High blood sugar causes: दैनंदिन आयुष्यातील या 5 आश्चर्यकारक गोष्टींमुळे वाढू शकते रक्तातील इन्सुलिन

Health Tips : बदलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामुळे शरीरावर विपरित परिणाम होत त्यातून पुढे हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार, डोळे खराब होणे इत्यादी इतर आजार होऊ शकतात. रक्तातील साखर नियंत्रित (blood sugar level) करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर यात तुमचे जीन्सदेखील महत्वाची भूमिका बजावतात. अर्थात त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. रक्तातील वाढलेल्या साखरेचा संबंध इन्सुलिनशी (Insulin)असतो.

Health Tips
हेल्थ टिप्स 
थोडं पण कामाचं
  • अलीकडे मधुमेहाचे प्रमाण वाढले
  • चुकीच्या सवयींमुळे गंभीर आजार होतात
  • इन्सुलिनचे प्रमाण वाढण्याची कारणे

High blood sugar causes : नवी दिल्ली : अलीकडच्या काळात घराघरात जे गंभीर आजार ठाण मांडून बसले आहेत त्यापैकी एक म्हणजे मधुमेह. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे हा गंभीर आजार होतो. बदलेल्या जीवनशैलीमुळे मधुमेहाचे (Diabetes) प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामुळे शरीरावर विपरित परिणाम होत त्यातून पुढे हृदय किंवा मूत्रपिंडाचे आजार, डोळे खराब होणे इत्यादी इतर आजार होऊ शकतात. याशिवाय रुग्णाला आधीच असलेले आजार आणखी गंभीर होतात. कारण मधुमेहात रोगप्रतिकारशक्ती कमी होते. म्हणूनच रक्तातील साखर नियंत्रित (blood sugar level) करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर यात तुमचे जीन्सदेखील महत्वाची भूमिका बजावतात. अर्थात त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. रक्तातील वाढलेल्या साखरेचा संबंध इन्सुलिनशी (Insulin)असतो.  आपल्या रोजच्या जीवनातील इन्सुलिनची पातळी वाढवणाऱ्या सात आश्चर्यकारक गोष्टी पाहूया (These daily things causes spikes in insulin levels)

अधिक वाचा-  नोव्हेंबर महिना 'या' राशींच्या लोकांसाठी शुभ, होतील भाग्यवान

शरीरातील इन्सुलिन वाढण्याची कारणे-

कृत्रिम स्वीटनर्स: हे पदार्थ साखरेसाठी आणि मधुमेहासाठी "सुरक्षित पर्याय" म्हणून ओळखले जातात. मात्र अनेक तज्ञ आणि अभ्यास दर्शवतात की ते खरोखर हानिकारक असू शकतात. या पदार्थांच्या सेवनाने रक्तातील साखरेमध्ये वाढ देखील होऊ शकतात

कॉफी: अनेकांना रोज कॉफी पिण्याची सवय असते. ब्लॅक कॉफी आणि साखर नसलेल्या कॉफीमुळेदेखील इन्सुलिन वाढू शकते. असे लोक आहेत जे कॅफिनसाठी अतिसंवेदनशील असतात आणि कॉफीमुळे त्यांची रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

अधिक वाचा - उन्हात जाताच महिलेच्या कपड्यांचा रंग बदलला, 'जादुई ड्रेस' पाहून लोकं कन्फ्यूज

पुरेशी झोप न घेणे: अलीकडच्या जीवनशैलीत झोपेवर मोठा परिणाम झाला आहे. लोक तणावात असतात. त्यामुळे अनेकांना पुरेशी आणि योग्य झोप मिळत नाहीत. यामुळेदेखील तुमच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण वाढू शकते. 

अधिक वाचा : Aurangabad Crime News : जादुटोणा केल्याच्या संशयावरून तरुणाने स्वयंघोषित वैद्याची केली हत्या

न्याहारी न करणे: आपला आहार खूप महत्त्वाचा असतो.  अभ्यासातून असे दिसून आले आहे की जर तुम्ही नाश्ता केला नाही तर लंच आणि डिनर दोन्हीनंतर रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे तुमच्या नाश्ता, लंच आणि डिनरवर लक्ष द्या.

पुरेसे पाणी न पिणे: शरीरातील पाण्याचा तुमच्या रक्तावर परिणाम होतो. त्यामुळे तुम्ही जर पुरेसे पाणी पित नसाल तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. 

(Disclaimer : प्रस्तुत लेखात सुचविलेल्या टिप्स आणि सल्ले फक्त सामान्य माहितीसाठी आहेत आणि त्यांचा व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी