PM Kisan Samman Nidhi Yojana: मोठी बातमी! या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा ११ वा हप्ता

PM Kisan Samman Nidhi Yojana | पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गंत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १० हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे.

These farmers will not get 11th installment of PM Kisan Yojana
या शेतकऱ्यांना नाही मिळणार PM किसान योजनेचा ११ वा हप्ता  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजनेच्या अंतर्गत सरकार प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात ६ हजार रूपये जमा करते.
  • लवकरच या योजनेचा ११ वा हप्ता जमा होणार आहे.
  • अनेक वेळा अर्ज करताना झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांचा हप्ता येण्यामध्ये व्यत्यय येत असतो.

PM Kisan Samman Nidhi Yojana | नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana 11th Installment) थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले जातात. या योजनेअंतर्गंत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात १० हप्त्यांची रक्कम जमा झाली आहे. तसेच या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वार्षिक ६ हजार रूपये पाठवते. मात्र अनेक वेळा अर्ज करताना झालेल्या चुकांमुळे शेतकऱ्यांचा हप्ता येण्यामध्ये व्यत्यय येत असतो. (These farmers will not get 11th installment of PM Kisan Yojana). 

पैसे का अडकतात? 

पीएम किसान योजनेअंतर्गत (PM Kisan Yojana Benefits) केंद्र सरकारकडे कोट्यवधी अर्ज येत असतात, परंतु त्यात अनेक चुका असतात त्यामुळे शेतकऱ्यांचे हप्ते थांबले जातात. बॅंकेच्या तपशीलापासून टायपिंगपर्यंतच्या चुकांचा यामध्ये समावेश असतो. कधी नावे चुकतात तर कधी तपशील आधार कार्डशी जुळत नाहीत.

अधिक वाचा : मि. युनिव्हर्सच्या नावाखाली खेळाडूंची फसवणूक

कोणत्या चुका होऊ शकतात 

* किसान योजनेचा फॉर्म भरताना आपले नाव इंग्रजीत लिहा.
* ज्या शेतकऱ्यांचा अर्ज मराठीमध्ये आहे त्यांनी इंग्रजीमध्ये करावा. 
* अर्जातील नाव आणि बँक खात्यातील अर्जदाराचे नाव वेगळे असल्यास तुमचे पैसे अडकू शकतात.
* जर बॅंकेचा IFSC कोड, बॅंक खाते क्रमांक आणि गावाचे नाव लिहण्यात चूक झाली तरीदेखील तुमचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार नाही. 
* अलीकडे बॅंकाच्या विलीनीकरणामुळे IFSC कोड बदलले आहेत. त्यामुळे अर्जदाराला त्याचा नवीन IFSC कोड अपडेट करावा लागेल. 

अशा दुरूस्त करा चुका 

* अर्जातील चुका सुधारण्यासाठी प्रथम तुम्ही pmkisan.gov.in या वेबसाइटवर जा.
* आता फॉर्मवरील 'किसान कॉर्नर' चा पर्याय निवडा. 
* तिथे तुम्हाला Aadhaar Edit' चा पर्याय दिसेल, येथे तुम्ही तुमच्या आधार क्रमांकामध्ये सुधारणा करू शकता.
* तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये चूक झाली असेल, तर ती सुधारण्यासाठी तुम्हाला कृषी विभाग कार्यालय किंवा लेखापाल यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी