणि दोन एसयूव्ही कारचा समावेश आहे. कंपनी येत्या काही दिवसांत देशात आणखी तीन मॉडेल्स लॉन्च करण्याच्या योजनेवर काम करत आहे. महिंद्रानेही अलीकडेच आपल्या काही कारच्या किमती वाढवल्या आहेत.

10 - या गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे
भारतीय रेल्वेने ट्रेनच्या वेळांमध्ये बदल केले आहेत. आता 12412 अमृतसर - चंदीगड इंटरसिटी आता 17:20 ऐवजी 17:05, 15 मिनिटे आधी सुटेल. ट्रेन क्रमांक 22918 हरिद्वार - वांद्रे टर्मिनस एक्सप्रेस आता 17:30 ऐवजी 17:20 वाजता 10 मिनिटे आधी सुटेल. ट्रेन क्रमांक 12912  हरिद्वार-वलसाड एक्सप्रेस आता 17:30 ऐवजी 17:20 वाजता सुटणार आहे. ट्रेन क्रमांक 12172 HWL LTT एक्सप्रेस 17:30 ऐवजी 17:20 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 15002 डेहराडून - मुझफ्फरपूर एक्सप्रेस 15:20 ऐवजी 15:15 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 15006 डेहराडून - गोरखपूर एक्सप्रेस 15:20 ऐवजी 15:15 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 12018 डेहराडून - नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस आता 16:55 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 12402 डेहराडून - कोटा नंदा देवी एक्सप्रेस 22:50 ऐवजी 22:45 वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक 04339 बुलंदशहर - टिळक ब्रिज शटल आता 05:40 ऐवजी 05:35 वाजता निघेल. ट्रेन क्रमांक 04356 बालामौ - लखनौ एक्सप्रेस आता 08:40 ऐवजी 08:35 वाजता धावेल. दुसरीकडे, 04327 सीतापूर सिटी - कानपूर सेंट्रल स्पेशल 11:00 च्या 20 मिनिटे आधी 10:40 वाजता धावेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी