New rules:1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम, सतर्क रहा कारण तुमची छोटीशी चूक करू शकते मोठे नुकसान

काम-धंदा
Updated Mar 28, 2023 | 16:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

New Rules Change From April 2023: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या नवीन वर्षांत लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत. ज्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार आहे. म्हणून पुढचा महिना लागण्याआधी हे नवीन नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

These New rules will be applicable from April 1
New rules:1 एप्रिलपासून लागू होणार नवे नियम  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • डेट म्युच्युअल फंडवर अधिकचा कर 
  • कार आणि दुचाकी होणार महाग
  • सोन्याच्या दागिन्यांवर HUID क्रमांक आवश्यक

New Rules April 2023: येत्या 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. या नवीन वर्षांत लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे नियम बदलत आहेत. ज्याचा थेट परिणाम जनतेच्या खिशावर होणार आहे. म्हणून पुढचा महिना लागण्याआधी हे नवीन नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमचे आर्थिक नियोजन करता येईल आणि कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळता येईल. 

पॅन आधार लिंकिंग

जर कोणाचे पॅन कार्ड-आधार कार्ड लिंक नसेल तर असे पॅन कार्ड 1 एप्रिलपासून अवैध ठरणार आहेत. 1 एप्रिलपासून अशा पॅन कार्ड धारकांना बँकिंग, मालमत्ता, प्रवास, वाहनांची विक्री आणि विम्यासह इतर अनेक क्षेत्रांशी संबंधित महत्त्वाची कामे करणे कठीण होणार आहे. सध्या 31 मार्चपर्यंत 1000 रुपये दंड भरून लिंक करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अधिक वाचा: Accenture कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार, 19,000 कर्मचार्‍यांना एका झटक्यात काढणार

डेट म्युच्युअल फंडवर अधिकचा कर 

1 एप्रिलपासून डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे नियम बदलणार आहेत. याअंतर्गत तीन वर्षांपेक्षा जास्त काळ ठेवलेल्या गुंतवणुकीवर जास्त कर भरावा लागेल. इक्विटी मार्केटमध्ये 35 टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करणाऱ्या डेट म्युच्युअल फंडांना हे नवीन नियम लागू होतील. या अंतर्गत गुंतवणुकीवरील परताव्यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लावला जाईल. यामुळे गुंतवणुकदारांना पूर्वीपेक्षा जास्त कर भरावा लागणार आहे. 

अधिक वाचा: Aadhar कार्डधारकांना सरकारने दिला दिलासा… आता या तारखेपर्यंत करू शकणार मतदार ओळखपत्र लिंक

कार आणि दुचाकी होणार महाग 

नवीन आर्थिक वर्षात मारुती कार, टाटाची व्यावसायिक वाहने, हिरोच्या निवडक दुचाकी महाग होणार आहेत. म्हणजेच एप्रिलपासून वाहन खरेदी करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील. 

सोन्याच्या दागिन्यांवर HUID क्रमांक आवश्यक 

1 एप्रिल 2023 पासून 6 अंकी HUID क्रमांक असलेले नोंदणीकृत सोन्याचे दागिने विकता येणार आहेत. याच्या आधारावर दागिन्यांची शुद्धता आणि दर्जा याची हमी दिली जाईल. HUID मुळे संबंधित दागिन्यांचा निर्माता कोण आहे, त्याचे वजन किती आहे, तो कोणाला विकला गेला आणि कोणत्या हॉलमार्किंग सेंटरमध्ये हा कोड देण्यात आला? या सर्वांची माहिती गोळा करणे सोपे होईल. 

अधिक वाचा: Aadhaar-PAN Card Link न केल्यास होतील हे 3 नुकसान, आयकर विभागाचा नवा आदेश जारी

विमा महागणार 

5 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक प्रीमियम असणाऱ्या विमा पॉलिसीमधून होणाऱ्या उत्पन्नावर  कर भरावा लागणार आहे. मात्र, याचा ULIP योजनेवर परिणाम होणार नाही. या बदलाचा परिणाम अधिक प्रीमियम भरणाऱ्या पॉलिसी धारकावर होणार आहे. 

डीमॅट खात्यात नॉमिनेशन आवश्यक

डीमॅट खातेधारकांनी 1 एप्रिल 2023 पूर्वी नॉमिनेशन दाखल करणे आवश्यक आहे. अन्यथा खातेधारकांचे खाते फ्रीज  केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी