Share Market : हे टॉप आयटी शेअर 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर...गुंतवणुकीची उत्तम संधी, तज्ज्ञदेखील उत्साहात

IT Stocks : जर तुम्ही शेअर बाजारातील टॉप भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ते आता फायद्याचे ठरू शकते. खरेतर, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro)या आघाडीच्या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे.

Investment Opportunity in IT Stocks
आयटी कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणुकीची संधी 
थोडं पण कामाचं
  • शेअर बाजाराच्या घसरणीत दिसते आहे गुंतवणुकीची संधी
  • टीसीएस, इन्फोसिससारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांच्या शेअर्स आले नीचांकी पातळीवर
  • जाणकारांनी दिसते आहे कमाईची संधी

Investment in Top IT Shares : मुंबई :  जर तुम्ही शेअर बाजारातील टॉप भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ते आता फायद्याचे ठरू शकते. खरेतर, सध्याच्या बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro)या आघाडीच्या भारतीय आयटी कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाली आहे. TCS आणि Infosys चे समभाग त्यांच्या संबंधित 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर व्यवहार करत आहेत. TCS चे शेअर्स 2022 मध्ये आतापर्यंत सुमारे 18% खाली आले आहेत. तर Infosys चे शेअर्स याच कालावधीत 25% पेक्षा जास्त घसरले आहेत. त्याच वेळी, विप्रोचे शेअर्स या वर्षात आतापर्यंत 42.08% घसरले आहेत. विप्रोच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 402.10 रुपये आहे. विप्रोच्या शेअरची किंमत सध्या 415.80 रुपये आहे. (These top IT stock at 52 weeks low, expert says best investment opportunity)

अधिक वाचा : Gold-Silver Rate Today, 21 June 2022: कभी खुशी कभी गम! अस्थिर जागतिक बाजारपेठ, डॉलरमधील चढउतारामुळे सोने अस्थिर....पाहा ताजा भाव

ब्रोकरेज फर्मचे खरेदीची रेटिंग

देशांतर्गत ब्रोकरेज आणि संशोधन संस्था मोतीलाल ओसवाल या आयटी कंपन्यांच्या शेअरबाबत सकारात्मक आहे. त्यांनी TCS आणि Infosys या दोन्ही समभागांवर खरेदीचे रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मने TCS साठी 4,240 रुपये आणि Infosys साठी 2,000 रुपयांचे लक्ष्य ठेवले आहे. आज TCS चे शेअर्स BSE वर 3111.65 रुपयांवर आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 3,023.35 रुपये आहे. त्याच वेळी, इन्फोसिसचे शेअर्स 1414.20 रुपयांवर आहेत. त्याची 52 आठवड्यांची नीचांकी किंमत 1,367.20 रुपये आहे. म्हणजेच, आता गुंतवणूक केल्यास टीसीएस आणि इन्फोसिसच्या शेअरमधून जोरदार कमाई करता येऊ शकते.

अधिक वाचा : Agniveer साठी आनंद महिंद्रानंतर टाटांनीही उघडले दरवाजे, जाणून घ्या कोणत्या उद्योगपतींनी केले अग्निपथचे कौतुक

तज्ञ काय म्हणतात?

ब्रोकरेज फर्मने आपल्या नोटमध्ये लिहिले आहे की, “TCS ने आपला दीर्घकालीन महत्त्वाकांक्षी मार्जिन 26-28% वर कायम ठेवला आहे. कारण कंपनीच्या दीर्घकालीन खर्चाच्या संरचनेत किंवा सापेक्ष स्पर्धात्मकतेमध्ये कोणताही बदल झालेला नाही. उच्च दर्जाचा महसूल TCS मध्ये मार्जिनला आधार देतो आहे. दरम्यान, सरलेल्या आर्थिक वर्षात मार्जिनचा दबाव असूनही, मजबूत वाढीच्या पार्श्वभूमीवर इन्फोसिसने 23% ची मार्जिन दिली. ब्रोकरेजच्या मते, अॅट्रिशन मॉडरेशन, सुधारित किंमत, उप-कंत्राटदारांवर कमी अवलंबून राहणे, उच्च नवीन आवृत्त्या आणि मजबूत ऑपरेटिंग लिव्हरेज, दोन्ही कंपन्यांनी मार्जिन राखण्यास सक्षम असावे. त्याच वेळी, वाढत्या मागणीसह, TCS आणि Infosys या दोन्ही कंपन्यांनी सरलेल्या आर्थिक वर्षात (FY22) विक्रमी संख्येने प्रतिभावंतांना नियुक्त केले आहे.

अधिक वाचा : Bank FD : एचडीएफसी, आयसीआयसीआयसह देशातील आघाडीच्या बँकांमध्ये एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतंय ते जाणून घ्या

जागतिक शेअर बाजारातील घसरण, अमेरिकन डॉलरचे वाढते मूल्य आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे आक्रमक धोरण यामुळे शेअर बाजारात मागील काही दिवसांपासून घसरण होते आहे. त्यामुळे अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर्स खालच्या पातळीवर आले आहेत. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करत असल्यामुळे गुंतवणुकदार शेअर बाजारातून पैसा काढून घेत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी