Mutual Fund Investment: या पाच म्युच्युअल फंडांनी बनवले करोडपती, वर्षभरातच दिला तुफान परतावा

Investment Tips : योग्य प्रकारे गुंतवणूक (Investment) केल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही किंवा मोठी संपत्ती उभी करू शकत नाहीत. विशेष म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. मात्र बहुतांश लोकांचे गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. बाजारात असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे दमदार कामगिरी केली आहे. आपण अशाच पाच जबरदस्त म्युच्युअल फंडांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी वर्षभरात सर्वाधिक परतावा दिला आहे.

Mutual Fund Investment
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक 
थोडं पण कामाचं
  • श्रीमंत होण्यसााठी गुंतवणूक महत्त्वाची
  • म्युच्युअल फंडातील गुंतवणूक हा एक चांगला पर्याय
  • जबरदस्त परतावा देणारे म्युच्युअल फंड

Top Mutual Fund: नवी दिल्ली : श्रीमंत होण्यासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचे असते. आर्थिक नियोजनातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे गुंतवणूक असतो. योग्य प्रकारे गुंतवणूक (Investment) केल्याशिवाय तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही किंवा मोठी संपत्ती उभी करू शकत नाहीत. विशेष म्हणजे प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे असते. मात्र बहुतांश लोकांचे गुंतवणुकीकडे दुर्लक्ष होते. योग्य गुंतवणूक केली तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. गुंतवणुकीसाठी बाजारात विविध पर्याय उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात म्युच्युअल फंडातील (Mutual Fund)गुंतवणूक लोकप्रिय झाली आहे. यात जोखीम कमी असते आणि परतावादेखील चांगला असतो. बाजारात असे म्युच्युअल फंड आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे दमदार कामगिरी केली आहे. आपण अशाच पाच जबरदस्त म्युच्युअल  फंडांबद्दल जाणून घेऊया ज्यांनी वर्षभरात सर्वाधिक परतावा दिला आहे. म्युच्युअल फंडात नियमितपणे दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्ही मोठी रक्कम उभारू शकता. (These top 5 mutual funds gave bumper rturns in one year) 

अधिक वाचा  : घरात हनुमानाचा फोटो 'या' दिशाला लावल्यानं होईल फायदा

जबरदस्त परतावा देणारे 5 म्युच्युअल फंड -

निप्पॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ (Nippon India Multi Cap Direct Growth)
निप्पॉन इंडिया मल्टी कॅप डायरेक्ट ग्रोथ फंडाने गेल्या एका वर्षात गुंतवणुकदारांना मालमाल केले आहे. या फंडाने जबरदस्त परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या फंडाने गुंतवणुकदारांना जवळपास 14.23 टक्के परतावा दिला आहे. इथे लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे हा एक अतिशय उच्च जोखमीचा फंड आहे.

अधिक वाचा  : आदित्य ठाकरेंचे दारू पार्ट्यांचे व्हिडिओ दाखवणार शिंदे गट

निप्पॉन इंडिया मल्टी कॅप ग्रोथ (Nippon India Multi Cap Growth)
या फंडानेदेखील गुंतवणुकदारांना जोरदार कमाई करून दिली आहे. या फंडाने एका वर्षात गुंतवणुकदारांना 13.41 टक्के परतावा दिला आहे. हादेखील एक अतिशय उच्च जोखमीचा फंड आहे.

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप डायरेक्ट ग्रोथ (HDFC Flexi Cap Direct Growth)

एचडीएफसीच्या या फंडाने आपल्या गुंतवणुकदारांनाही एका वर्षात खूश केले आहे. या फंडातील गुंतवणुकीने गुंतवणुकदारांना एका वर्षात 12.86 टक्के परतावा मिळाला आहे. फ्लेक्सी कॅप प्रकारातील फंड असल्याने हा देखील जास्त जोखमीचा फंड आहे. 

अधिक वाचा  : फिटनेस सर्टिफिकेटपूर्वी सर्वसामान्यांसाठी पूल झाला होता खुला

एचडीएफसी फ्लेक्सी कॅप ग्रोथ (HDFC Flexi Cap Growth)

एचडीएफसीच्याच या फंडानेदेखील दमदार कामगिरी केली आहे या फंडाने या फंडाने गुंतवणुकदारांनी चांगली कमाईही करून दिली आहे. या फंडाने गुंतवणुकदारांना मागील वर्षात 12.11 टक्के परतावा दिला आहे. हा एक अतिशय उच्च जोखमीचा फंड आहे.

क्वांट सक्रिय डायरेक्ट ग्रोथ (Quant Active Direct Growth)

क्वांटच्या या फंडाने 10 टक्‍क्‍यांहून अधिक परतावा देऊन गुंतवणुकदारांची कमाई करून दिली आहे. या फंडाच्या माध्यमातून गेल्या एका वर्षात गुंतवणुकदारांना 11.28 टक्के परतावा मिळाला आहे. हा एक अतिशय उच्च जोखमीचा फंड आहे.

म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करताना शिस्तबद्धपणे, नियमितपणे आणि एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास छोट्या रकमेतून मोठी रक्कम उभारते येते.

(डिस्क्लेमर : आर्थिक साक्षरता वाढवणे हाच टाइम्स नाऊ मराठीचा उद्देश आहे. बाजारातील गुंतवणूक जोखीमयुक्त असते. आम्ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सुचवत नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या आर्थिक सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी