RBI | देशातील या तीन बॅंका बुडाल्या, तर कोसळेल देशाची अर्थव्यवस्था, आरबीआयने दिली यादी

Important banks in Economy : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) महत्त्वाच्या असणाऱ्या तीन बॅंका म्हणजे स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बॅंक (HDFC bank) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI bank). रिझर्व्ह बॅंकेने देशातील तीन महत्त्वाच्या बॅंकांची (डी-एसआयबी) यादी जाहीर केली आहे. यात या तीन बॅंकांची नावे देण्यात आली आहे. महत्त्वाची बॅंक त्या बॅंकांना समजले जाते ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा हिस्सा आहे आणि त्या बॅंकावरील संकट हे सर्व अर्थव्यवस्थेलाच संकटात टाकू शकते.

Important banks of India
देशातील सर्वात महत्त्वाच्या बॅंका 
थोडं पण कामाचं
  • आरबीआयने जाहीर केली देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन बॅंकांची यादी
  • स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बॅंक (HDFC bank) आणि आयसीआयसीआय बॅंक यांचा आरबीआयच्या यादीत समावेश
  • या बॅंका कोसळल्या तर कोसळेल देशाची अर्थव्यवस्था

RBI D-SIB list | नवी दिल्ली : रिझर्व्ह बॅंकेनुसार (RBI) देशातील तीन बॅंकांना (Banks) जर धोका उत्पन्न झाला की त्या बुडाल्या तर देशाची अर्थव्यवस्था संकटात सापडू शकेल. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी (Indian Economy) महत्त्वाच्या असणाऱ्या तीन बॅंका म्हणजे स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बॅंक (HDFC bank) आणि आयसीआयसीआय बॅंक (ICICI bank). रिझर्व्ह बॅंकेने देशातील तीन महत्त्वाच्या बॅंकांची (डी-एसआयबी) यादी जाहीर केली आहे. यात या तीन बॅंकांची नावे देण्यात आली आहे. महत्त्वाची बॅंक त्या बॅंकांना समजले जाते ज्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेत मोठा हिस्सा आहे आणि त्या बॅंकावरील संकट हे सर्व अर्थव्यवस्थेलाच संकटात टाकू शकते. या तीन बॅंकांचे महत्त्व इतके आहे की अर्थव्यवस्थेचे धोरण ठरवण्यांना या तीन बॅंकांना डोळ्यासमोर ठेवावे लागते. या बॅंकांना कोणताही धोका पोचणार नाही याची काळजी आरबीआय आणि अर्थमंत्रालयाला घ्यावी लागते. (These three banks in RBI list are very critical for India's economy)

रिझर्व्ह बॅंकेची यादी

आरबीआयने २०२१ साठी जाहीर करण्यात आलेल्या डोमेस्टिक सिस्टेमेटिक इम्पोर्टन्ट बॅंक म्हणजे डी-एसआयबी या यादीत स्टेट बॅंकेसह, एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश केला होता. स्टेट बॅंक बकेट ३ मध्ये तर एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश बकेट १ मध्ये करण्यात आला होता. याशिवाय या यादीत इतर कोणत्याही बॅंकेचे नाव नाही. २०२० मध्ये देखील याच तीन बॅंकांचा समावेश आरबीआयने केला होता. तर २०१५ मध्ये स्टेट बॅंकेला आणि २०१६ मध्ये आयसीआयसीआय बॅंकेचा समावेश या यादी केला होता. त्यानंतर एचडीएफसी बॅंकेचा देखील समावेश करण्यात आला होता.

डी-एसआयबी काय असते

डी-एसआयबी यादीत समावेश केलेल्या बॅंकांना टू बिग टू फॉल म्हटले जाते. म्हणजेच या बॅंका इतक्या मोठ्या आहेत की त्या कोसळू शकत नाहीत किंवा त्यांच्या कोसळण्याचा किंवा संकटात सापडण्याचा विचारदेखील केला जाऊ नये. या बॅंका अडचणीत आल्यास किंवा बुडित झाल्यास संपूर्ण अर्थव्यवस्थाच गाळात जाऊ शकते. त्यामुळेच या यादीत असलेल्या बॅंकांवर आरबीआयचे बारीक लक्ष असते. या बॅंकांशी निगडीत जोखीम कमी करण्यासाठी आरबीआय विशेष पावले उचलते. आरबीआय काही निकष जाहीर करते त्यानुसार बॅंकांना रिस्क वेटेज अॅसेटच्या रुपात काही अतिरिक्त कॉमन इक्विटी ठेवावी लागते. 

२०१५ पासून जाहीर होते आहे ही यादी

जगभर आलेल्या २००८च्या मंदीला डोळ्यासमोर ठेवून २०१०मध्ये वित्तीय अस्थिरता बोर्डाने देशातील वित्तीय संस्थांची जोखीम कमी करण्यासाठी पावले उचलण्याच्या सूचना दिल्या होत्या. यातून डी एसआयबी यादीची सुरूवात झाली. सर्वच देशांमध्ये याप्रकारे महत्त्वाच्या बॅंकांची यादी केली जाते आणि त्यावर लक्ष ठेवले जाते. २०१५ पासून भारतात आरबीआय या प्रकारची यादी जाहीर करते आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी